इम्युनिटी वाढवण्यासाठी किती दिवस घ्यायचं Vitamin?; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

इम्युनिटी वाढवण्यासाठी किती दिवस घ्यायचं Vitamin?; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

रुग्णसंख्या वाढत असल्याने वैद्यकीय सुविधा अपुऱ्यापडत आहेत. लोकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये,यासाठी सरकारकडून आवाहन केलं जातंय.

  • Share this:

मुंबई 8 मे: देशात कोरोनाच्या (Corona)दुसऱ्या लाटेनं (Second Wave) भयानकरुप धारण केलंय. रुग्णसंख्या वाढत असल्याने वैद्यकीय सुविधा अपुऱ्यापडत आहेत. लोकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये,यासाठी सरकारकडून आवाहन केलं जातंय.

महाराष्ट्र, दिल्ली, ओडिशा, कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडू या राज्यांनी कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊन लावलंय.

गेल्यावर्षभरापासून कोरोनापासून बचावासाठी आपण मास्क घालणे,वारंवार हात धुणे,सोशल डिस्टन्स पाळणे हे सर्व नियम पाळत आहोत. व्यायामासोबत पौष्टिक आहारघेऊन आपली रोगप्रतिकार (Immunity ) शक्ती वाढवण्याकडे नागरिकांचा भर आहे.तसेच कोरोनापासून बचावासाठी अनेक जण व्हिटॅमिन डी3 (Vitamin D3),कॅल्शियम(Calcium),झिंक (Zinc)आणि मल्‍टी व्हिटॅमिन (Multi Vitamin)घेत आहेत.मात्र,या सर्वांचं जास्त सेवन आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं. त्यामुळे तेघेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. तसेच कोणत्या औषधांचा किती डोसघ्यायचा याबद्दल आम्ही आज तुम्हाला माहिती देणार आहोत.

पीजीआईलखनऊचे हृदयरोग तज्ज्ञ डॉ. नवीन गर्ग यांनी एका मीडिया चॅनलला दिलेल्यामुलाखतीत या औषधांच्या डोस बद्दल सविस्तर सांगितलंय. ते म्हणतात,कीकोरोनाचा संसर्ग वेगाने वाढतोय. त्यामुळे आपल्याला इम्युनिटी वाढवणाऱ्याकोर्सबद्दल माहिती असणं आवश्यक आहे. डॉ. नवीन सांगतात,की व्हिटॅमिन सी,डीआणि मल्‍टी व्हिटॅमिनचा कोर्स केवळ एका महिन्याचा असतो. तसेच झिंकचे जास्तसेवन करणे,आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.

डॉ. नवीन म्हणाले,की मल्‍टी व्हिटॅमिनच्या गोळ्या एका महिन्यापेक्षा जास्त घेऊ नयेत. जास्तघेतल्यास याचे विपरीत परिणाम शरीरावर दिसून येतात. कोरोनापासून बचावासाठीलोक इम्युनिटी वाढवण्याच्या नादात जास्त चवनप्राश खात आहेत. त्यामुळे अशालोकांमध्ये मधुमेह आणि हृदयासंबंधित आजारांमध्ये वाढ होत आहेत.

काय,किती दिवस घ्यायचे -

- खोकला असल्यास काढा दिवसातून एकदा घ्यायचा.

-झिंकचे जास्तीत जास्त15दिवस सेवन करायचे.

-मल्‍टी व्हिटॅमिन जास्तीत जास्त एक महिना घ्यायचे.

-व्हिटॅमिन डी-3 60Kचा एक-एक डोस महिन्यात चार वेळा किंवा महिन्यात एकदा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यायचा.

-कॅल्‍श‍ियम डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार जास्तीत जास्त एक महिना घेऊ शकता.

-व्हिटॅमिन सीचं जास्तीत जास्त एक महिना सेवन करायचं.

-तुम्हीही यापैकी कोणतेही औषध घेत असाल तर त्याआधी एकदा डॉक्टरांशी संपर्क साधून सल्ला नक्की घ्या.

First published: May 8, 2021, 6:59 PM IST

ताज्या बातम्या