S M L

20 दिवसांत कमी होईल तुमचं 15 किलो वजन; त्यासाठी करा 'हे' उपाय

शारीरिक श्रम न करता वजन कमी करायचं असेल तर जीरं आहे उत्तम

News18 Lokmat | Updated On: May 22, 2019 09:13 PM IST

20 दिवसांत कमी होईल तुमचं 15 किलो वजन; त्यासाठी करा 'हे' उपाय

मुंबई, 22 मे : वजन कमी करण्यासाठी अनेकजण तासंतास जीममध्ये जाऊन घाम गाळतात. एवढंच नव्हे तर खाण्या-पिण्यावरसुद्धा नको तितकं नियंत्रण ठेवून डायटिंग केलं जातं. मात्र तरी सुद्धा त्याच्या पदरी निराशाच पडते. पण आज आम्ही तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहोत, ज्याच्या प्रयोगाने तुम्ही 20 दिवसांत 15 किलो वजन कमी करु शकाल.

मेहनत न करता वजन कमी करायचं असेल तर 'जीरं' हे रामबाण इलाज आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, रोज एक चमचा जीरं जर तुम्ही सेवन केलं तर तीनपट वेगवान चरबी कमी होते. वजन कमी करण्यासाठी जीरं हे अत्यंत प्रभावी असल्याचं एका रिसर्चमध्ये समोर आलं. 88 लठ्ठ महिलांवर हा रिसर्च करण्यात आला. जीरं सेवनामुळे ना केवळ एक्स्ट्रा कॅलरीज बर्न होतात, तर शरीरातलं मेटाबॉलिजमसुद्धा वाढतं आणि पचनशक्तीही वाढते.

क्षणात दूर होईल किचनमधली दुर्गंधी, त्यासाठी करा 'हे' उपाय


जीऱ्यात लोह तत्त्व मुबलक प्रमाणात असतं. शिवाय मॅग्नेशियम, कॅल्शियम, झिंक आणि फॉस्फरस सुद्धा भरपूर प्रमाणात असतं. दररोज जीरे पावडर सेवन केली तर शरीरातील अनावश्यक चरबी झडते आणि वजन कमी होतं. जीरं हे प्रत्याकाच्या स्वयंपाकघरात असतं. यामुळे फक्त जेवणाचीच चव वाढत नाही तर तुमचं वजन कमीसुद्धा कमी करतं. 20 दिवस जर तुम्ही जीरे किंवा पाण्याबरोबर जीरे पावडर सेवन केली तर 15 किलो वजन कमी होतं असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

असं करा सेवन -

1 - पेलाभर पाण्यात एक मोठा चमचा जीरा रात्रभर भिजवून ठेवा आणि सकाळी ते उकळून चहासारखं घ्या. तळाशी राहिलेलं जीरं फेकून न देता ते चावून खा. लक्षात ठेवा की हे पाणी प्यायल्यानंतर तासभर काहीच खाऊ नका. असं रोज केल्याने शरीरात जमा झालेली चरबी झडून जाते.

Loading...

उन्हाळ्याच्या सुट्टीत कुठे गेला नसाल, तर हे आहे सर्वांत कूल डेस्टिनेशन

2 - भाजलेला थोडासा हिंग, काळं मीठ आणि जीरं हे सारख्या प्रमाणात घेऊन त्याचं चूर्ण तयार करा. दररोज 1-3 ग्राम या प्रमाणात ते दिवसातून दोनवेळा दह्यातसोबत घ्या. यामुळे शरीरातली अनावश्यक चरबी झडून जाते आणि लठ्ठपणा कमी होतो. याशिवाय कोलेस्ट्रॉलसुद्धा कमी होतं आणि रक्ताभिसरणं सुरळीत होतं.

3 - दोन चमचे जीरं रात्रभर पाण्यात भीजत ठेवून सकाळी ते पाणी उकळून घ्या. जीरे पाण्यातून वेगळं करा आणि त्यात अर्ध लिंबू पिळा. लागोपाठ दोन आठवडे सकाळी उपाशी पोटी हे पेय घेतल्यास फरक तुमच्याच लक्षात येईल.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 22, 2019 07:41 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close