Elec-widget

सनस्क्रीन म्हणून वापरा 'हे' तेल; आणखीनही आहेत 5 फायदे

सनबर्नच्या समस्येपासून वाचण्यासाठी 'या' तेलासारखा दुसरा परिणामकारक उपाय नाही

  • Share this:

उन्हापासून संरक्षण करण्यासाठी आपण सनस्क्रीनचा वापर करतो. पण अनेकांना हे ठाऊक नाही की, सनबर्नच्या समस्येपासून वाचण्यासाठी मोहरीच्या तेलासारखा दुसरा परिणामकारक उपाय नाही. मोहरीच्या तेलात व्हिटॅमिन ई असल्यामुळे सूर्य़ाच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचं रक्षण होतं. चेहऱ्यावर पडणाऱ्या सुरकुत्या घालविण्यासाठी ते परिणामकारक ठरतं.

त्वचा उजळते - मोहरीच्या तेलामध्ये आवश्यक असे अनेक गुणधर्म असल्यामुळे त्वचेला कोणतिही हानी होत नाही. खोबरेल तेलात मोहरीचं तेल मिसळून ते लावल्याने रक्तप्रवाह सुरळीत होतो आणि त्वचा उजळते.

केसांचा रूक्षपणा होतो दूर - केसांचा रुक्षपणा, खाज, कोंडा यांसारख्या केसांच्या समस्यांवर मोहरीचं तेल गुणकारी ठरतं. आठवड्यातून एकदा मोहरीचं तेल कोंबट करून त्याने केसांना मसाज करा आणि त्यानंतर अर्ध्या तासाने केस सौम्य शॅम्पूने धुवा. केसांच्या समस्या दूर होण्यास मदत होईल आणि केस चमकदार होतील.

Loading...

रॅशेसपासून सुटका - मोहरीच्या तेलामुळे रॅशेसपासून सुटका होते. यात अँटी फंगल आणि अँडी बॅक्टेरिअल तत्त्व असल्यामुळे त्वचेवर होणारे रॅशेस दूर होतात. यासीठी मोहरीच्या तेलात खोबरेल तेल मिसळून हलक्या हाताने त्वचेवर मसाज करावी.

दात साफ करण्यासाठी उपयुक्त - मोहरीच्या तेलात मीठ टाकून दररोज दात घासल्याने दात चमकदार होतात. हा प्रयोग नियमित केल्यास दातांना कीड लागत नाही, दात स्वच्छ राहतात.

पचनक्रिया सुधारते - स्वयंपाक करताना दररोज मोहरीचं तेल फोडणीसाठी वापरलं तर पचनक्रिया सुधारते. अॅसिडीटी आणि पोटाचे विकार दूर होतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: health
First Published: Jun 10, 2019 08:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...