फक्त एका शस्त्रक्रियेची कमाल! 3 वर्षांनंतर सर्जरीच्या दुसऱ्याच दिवशी चालू लागल्या पुण्याच्या आजी

फक्त एका शस्त्रक्रियेची कमाल! 3 वर्षांनंतर सर्जरीच्या दुसऱ्याच दिवशी चालू लागल्या पुण्याच्या आजी

पुण्यातील 61 वर्षांच्या या महिलेला गेली तीन वर्षे अजिबात चालता येत नव्हतं.

  • Share this:

पुणे, 03 एप्रिल : पुण्यातील 61 वर्षांच्या शोभा खुडे. त्यांच्या गुडघ्यात तीव्र वेदना होत होत्या. इतकं की त्यांना दैनंदिन कामंही करणं शक्य होत नव्हतं. किंबहुना गेल्या तीन वर्षांपासून त्या चालल्याच नाहीत. पण एका शस्त्रक्रियेमुळे त्यांना जणू नवं आयुष्यच मिळालं. टोटल नी रिप्लेसमेंट (Total knee replacement) करताच दुसऱ्याच दिवशी त्या चालू लागल्या.

शोभा खुडे यांना गुडघ्याचा ऑस्टिओआर्थरायटिस होता. त्यात त्या लठ्ठ होत्या. जवळपास 85 किलो वजन असल्याने शरीराचा संपूर्ण भार त्यांच्या गुडघ्यावर यायचा. शिवाय महिला म्हणजे त्यांना हाडांच्या समस्या अधिक आणि ऑस्टिओआर्थयारटिसचा धोकाही जास्त. शोबा खुडे यांना शस्त्रक्रिया करण्याशिवाय पर्यायच नव्हता. पण त्यांना त्याची भीती होती म्हणून त्या सर्जरी टाळत होत्या. पण आता काहीच करता येत नसल्याने अखेर त्यांनी शस्त्रक्रिया केली.

पुण्याच्या नोबेल हॉस्पिटलमध्ये शोभा यांच्या दोन्ही गुडघ्यांची रोबोटिक टोटल नी रिप्लेसमेंट सर्जरी झाली. 9 मार्च, 2021 पहिली आणि 12 मार्च, 2021 दुसरी शस्त्रक्रिया करण्यात आली. सर्जरीच्या दुसऱ्याच दिवशी त्या चालू लागल्या.

हे वाचा -पुणेकरांनो सावधान! संध्याकाळी 6 नंतर बाहेर पडण्यास बंदी; पाहा काय आहेत नवे नियम

पुण्याच्या नोबेल हॉस्पिटलमधील डॉ. अनिकेत पाटील यांनी सांगितलं, “वजन वाढल्यामुळे तुमच्या संपूर्ण आरोग्यावर परिणाम होता. या रुग्णाला ऑस्टिओआर्थरायटिस झाला त्यात जास्त वजन त्यामुळे चालताही येत नव्हतं. पण रोबोटिक नी रिप्लेसमेंटमुळे ते शक्य झालं. खरंतर या रुग्णाने ऑपरेशन लवकर केलं असतं तर त्या लवकर बऱ्या झाल्या असत्या.”

“रोबोटिक नी रिप्लेसमेंटमुळे रुग्णाला लवकर बरं वाटतं, वेदना बंद होतात आणि दोन-तीन दिवसांत तो चालू लागतो. ही पूर्णपणे सुरक्षित आणि प्रभावी अशी शस्त्रक्रिया आहे”, असंही डॉ. पाटील यांनी सांगितलं.

शोभा यांच्या शस्त्रक्रियेला आता जवळपास 2 आठवड्यांपेक्षा जास्त कालावधी उलटला आहे. यानंतर तर त्यांच्या प्रकृतीत जास्त सुधारणा झाली. त्या आता स्वतःची कामं स्वतः करतात. दैनंदिन कार्य करू शकता शिवाय चालू-फिरूसुद्धा शकतात.

शोभा म्हणाल्या, “मला आधी सर्जरीची भीती वाटत होती मी ती टाळत होते. पण आता असं वाटतं आहे की मी सर्जरीला उगाचच उशीर केला. शस्त्रक्रियेनंतर आता खूप बरं वाटतं आहे. मला अजिबात त्रास झाला नाही. माझी प्रकृती खूप सुधारली आहे. मला चालता येतं आहे आणि मी स्वतःची कामं स्वत: करू शकते, त्यामुळे खूप आनंदी आहे. सध्या माझी फिजिओथेरेपी सुरू आहे”

हे वाचा - मोदी सरकारने फक्त 45 व्यक्तींनाच कोरोना लस देण्याचा निर्णय का घेतला?

शस्त्रक्रियेनंतर शोबा यांना फक्त गुडघ्याच्या त्रासातूनच मुक्ती मिळाली असं नाही तर त्यांचं एकंदरच आरोग्य सुधारेल. त्यांची हालचाल होत असल्याने वजन कमी होण्यास मदत होईल आणि कालांतराने त्यांचा लठ्ठपणाही कमी होईल आणि भविष्यात त्या फिट राहतील.

Published by: Priya Lad
First published: April 3, 2021, 7:51 AM IST

ताज्या बातम्या