पावसाळ्यात दूर ठेवा 'हे' आजार; करा घरगुती उपाय

पावसाळ्यात दूर ठेवा 'हे' आजार; करा घरगुती उपाय

पावसाळ्यात सगळ्यात जास्त भीती असते ती डेंग्यू, मलेरिया आणि चिकुनगुनिया या आजारांची

  • Share this:

मुंबई, 23 जून : पावसाळ्यात सगळ्यात जास्त भीती असते ती डेंग्यू, मलेरिया आणि चिकुनगुनिया या आजारांची. यापासून संरक्षण कसं करायचं हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या आजारांचे अनेक उपाय घरातच तुम्हाला सापडतील.

पावसामुळे उष्णतेपासून सगळ्यांना दिलासा मिळत असाला तरी, पावसाळ्यात आरोग्याच्या समस्या वाढतात. डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया आणि स्वाइन फ्लू यांसारखे आजार बळावतात. या आजारांपासून स्वतःचं करण्यासाठी काही घरगुती उपाय फायदेशीर आहेत.

विजा चमकत असताना 'अशी' घ्या तुम्ही स्वतःची काळजी

1 - दुग्धजन्य उत्पादनांमध्ये बकरीच्या दुधाचा समावेश करावा. बकरीच्या कच्च्या दुधात अनेक पोषक घटक असतात, जे प्लेटलेट्सची संख्या वाढवून आजाराला नैसर्गिकरित्या दूर ठेवतात.

2 - पपईच्या पानांचा रस हा डेंग्युसाठी फायदेशीर ठरतो. यामुळे शरीरातील प्लेटलेट्स झपाट्याने वाढतात. त्यासाठी दररोज एक कप पपईच्या पानांचा रस घ्यायला हवा.

3 - गुळवेल, काळे मिरे, सैंधव मीठ आणि कच्ची हळद एकत्र करून बनवलेला काढासुद्धा लाभदायक ठरतो. यामध्ये खडीसाखर किंवा मध मिसळू शकता.

4 - मोसंबीसुद्धा शरीरातील मृत पेशींना नाहीसं करते. यामध्ये अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात. जे चिकुनगुनिया सारख्या आजारांना दूर ठेवतात.

पावसाळ्यात त्वचारोग होऊ नये म्हणून 'अशी' घ्या काळजी

5 - पावसाळ्यात अनेकांना सांधेदुखीचा त्रास होतो. त्यासाठी गुळवेल पूड, अश्वगंधा पूड आणि सुंठ एकत्र करून त्याचा काढा तयार करा. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. यामुळे शरीरातील उष्णता वाढू शकते. त्यासाठी यात कडुलिंब आणि तुळससुद्धा मिसळू शकता. हा काढ्यामुळे सांधेदुखी दूर होईल.

First published: June 23, 2019, 8:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading