मुंबई, 22 जून : पिकलेली असो वा कच्ची, प्रत्येकाच्या आरोग्यासाठी चिंच गुणकारी आहे. यामध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन्स आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असतात. रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी आणि संधीवात दूर करण्यासाठी ते फायदेशीर ठरतात. चिंच खाल्ल्याने रक्त पातळ होतं. म्हणून रक्तदाब असलेल्या रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय चिंच खावू नये.
1 - चिंच खाल्ल्यान शरीरातलं इंसुलिनचं प्रमाण वाढतं.
2 - चिंचेतलं कॅल्शियम संधीवात दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतं.
3 - त्वचा सॉफ्ट आणि ग्लोइंग बनवण्यासाठी चिंच फायदेशीर आहे. कारण यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ई असतं.
केळीच्या सालीचे 'हे' 10 गुणधर्म वाचून व्हाल चकित
4 - चिंचेतले गुणतत्त्व शरीरातील फॅट्स कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात. जे वजन कमी करण्यासाठी मदत करतं.
5 - चिंचेत भरपूर प्रमाणात लोह तत्त्व असतं. ज्यामुळे अॅनिमिया टाळता येऊ शकतो.
6 - फॉस्फरसचं प्रमाणसुद्धा चिंचेत मुबलक असतं. यामुळे तोंडातील गम प्रॉब्लेम्स दूर होतात आणि दातदुखी थांबते.
7 - चिंच खाल्ल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी होतं म्हणून ह्रदय रुग्णांसाठी चिंच उत्तम आहे.
भात खाल्ल्याने खरंच वजन वाढतं का? जाणून घ्या काय आहे सत्य
8 - यातलं पोटॅशियम उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यसाठी मदत करतं.
9 - चिंचेत व्हिटॅमिन 'सी' भरपूर प्रमाणात असतं. जे शरीराची रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासठी फायदेशीर ठरतं.
10 - मसल्स मजबूत करायचे असतील तर चिंच खावी. कारण यात व्हिटॅमिन बी मुबलक प्रमाणात असतं.