तुम्ही कायम ACमध्ये असता का? 'हे' आहेत दुष्परिणाम

तुम्ही कायम ACमध्ये असता का? 'हे' आहेत दुष्परिणाम

घरात आणि ऑफिसमध्ये एसी; एवढंच नव्हेत तर प्रवासासाठीसुद्धा एसी बसला किंवा कॅबला प्राधान्य दिलं जातं.

  • Share this:

मुंबई, 26 मे : उष्णतेपासून सुटका मिळविण्यासाठी मोठ्या प्रमाणात AC चा वापर होऊ लागला आहे. कुलरसाठी आवश्यक तितक्या पाण्याचं नियोजन करता येत नसल्यामुळे घरोघरी आणि प्रत्येक ऑफिसमध्ये एसीचा वापर सर्सास वाढला आहे. एवढंच नव्हेत तर प्रवास करण्यासाठी देखील एसी बसला किंवा एसी कॅबला प्राधान्य दिलं जातं. परंतू, एसीची हवा आपल्या शरीरासाठी किती हानिकारक असते हे तुम्हाला माहित आहे का? सतत एसीच्या संपर्कात राहणाऱ्यांना अनेक आजार होण्याची शक्यता असते.

नियमित व्यायाम केल्याने मेंदू होतो तल्लख; अशी वाढवा कार्यक्षमता

एसी सुरू करण्याआधी सगळी दारे आणि खिडक्या बंद केली जातात, त्यामुळे स्वच्छ आणि मोकळी हवा आपल्या शरीराला मिळतच नाही परिणाणी आपल्या शरीराचा विकास खुंटतो.

अन्य साधनांच्या तुलनेत एसमुळे सगळ्यात जास्त थंडावा निर्माण होतो. मानवाचं शरीर एका विशिष्ठ पातळीपर्यंतच थंडी सहन करू शकतं,  त्यानंतर त्याचे वाईट परिणाम होतात. बरेचदा एसीच्या थंडाव्यामुळे आपलं शरीर इतकं जास्त गार पडतं, की ते आपल्याला कळत देखील नाही. परिणामस्वरूप हाडांच्या समस्या निर्माण होतात.

तुमची झोप अपुरी राहते का? वाचा 'हे' दुष्परिणाम

शरीरावर आलेला घाम लगेच वाळतो, याचबरोबर शरीरातली उष्णता देखील ओढली जाते. शरीरात पाण्याची कमतता निर्माण झाली तरी एसीच्या वातावरणात ती आपल्याला जाणवत नाही. पाण्याचं प्रमाण कमी झालेलं असातानसुद्धा शरीरात तहान भागविली जात नाही. यामुळे हळू-हळू अकाली वृद्धत्व आल्यासारखं शरीरावर सुरकुत्या दिसू लागतात. एकूणच काय तर आणखी वेगवेगळ्या आजरांचा सामना करावा लागतो. त्वचेचे रोगही बळावतता.

कान दुखत असेल तर करा 'हा' घरगुती उपाय

उष्णतेपासून बचाव करण्यासाठी लावलेल्या एसीमुळे फायदे कमी आणि नुकसान जास्त होतं. अशात आरोग्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे आपल्याला त्याची मोठी किंमत मोजावी लागते. म्हणून एसीचा वापर तरताना त्याच्या परिणामांचीसुद्धा दखल घ्यायला हवी.

First published: May 26, 2019, 4:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading