कोरोनाच्या RT-PCR टेस्टची CT व्हॅल्यू म्हणजे काय? या बिहारी बाबूच्या भन्नाट शिकवणीवर नेटकरी फिदा

कोरोनाच्या  RT-PCR टेस्टची CT व्हॅल्यू म्हणजे काय? या बिहारी बाबूच्या भन्नाट शिकवणीवर नेटकरी फिदा

पाटण्याचे खान सर इतक्या सोप्या आणि सामान्य भाषेत कोरोनाचा अवघड विषय सोपा करून सांगतात म्हणूनच त्यांचे YouTube Video व्हायरल झाले आहेत. कोरोनाचे 4 स्ट्रेन, RT PCR, CT Value म्हणजे काय हे झटक्यात समजेल, पाहा VIDEO

  • Share this:

दिल्ली, 22 एप्रिल : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत (second wave of Corona)रुग्ण संख्येचा स्फोट झालाय.आता कोरोना लसीकरण (Corona Vaccination) सुरु झालंय. रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरु झाले. पण, अजुनही कोरोनाबद्दल जागृकता निर्माण झालेली नाही. लसीकरण सुरु आहे पण एज्युवेंट केमीकल (Adjuvant Chemical) जे कोरोना व्हँक्सीनची पॉवर वाढवते त्यावर अमेरिकेने निर्यात बंदी (US bans exports) घातली आहे. त्यामुळे लसीकरणानंतरही काळजी घ्यायला हवी. कोरोनापासून वाचण्यासाठी मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सींग याचं महत्व आपल्याला माहिती झालय. मात्र, याच काळात चर्चेत आलेल्या आणखीन काही गोष्टी आपल्याला माहिती आहेत का ? कोरोना आला आणि आपल्याला RT-PCR TEST, ऑक्सिजन व्हँल्यू, पल्स रेट असे अनेक शब्द ऐकायला येऊ लागले. सध्या खान जीएस रिसिर्च सेंटर नावाने एका YouTube चॅनलवरचे व्हीडिओ (Khan GS Research Centre) चांगले व्हायरल होत आहे. ये ससुरा कोरोना की CT Value क्या है, असं म्हणत हे खान सर अगदी सोप्या भाषेत कोरोना टेस्टची माहिती देत आहे. सध्या त्यांचे व्हीडिओ व्हायरल होत आहेत.

आरटी पीसीआर टेस्ट म्हणजे काय?

आपल्या शरीरात डीएनए असतो. एव्हाना डीएनए टेस्ट म्हणजे काय ? हे सगळ्यांना माहिती झालं आहे. पण कोरोना आरएनए व्हायरस आहे. याआधी डीएनए टेस्ट करण्याची सिस्टीम आपल्याकडे होती. डीएनए डबल स्टँन्डर्ड असतो. तर, आएएनए सिंगल स्टॅडर्ड किंवा सिंगल होलिक्स असतो. त्यामुळे 2 आरएनए जोडून 1 डीएनए बनवावा लागतो. त्यासाठी रिव्हर्स ट्रान्सक्रीप्शन करावे लागते. म्हणजे आरएनए जोडणे. रिव्हर्स ट्रान्सक्रीप्शन म्हणजेच आरटी आणि पीसीआर म्हणजे पॉलिमीरास चेन रिअँक्सन.

सीटी व्हॅल्यू

आरटीपीसीआर टेस्टसाठी स्वॅब घेतला जातो. त्याचा डीएनए पाहतात. सलाईव्हातुन मिळालेल्या डीएनएच्या 35 चैन चेक केल्या जातात. त्याला सायकल थ्रीसोल म्हणतात. त्यावरुन सीटीव्हँल्यू कळते. सीटीव्हॅल्यूवरुन कोरोना इन्फेक्शन कमी आहे की जास्त हे कळते. एखाद्याची साटीव्हँल्यू 5 म्हणजे कमी किंवा एकाद्याची सीटीव्हणल्यू 35 असेल तर, कोरोना इन्फेक्शन जास्त आहे असं समजाव. पण, यावरुन बर होण्याचा कालावधी ठरवता येत नाही. सीटी व्हँल्यू कमी असणारी व्यक्ती बरी होण्यासही जास्त काळ लागू शकतो. कारण इन्फेक्शन होऊन किती काळ झाला यावरही उपचारांचा काळ ठरतो.

(Amarnath Yatra: कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे अमरनाथ यात्रेबाबत मोठा निर्णय)

ऑक्सिमीटरचा उपयोग

कोरोनामुळे ऑक्सिमिटरचे महत्व कळलेले आहे. ऑक्सिमीटर म्हणजे काय? त्याचा वापर याची माहिती घेउयात. पल्स ऑक्सिमीटर हे एक छोटे मशीन आहे. पल्स ऑक्सिमीटर ज्या हाताचा उपयोग जास्त करतो. त्या हाताच्या अंगठ्याजवळच्या बोटात घालावे. त्यानंतर बटन दाबल्यावर ते मशीन सुरु होते. यात तीन इंडिकेटर असतात. सँच्युरेटेड पल्स ऑक्सिजन इन पर्सेंट, पल्स रेट आणि परफ्युजन इनडेक्स. सँच्युरेटेड पल्स ऑक्सिजन इन पर्सेंट 94 पेक्षा जास्त असावं. पल्स रेट 90 आणि कमीतकमी 60 असावा. तर, परफ्युजन इनडेक्स 0.5 पेक्षा कमी नसावं. यावरुन ऑक्सिजन कुठपर्यंत पोहचतो. म्हणजे शरीरातील शेवटच्या पेशीपर्यंत ऑक्सीजन पोहचतो का? हे कळते..

(Lockdown: सरकारला पुढील 10 दिवसांची भीती! कडक लॉकडाऊन कशासाठी याची Inside Story)

ऑक्सिजन कमी झाल्यास धोका

ज्यांची ऑक्सिजन लेव्हल 94 पेक्षा कमी असेल त्यांनी काळजी घ्यावी. RTPCR  टेस्टही पॉझिटीव्ह आली असेल तर, डॉक्टरांच्या सल्ल्याने होम क्वारंटाईन व्हावं. मास्क लावावा. दर 2 ते 3 तसांनी ऑक्सीजन लेव्हल चेक करा. ऑक्सिजन लेव्हल 80 पेक्षा कमी असेल तर, डेक्सा मेथासोर आणि रेमडेसिवीर या इंजेक्शनचा वापर केला जात आहे. शरीरात व्हीटॅमीन सी आणि झिंकची लेव्हल चांगली असायला हवी. डायबेटीजच्या रुग्णांच्या शरीरात झिंकची मात्रा कमी असते. झिंक लेव्हल वाढवण्यासाठी अंड खावे, तर, व्हीटॅमीन सी साठी लींबूवर्गी आंबट फळ म्हणजे संत्र, मोसंबी खावीत, आवळा किंवा आवळा पावडर घ्यावी. गरम पाण्याची वाफ घ्यावी. गरम पाण्याने गुळण्या कराव्यात.

Published by: News18 Desk
First published: April 22, 2021, 10:51 PM IST

ताज्या बातम्या