डोक्यावरचं टेंशन तुम्हाला दूर करायचं असेल तर 'या' 5 गोष्टी कराच

डोक्यावरचं टेंशन तुम्हाला दूर करायचं असेल तर 'या' 5 गोष्टी कराच

दिवसभर काम करायचं असेल तर थोडीशी उसंत घेणं गरजेचं असतं. परत रिचार्ज व्हायचं असेल तर मेंदूला थोडा आराम देण्याची गरज असते.

  • Share this:

मुंबई, 16 मे : आजच्या धकाधकीच्या काळात आपण सगळेजण थोडिशीही उसंत न घेता आणि आयुष्यातल्या लहान-लहान गोष्टींचा आनंद न घेता स्वतःला कामात गुंतवून टाकतो. निसर्गतः उमलणाऱ्या फुलांकडे पाहणं तर दूर राहिलं, साधी थंड हवेची झुळुक अनुभवण्यासाठीसुद्धा आपल्याकडे वेळ नसतो. एकूणच काय तर आपण आपला सगळा वेळ ताणतणावात घालवतो. कोणतिही मशीन तेव्हाच चांगलं काम करते जेव्हा तिची वेळोवेळी सव्हिसिंग केली जाते. आपल्या शरीराचंसुद्धा असंच काहीसं आहे. दिवसभर काम करायचं असेल तर थोडीशी उसंत घेणं गरजेचं असतं. परत रिचार्ज व्हायचं असेल तर मेंदूला थोडा आराम देण्याची गरज असते.

डेंग्युपासून वाचण्यासाठी 'ही' आहेत 5 सुपरफूड्स; 'या' फळांनी वाढतात प्लेटिलेट्स

स्वतःसाठी वेळ काढा - ताणतणाव निर्माण होण्याची अनेक कारणं असतात. ऑफिसचा ताण, आर्थिक संकट, पारिवारिक समस्या किंवा अभ्यासाचा तणाव. कारण कोणतंही असो, पण त्यामुळे निर्माण होणाऱ्या तणावाचा परिणाम शरीरावर आणि मेंदूवर पडतो. यामुळे अनेक प्रकारच्या समस्यांचा तुम्हाला सामना करावा लागतो. अनेकांच्या डोक्यावर एखादं काम वेळेत पूर्ण करण्याचा ताण असतो. हा ताण कमी करायचा असेल तर स्वतःसाठी तुम्हाला थोडासा वेळ द्यावा लागेल.

आवड जोपासा - जर तुम्हाला तुमच्यावरचा ताण कमी करायचा असेल तर आवड जोपासायला शिका. ज्या गोष्टी केल्याने तुमचा उत्साह वाढतो अशा गोष्टी करा. म्हणजेच एखादं पुस्तक वाचा किंवा एखादा सिनेमा पाहा. यामुळे तुमचा ताण कमी होतो.

सावधान! फ्रेंच किसचे आहेत गंभीर परिणाम, रिसर्चमध्ये आलं समोर

मोकळ्या आणि ताज्या हवेत फीरा - कोणत्याही तणावामुळे आपली कार्यक्षमात प्रभाविक होते. जर तुम्ही पहाटेला मोकळ्या आणि ताज्या हवेत फिरलात तर तुमचा ताण लगेक कमी होतो. डोक्यात सुरू असलेला गोंधळ कमी झाल्याने तुमचा उत्साहदेखील वाढतो.

दीर्घ श्वास घ्या - जर तुमच्यावर जास्त ताण असेल तर डोळे बंद करून थोडावेळ दीर्घ श्वास घ्या. डोक्यावरचा ताण कमी करण्यासाठी हा उपाय उत्तम आहे.

डोकं खाणारं कामं आधी संपवा - डोकं खाणाऱ्या कामांमुळे अनेकदा आपल्याला थकवा जाणवतो. नंतर करू असं म्हणत ते काम टाळलं जातं. यानंतर ते काम वेळेत न झाल्याचा ताण डोक्यावर येतो. हा ताण कमी करायचा असेल किंवा येऊच नये असं वाटत असेल तर डोकं खाणारं जे काम तुम्ही टाळत आहात ते आधी संपवा.

First published: May 16, 2019, 11:46 PM IST
Tags: health

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading