World Thyroid Day 2019 : थायरॉईडचा आजार होऊच नये यासाठी करा 'हे' उपाय

World Thyroid Day 2019 : थायरॉईडचा आजार होऊच नये यासाठी करा 'हे' उपाय

हार्मोन्स असंतुलनामुळे निर्माण होते थायरॉईडची समस्या

  • Share this:

मुंबई, 24 मे : दरवर्षी 25 मे हा दिवस जागतिक थायरॉईड डे म्हणून साजरा केला जातो. थायरॉईड ही एक धनुष्याच्या आकाराची ग्रंथी आहे जी तुमच्या गळ्यात असते. हार्मोन्स असंतुलनामुळे थायरॉईडची समस्या निर्माण होते. ही समस्या सामान्य असली तरी त्याचे परिणाम मात्र गंभीर आहेत. त्यामुळे ही समस्या निर्माणच होवू नये यासाठी सगळ्यांनी काळजी घ्यायला हवी, असं तज्ज्ञ सांगतात. आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही थायरॉईड दूर ठेवू शकाल.

आहार संतुलित ठेवा - थायरॉईडला दूर ठेवण्यासाठी आहारावर नियंत्रण ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. समतोल आहार घेताना दररोज चार ते पाच प्रकारच्या भाज्या आणि तीन ते चार प्रकारची फळं खावी.


डोक्यावरचं टेंशन तुम्हाला दूर करायचं असेल तर 'या' 5 गोष्टी कराच

प्रक्रिया केलेलं अन्न टाळावं - प्रक्रिया केलेले अन्न संतुलित आहारांत समाविष्ट केले जाऊ शकत नाही. ज्या अन्नात साखर, रंग, कृत्रिम चव असते ते आहारात समाविष्ट करू नये. आहारात चरबीयुक्त, साखरयुक्त पदार्थांचा वापर टाळावा.

लठ्ठपणा दूर ठेवा - थायरॉईड समस्या निर्माण होण्याला लठ्ठपणा कारणीभूत ठरतो. म्हणून दररोज व्यायाम आणि योग्य आहार महत्त्वाचा आहे. एका अभ्यासानुसार, 40 बीएमआय किंवा त्यापेक्षा अधिक बीएमआय असलेल्या लोकांना थायरॉईडची समस्या निर्माण होते.

सावधान! फ्रेंच किसचे आहेत गंभीर परिणाम, रिसर्चमध्ये आलं समोर

आयोडीनची पातळी - शरीरात आयोडीनचं प्रमाण कमी झालं तर थायरॉईडची समस्या निर्माण होतो. वृद्धांमध्ये विशेषतः महिलांमध्ये ही समस्या निर्माण होण्याचं प्रमाण जास्त आहे. त्यासाठी आयोडीनयुक्त पदार्थ खायला हवेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: health
First Published: May 24, 2019 04:40 PM IST

ताज्या बातम्या