डाळिंबात शेकडो आजार बरे करण्याची क्षमता; जाणून घ्या 7 फायदे

फक्त दाण्यांचाच नाव्हे तर डाळिंबाची साल, फुले, पानं, एवढंच नव्हे तर डाळिंबाच्या बियांचा आणि मुळांचासुद्धा आरोग्यासाठी लाभदायक आहे.

News18 Lokmat | Updated On: May 21, 2019 10:26 PM IST

डाळिंबात शेकडो आजार बरे करण्याची क्षमता; जाणून घ्या 7 फायदे

मुंबई, 19 मे : डाळिंबांत लोह, फॉस्फरस, कॅल्शिअम हे मुबलक प्रमाणात असतात. फक्त दाण्यांचाच नाव्हे तर डाळिंबाची साल, फुले, पानं, एवढंच नव्हे तर डाळिंबाच्या बियांचा आणि मुळांचासुद्धा आरोग्यासाठी लाभदायक आहे. तर जाणून घ्या डाळिंबाचे कोण-कोणते फायदे आहेत.

डाळिंबात व्हिटॅमित ए, व्हिटॅमित सी आणि फॉलिक अॅसिड भरपूर प्रमाणात असतं. दीर्घ आजारातून बरं झाल्यानंतर आलेला अक्षक्तपणा घालविण्यासाठी डॉक्टर डाळिंब खाण्याचा सल्ला देतात. अनेक असाध्य आजार बरे करण्याची क्षमता डाळिंबात आहे.

वजन कमी करण्यासाठी खा तूप; आरोग्य होईल सुदृढ

असे आहेत  फायदे -

1 ताप आल्यानंतर जर रुग्णाला डाळिंबाचा ज्यूस दिला तर शरीरातील उष्णता कमी होते आणि ताप उतरतो.

Loading...

2 तोंडाला दुर्गंधी येत असेल तर डाळिंबाचे दाणे चावून चावून खावे. यामुळे दुर्गंधी तर दूर होतेच शिवाय दातांमधले बॅक्टेरियासुद्धा मरतात.

3 अनेकजणाचं पोट साफ होत नाही, गॅसेस होतात, अपचन झाल्यासारखं वाटतं. अशावेळेस डाळिंब फार गुणकारी ठरतं.

तुम्ही TV समोर बसून जेवता का? लगेच मोडा ही सवय, कारण...

4 डाळिंब खाण्याने डिसेंट्री म्हणजेच जुलाब लगेच थांबतात. विशेषतः लहान मुलांना असा त्रास होत असेल तर त्यांच्यासाठी डाळिंबाचा ज्यूस फार गुणकारी ठरतो.

5 शरीरात रक्ताची कमतरता निर्माण झाल्यास डाळिंब फायदेशीर ठरतं. रक्तवर्धक आणि शक्तिवर्धक असल्यामुळे अॅनिमिया होण्याची भीती राहत नाही.

6 डाळिंबात मुबलक प्रमाणात फॉलिक अॅसिड असतं. त्यामुळे गर्भवतील दररोज डाळिंबाचा ज्यूस दिला तर पोटातल्या बाळाची व्यवस्थीत वाढ होते.

7 बाजारात डाळिंबाचे सरबत, डाळिंबाचा रस, डाळिंबाच्या सालीची पावडर मिळते. पण यात सर्वात जास्त फायदेशीर हे डाळिंबाचे दाणे सोलून खाणे दास्त लाभदायक असतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: health
First Published: May 21, 2019 10:26 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...