कोरोना काळात सर्दी-खोकला दूर ठेवण्यासाठी 'हा' काढा आहे रामबाण उपाय

कोरोना काळात सर्दी-खोकला दूर ठेवण्यासाठी 'हा' काढा आहे रामबाण उपाय

कोरोना विषाणूची (Covid-19) लागण होऊ नये यासाठी सुरुवातीपासूनच रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्याच्या विविध उपाययोजना सुचवण्यात येत आहेत.

  • Share this:

मुंबई, 11 जून: आता पावसाळा (Rainy Season) सुरू झाला आहे. ऋतू बदलामुळे सर्दी (Cold), खोकला (Cough), घशात खवखव असे किरकोळ आजार आता डोकं वर काढू लागतील. हे नेहमीचे किरकोळ आजार आहेत. पण सध्याच्या कोरोना साथीमुळे (Corona Pandemic) हे आजार देखील लोकांना भीतीदायक वाटू लागले आहेत. कोरोनाच्या दहशतीनं साधा खोकला, सर्दी, तापदेखील लोकांची झोप उडवत आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यास होणाऱ्या कोविड-19 आजारातही ताप, सर्दी, खोकला ही प्रमुख लक्षणं आहेत. त्यामुळे लोकांच्या मनातील भीती अधिक वाढली आहे.

कोरोना संकटाच्या या काळात सातत्यानं चर्चा होत आहे ती रोग प्रतिकारक शक्तीची (Immunity). कोरोना विषाणूची (Covid-19) लागण होऊ नये यासाठी सुरुवातीपासूनच रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्याच्या विविध उपाययोजना सुचवण्यात येत आहेत. यामध्ये आयुर्वेदिक काढे, औषधे, होमिओपॅथिक गोळ्या, अशा विविध प्रकारच्या उपायांचा समावेश आहे. एरव्ही सर्दी, खोकला, ताप अशा आजारांवर काढे घेण्याची पद्धत आपल्याकडे प्रचलित आहे. घरीच उपलब्ध असलेल्या मसाल्याच्या पदार्थांपासून काढे बनवले जातात. त्यामुळं कोणीही सहज ते बनवू शकतात. आयुर्वेदात(Ayurveda ) विविध आजारांवर उपयुक्त ठरणाऱ्या काढयांची माहिती देण्यात आली आहे. अशाच एका आयुर्वेदिक काढ्याची माहिती इथं देत आहोत. त्याचा उपयोग करून तुम्ही या हवामानात होणाऱ्या या किरकोळ आजारांपासून संरक्षण मिळवू शकता. या काढ्याचे नियमित सेवन केल्यानं रोग प्रतिकारशक्ती वेगानं वाढते आणि आजारांनां दूर ठेवणं शक्य होतं.

हेही वाचा- ‘नवनाथांची’ गाथा दिसणार छोट्या पडद्यावर; सोनी मराठीवर नव्या मालिकांची मेजवानी

काढ्यासाठी आवश्यक गोष्टी :

काढा बनवण्यासाठी आवश्यक असलेले घटक म्हणजे एक ग्लास पाणी, 8 ते 10 तुळशीची पाने (Basil Leaves), 2 ते 3 लवंगा (Clove), दालचिनीच्या (Cinnamon)1 ते 2 लहान काड्या, हळद (Turmeric) अर्धा चमचा आणि मध (Honey) 2 चमचे.

काढा करण्याची कृती :

काढा तयार करण्यासाठी प्रथम तुळशीची पाने, दालचिनी, लवंगा आणि हळद बारीक वाटून घ्यावी. हे मिश्रण एका पॅनमध्ये चांगले गरम करावे. नंतर एका भांड्यात एक ग्लास पाणी (one glass water) उकळून घेऊन आणि त्यात ही पेस्ट घालावी. हे पाणी 15 ते 20 मिनिटे चांगले उकळू द्यावं. नंतर गाळून घ्यावं. घेण्यापूर्वी त्यात चवीसाठी मध घालावा.

हा काढा कधी प्यावा ?

घसा खवखवत असेल किंवा थंडी वाजून आल्यासारखं वाटत असेल तर दररोज दोन ते तीन वेळा हा काढा घ्यावा. यामुळे रोग प्रतिकारशक्ती मजबूत होईल. छातीत असलेला कफदेखील कमी होईल. घसा दुखत असल्यास हा काढा घेतल्यानं लगेच आराम पडतो.

Published by: Pooja Vichare
First published: June 11, 2021, 3:45 PM IST

ताज्या बातम्या