‘हे’ आहेत त्वचेचे अनेक कर्करोग, जाणून घ्या काय आहेत कारणे !

‘हे’ आहेत त्वचेचे अनेक कर्करोग, जाणून घ्या काय आहेत कारणे !

अतिनील किरणांमुळे त्वचेचे विकार वाढू लागले आहेत. पण, कर्करोगाचं हे एकमेव कारण नाही. जाणून घ्या वेगवेगळ्या प्रकारचे त्वचेचे कर्करोग आणि त्यामागची कारणं.

  • Share this:

मुंबई, जून 22 :  कर्करोग हा शरीरातील पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे होणारा रोग आहे. कर्करोग हा एकच आजार नसून विविध रोगांचे मिश्रण आहे. कर्करोगाचे शंभरपेक्षाही जास्त प्रकार आहेत. साधारणतः ज्या अवयवास किंवा ज्या प्रकारच्या पेशींना हा रोग होतो त्याचेच नाव त्या कर्करोगाला दिले जाते. कर्करोग कोणत्याही पेशीमध्ये आणि कोणत्याही अवयवामध्ये होऊ शकतो आणि त्यामधील समान दुवा म्हणजे अनिर्बंध पेशींची वाढ होय.

कर्करोग हा गंभीर आजार असण्याचं मुख्य कारण म्हणजे, त्यामुळे ओढावणारा मृत्यु. कर्करोगाचे अनेक प्रकार असून, त्वचेचा कर्करोग हा सर्वसाधारपणे आढळला जातो.  कर्करोगाच्या पेशींची त्वचेमध्ये होण्याऱ्या असामान्य वाढीमुळे त्वचेचा कर्करोग होतो. वातावरणातील बदल, तसेच प्रदूषण आणि वाढलेल्या उष्णतेचा थेट परिणाम त्वचेवर होत असतो. त्वचेचा कर्करोग हा सतत त्वचा सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यामुळे होण्याची शक्यता असते. अतिनील किरणांमुळे त्वचेचे विकार वाढू लागले आहेत. पण, या कर्करोगाचं हे एकमेव कारण नाही. आज आपण वेगवेगळ्या प्रकारच्या त्वचेचे कर्करोग आणि त्यामागची कारणं जाणून घेणार आहोत.

बेसल सेल कार्सिनोमा:  हा कर्करोग बेसल आणि स्क्‍वैमस पेशींमध्ये होतो. या पेशी त्वचेच्या बाह्य आवरणावर असतात. सूर्यप्रकाशाच्या थेट संपर्कात येणारे अवयव म्हणजे डोकं, चेहरा आणि मान या भागांमध्ये बेसल कर्करोग होण्याची शक्यता जास्त असते. याशिवाय, दुसऱ्या अवयवांवर तो पसरत नसला तरी त्यावर लवकर उपचार न केल्यास तो जवळील हाडांवर मारा करु शकतो. सततचं दुखणं, फोड किंवा लाल, तपकिरी रंगाची जखम ही काही बेसल सेल कार्सिनोमा या कर्करोगची लक्षणे आहेत.

स्क्वॅमस सेल कार्सिनोमा: हा त्वचेचा कर्करोग सर्वसाधारपणे आढळला जातो. चेहरा, कान, हात हे अवयव सूर्यप्रकाशाच्या थेट संपर्कात आल्यावर या कर्करोगाचे निदान होऊ शकते. सावळा रंग असण्याऱ्या व्यक्तींमध्ये हा जास्त प्रमाणात आढळतो. त्वचेवरील गाठ, सपाट जखम आणि खरखरीत पृष्ठभाग ही काही स्क्वॅमस सेल कार्सिनोमाची लक्षणे आहेत. पेशींमध्ये होणार्‍या या कर्करोगाचे निदान लवकर झाल्यास त्यावर पूर्ण इलाज करणे शक्य आहे.

मेलानोमा:  या प्रकारचा कर्करोग शरीरावर कुठेही होऊ शकतो. मिलानोसाईटस् पेशींमध्ये त्वचेचा कर्करोग होतो. त्यालाच मेलानोमा असे म्हणतात. कोणत्याही रंगाच्या त्वचेला या कर्करोगाचे निदान होऊ शकते. लवकर उपचार न केल्यास तो शरीरावरील इतर भागांवरही पसरु शकतो. तपकिरी रंगाचा डाग, रंग आणि आकार बदलणारे तीळ आणि दुखणारी लाल, तपकिरी जखम किंवा खरूज ही  मेलानोमा या कर्करोगाची लक्षणे आहेत.

पोलिसांसाठी अभिजीत बिचुकले अजूनही 'बिग बॉस', अटकेनंतरही दिली विशेष वागणूक

First published: June 24, 2019, 3:27 PM IST

ताज्या बातम्या