बद्धकोष्ठता डोकेदुखी ठरते आहे का? करा 'हे' 10 घरगुती उपाय

बद्धकोष्ठता होण्याचे सर्वात मोठं कारण म्हणजे शरीरात निर्माण होणारी पाण्याची कमतरता.

News18 Lokmat | Updated On: May 24, 2019 08:45 PM IST

बद्धकोष्ठता डोकेदुखी ठरते आहे का? करा 'हे' 10 घरगुती उपाय

मुंबई, 24 मे : मलावरोध म्हणजेच बद्धकोष्ठता ही एक अशी समस्या आहे जी सामान्य वाटत असली तरी ज्या व्यक्तीला याचा त्रास होतो त्याचा जीव अगती मेटाकुटीस आलेला असतो. जर या त्रासापासून तुम्हाला मुक्त व्हायचं असेल त्यांच्यासाठी आज आम्ही काही घरगुती उपाय सांगणार आहोत, ज्यामुळे लगेच आराम मिळेल.

सायकलिंगमुळे कमी होतो मुलांचा लठ्ठपणा; अभ्यासात आलं समोर

1 - बद्धकोष्ठतेची समस्या असलेल्या व्यक्तीने दररोज सकाळी उठल्यानंतर पेलाभर कोंबट पाण्यात 1 लिंबू पिळून ते प्यावं. असं केल्याने मलावरोधाचा त्रास कमी होतो.

2 - अनेकजणांना शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाली की बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. अशा व्यक्तीने दिवसभरात किमान 6 लिटर पाणी प्यायला हवं. जास्तीत जास्त पाणी प्यायल्यामुळे शरीरातील विषारी तत्त्व बाहेर निघून जातात आणि आरोग्या उत्तम राहतं.

3 - एका ठिकाणी बसून काम करणाऱ्यांना हा त्रास जास्त होतो. जर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर दररोज सकाळी किमान अर्धा तास तुम्ही मोकळ्या हवेत फिरायला हवं. असं केल्याने तुम्हाला लगेच फरक माहित पडेल.

Loading...

World Thyroid Day 2019 : थायरॉईडचा आजार होऊच नये यासाठी करा 'हे' उपाय

4 - फायबरचं प्रमाण जास्त असलेल्या पदार्थांच्या सेवनामुळेसुद्धा बद्धकोष्ठता दूर होते. म्हणून परिपूर्ण आहार तुम्ही घ्यायला हवा.

5 - हे सगळे उपाय केल्यानंतरसुद्धा तुमची ही समस्या दूर होत नसेल तर जेवताना एक चमचा ऑलिव्ह ऑइल सेवन करावं. असं केल्याने दीर्घकाळापासून होणारा बद्धकोष्ठतेचा त्रास लगेच कमी होतो.

6 - वेलदोडेसुद्धा यासाठी गुणकारी आहेत. अॅसीडिटीच्या समस्येवर ते अत्यंत गुणकारी आहेत. बद्धकोष्ठतेचा त्राससुद्धा वेलदोड्यामुळे कमी होतो. त्यासाठी तीन वेलदोडे बारीक करून उकळत्या पाण्यात टाका. थंड झाल्यानंतर ते पिल्यास लगेच आराम पडतो.

सकाळी उठल्यावर झोप नीट झाली नाही असं वाटतं? वेळीच लक्ष द्या हे असू शकतं कारण

7- बेकिंग सोडा म्हणजेच खाण्याचा सोडासुद्धा बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यासाठी उत्तम आहे. एक कप गरम पाण्यात 1 चमचा बेकिंग सोडा टाकून ते पाणी पिल्यानेसुद्धा लगेच फरक पडतो.

8 - कपभर दुधात अर्धा चमचा हळद आणि एक चमचा तूप टाकलेलं मिश्रण घेतल्यानेसुद्धा मलावरोधाचा त्रास कमी होतो.

9 - कपभर उकळलेल्या दुधात दोन अंजीर घालून ते आणखी उकळावं. हे प्यायल्याने बद्धकोष्ठता कमी होते.

10 - सकाळी उठल्यानंतर पेलाभर पाण्यात दोन चमचे मध टाकून ते प्यावं. हा उपाय बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी रामबाण उपाय आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 24, 2019 08:45 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...