डँड्रफ मुळापासून घालवण्यासाठी करा 'हे' 8 घरगुती उपाय

केसांना लावयच्या शॅम्पूमध्ये काही घरगुती पदार्थ मिसळे तर डँड्रफची समस्या दूर होते

News18 Lokmat | Updated On: Jun 21, 2019 06:07 PM IST

डँड्रफ मुळापासून घालवण्यासाठी करा 'हे' 8 घरगुती उपाय

मुंबई, 21 जून - अनेकांना डँड्रफचा त्रास होतो. ते घालविण्यासाठी बाजारातून अनेक प्रोडक्ट विकत घेतले जातात. मात्र, त्यांचा हवा तितका उपयोग होतोच असं नाही. उलट त्यांच्या वापराने केसांवर त्यांचे दुष्परिणाम जास्त होतात. डोक्यातला कोंडा काढताना केसांची हानी होऊ नये यासाठी आज आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत. ज्यांचा तुम्हाला लगेच फायदा होईल. शॅम्पूमध्ये काही घरगुती पदार्थ मिसळे तर डँड्रफची समस्या दूर होते.

1 - शॅम्पूमध्ये आवळ्याचा रस मिसळून तो लावल्यानेसुद्धा कोड्याची समस्या दूर होते.

पावसाळ्यात आरोग्य उत्तम ठेवायचं असेल तर 'या' 7 गोष्टी तुम्ही करायलाच हव्या

2 - शॅम्पूमध्ये गुलाब जल मिक्स केल्यानेसुद्धा ही कोंड्याची समस्या दूर होते.

3 - शॅम्पूमध्ये मध मिसळून लावल्यास केस कळणं पूर्णतः थांबतं.

Loading...

4 - केस गळती थांबवायची असेल तर शॅम्पूमध्ये ग्रीन टी मिसळून तो लावावा. याने केस दाट होतात.

5 - शॅम्पूमध्ये लिंबाचा रस मिसळल्याने कोंड्याची समस्या दूर होते.

'हे' फळ खाल्ल्याने 20 टक्क्यांनी वाढते शरीरातली उर्जा; जाणून घ्या आणखी फायदे

6 - साखर मिक्सरमध्ये बारीक करून ती शॅम्पूमध्ये मिसळून लावल्याने केस मुलायम आणि चमकदार होतात.

7 - शॅम्पूमध्ये ऑलिव्ह ऑइल मिसळून लावल्याने केसांची चमक वाढते.

8 - शॅम्पूमध्ये एलोवेरा जेल मिसळून लावल्याने खाज कमी होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 21, 2019 04:46 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...