डायबेटिजवर अतिशय उपयुक्त आहे गवती चहा; या वेळेत सेवन कराल तर होईल मोठा फायदा

डायबेटिजवर अतिशय उपयुक्त आहे गवती चहा; या वेळेत सेवन कराल तर होईल मोठा फायदा

आयुर्वेदिक औषधींचं महत्त्व खूप आहे. त्यापैकीच एक असलेल्या लेमनग्रासचे (benefits of lemongrass) आरोग्याला होणारे फायदे माहित आहेत का?

  • Share this:

मुंबई, 05 मार्च : लेमनग्रास ((Lemongrass) म्हणजेच गवती चहा हा चहामध्ये टाकल्यानंतर चहाची चव जितकी वाढवतो तितकाच तो आरोग्यासाठीदेखील (Lemongrass Benefits) फायदेशीर आहे.  आ अनेक आजारांवर उपचार करताना लेमनग्रासचा वापर केला जातो. डोकेदुखी, सर्दी, ताप इत्यादींच्या संसर्गापासून बचावासाठी लेमनग्रास वापरलं जातं.

लेमनग्रासच्या औषधी गुणांबाबत (Lemongrass Benefits in Marathi) बोलायचं तर यामध्ये अँटीबॅक्टरियल, अँटीफंगल, अँटीडिप्रेसंट गुण असतात. यात अ जीवनसत्व, फॉलिक ऍसिड, झिंक, कॉपर, लोह, पोटॅशियम, फॉस्फरस, कॅल्शिअम आणि मॅगनिज असतं. यामुळे लेमन ग्रासला मॅजिकल हर्ब असंही म्हणतात. याचे आणखी फायदे नक्की जाणून घ्या. (lemongrass uses for health)

इम्युनिटी वाढते

लेमनग्रासमध्ये अँटीबॅक्टरियल, अँटीफंगल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुण असतात. याच्या सेवनातून शरीर विविध संक्रमणांपासून दूर राखता येतं. शरीरातील साईटोकाईनची निर्मिती यातून नियंत्रित ठेवली जाते. शरीरात होऊ शकणारा संसर्ग, एखादी इजा झाल्यावर वाढणारी सूज, वेदनाही कमी होतात.

मेंदूसाठी फायदेशीर

लेमनग्रास ब्रेन बूस्टरप्रमाणे काम करतं. यात मेंदूला चालना देणारी तत्व असतात. तुम्हाला स्मरणशक्ती वाढवायची असेल तर जेवणात लेमनग्रासचा वापर करा. लेमनग्रासमध्ये अँटीडिप्रेसंट गुण असतात. नैराश्य दूर करण्यास ते मदत करतात. यात असलेली पोषकतत्व मज्जासंस्थेसाठीही उपयोगी असतात.

रुमेटाईड आर्थरायटीसमध्ये फायदेशीर

रुमेटाईड अर्थरायटीसमध्ये सांध्यात वेदना, सूज आणि सांधे आखडण्याची समस्या दिसते. ही समस्या 30 ते 60 वयोगटात दिसते. या समस्येनं ग्रस्त लोक लेमनग्रास तेलाचा उपयोग नक्की करू शकतात. कारण यात अँटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात. जे वेदनांपासून सुटका करतात. याने मालिश केल्यास वेदनेत खूप दिलासा मिळतो.

हेही वाचा चेहऱ्याची अशी अवस्था नको असेल तर Beauty Treatment पूर्वी 'या' गोष्टी लक्षात ठेवा

मधुमेहात फायदेशीर

मधुमेहात लेमनग्रास फायदेशीर ठरतं. लेमनग्रास आणि त्याच्या फुलात अँटी डायबेटिक गुण असतात. रिकाम्या पोटी लेमनग्रास खाल्ल्यास रक्तातील साखरेचा स्तर नियंत्रित होतो.

वजन कमी करण्यात उपयोगी

तुम्ही वाढत्या वजनानं अस्वस्थ असाल तर लेमनग्रास डाएटमध्ये समाविष्ट करा. यामुळे पचनशक्ती वाढते. लेमनग्रासमध्ये असलेलं सिट्रल वजन कमी करण्यात सक्षम असतं.

हेही वाचा ओ तेरी! हे काय? पाण्यात तरंगता तरंगता हवेत उडू लागलं भलंमोठं जहाज

त्वचेसाठीही फायदेशीर

यात अँटिसेप्टिक गुण असतात. पिंपल्स आणि तेलकट छिद्रांची समस्याच यातून संपते. त्वचेच्या पेशी टोन करण्यासही लेमनग्रास महत्वाचं ठरतं. अनेक प्रकारच्या स्किन इरिटेशनमध्येही लेमनग्रास गुणकारी आहे.

(Disclaimer -  या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)

Published by: News18 Desk
First published: March 5, 2021, 7:50 AM IST

ताज्या बातम्या