विजा चमकत असताना 'अशी' घ्या तुम्ही स्वतःची काळजी

विजा चमकत असताना 'अशी' घ्या तुम्ही स्वतःची काळजी

विजा चमकत असताना मोबाइल बंद करून ठेवावा

  • Share this:

मुंबई, 23 जून - पावसाळ्यात वीज पडल्यामुळे अनेक जणांचा मृत्यू होतो. वीज पडण्याची सगळ्यात जास्त भीती ही शेतकऱ्यांना असते. विजा चमकत असताना अशावेळी कोणती काळजी घ्यायला हवी हे आज आम्ही तुम्हाला सांगणारा आहोत.

1 - शेतात काम करताना शेताजवळील घराचा आसरा घ्यावा

2 - शेतातील सुरक्षित ठिकाणाचा आसरा घेतल्य़ानंतर पायाखाली कोरडे लाकूड, प्लास्टिक, गोणपाट किंवा कोरडा पालापाचोळा ठेवावा.

3 - जास्त विजा चमकत असतील तर दोन्ही पाय जवळ करून आणि दोन्ही हात गुडघ्यावर ठेवून तळपायावर बसा.

4 - पोहणाऱ्यांनी किंवा मच्छिमारांनी त्वरित पाण्यातून बाहेर यावं.

5 - कोणत्याही झाडापासून दूर अंतरावर राहावे.

पावसाळ्यात त्वचारोग होऊ नये म्हणून 'अशी' घ्या काळजी

6 - वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू असताना पक्कं घर हे सगळ्यात सुरक्षित ठिकाण असतं.

7 - शक्यतो घराच्या जवळ कमी उंचीची झाडे लावावी.

8 - जंगलात असताना कमी उंचीच्या किंवा दाट झाडाचा आडोसा घ्यावा.

9 - विजा चमकत असताना शक्यतो वृक्ष, दलदलीचं ठिकाण आणि पाण्याच्या स्त्रोतांपासून दूर राहा.

10 - चारचाकी वाहनातून प्रवास करत असाल तर वाहनातच बसून राहणं योग्य.

11 - विजांचा कडकडाट सुरू असतातना मोकळ्या मैदानात अजिबात उभं राहू नका. कारण विजा सर्वात जास्त मोकळ्या मैदानातच पडतात.

12 - गाव, शेत, बाग किंवा घराच्या भोवती तारेचं कुंपण घालू नका. कारण ते विजेला आकर्षित करतं.

पावसाळ्यात आरोग्य उत्तम ठेवायचं असेल तर 'या' 7 गोष्टी तुम्ही करायलाच हव्या

13 - दुचाकी वाहन, ट्रॅक्टर, सायकल यांवर असाल तर तात्काळ उतरून सुरक्षित ठिकाणी जा.

14 - विजा चमकत असताना मोबाइल, टेलिफोन, फ्रीज, पाण्याचा नळ या गोष्टींचा वापर करू नका.

15 - विजेवर चालणारे यंत्र तसंच धातूपासून बनवलेल्या वस्तूंपासून दूर उभे राहा.

16 - विद्युत प्रवाह सुरू असलेली उपकरणे अजिबात वापरू नका. शक्यतो मोबाइल बंद करून ठेवावा.

First published: June 23, 2019, 6:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading