सावधान! फ्रेंच किसचे आहेत गंभीर परिणाम, रिसर्चमध्ये आलं समोर

सावधान! फ्रेंच किसचे आहेत गंभीर परिणाम, रिसर्चमध्ये आलं समोर

'गॉनोरिया' हा आजार जोडीदाराला फ्रेंच किस केल्याने पसरत असल्याची धक्कादायक माहिती आली समोर

  • Share this:

नवी दिल्ली, 16 मे : असुरक्षित संबंधांमुळे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज std किंवा सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन sti सारखे गंभीर आजार होऊ शकतात. याच कारणामुळे 'गॉनोरिया' या नावाचा आजारसुद्धा होऊ शकतो. जगभरात हा रोग सामान्य आहे जो बहुतेकांना होतो. वास्तविक पाहात हा आजार असुरक्षित लैंगिक संबंधांमुळे पसरतो. पण अलिकडेच या आजाराबाबत करण्यात आलेल्या रिसर्चमध्ये एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

तांब्याच्या भांड्यातलं पाणी प्यावं... 'ही' आहेत 10 कारणं

'गॉनोरिया' हा आजार जोडीदाराला किस केल्याने पसरत असल्याची धक्कादायक माहिती या रिसर्चमध्ये समोर आली आहे. जोडीदाराला किस करताना या आजाराचे विषाणू तुमच्या शरीरारत प्रवेश करतात. ज्याचा दुष्परिणाम सर्वात पहिले तुमच्या घशावर पडतो. यासंदर्भात 'सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन' या नावाच्या मासिकात प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, फ्रेंच किस करताना आणि दीर्घकाळापर्यंत चुंबन घेताना हा आजार पसरतो. बायसेक्शुअल म्हणजेच समलिंगी संबंध ठेवणाऱ्यांनासुद्धा तो होऊ शकतो. या आजाराचा प्रभाव रेक्टम, गळा आणि डोळ्यांवर पडतो. कोणतंच औषध अंगी लागत नसल्याने 'गॉनोरिया' हा आजार असाद्य मानला जातो.

डेंग्युपासून वाचण्यासाठी 'ही' आहेत 5 सुपरफूड्स; 'या' फळांनी वाढतात प्लेटिलेट्स

जन आरोग्य संघटनांनी यासंदर्भात लोकांना जोडीदारासोबत सुरक्षित संबंध प्रस्थापित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. वास्तविक पाहात दिर्घकाळापर्यंत फ्रेंच किस केल्याने हा आजार पसरत असल्याने, याबाबत केवळ सल्ला देणं पुरेसं नसल्याचं शोधकर्त्यांनी म्हटलं आहे.

या संदर्भात 2016-17 मध्ये ऑस्ट्रेलियातील मेलर्बन इथे सार्वजनिक आरोग्य सेवा देणाऱ्या संघटनांनी 3100 समलिंगी संबंध ठेवणाऱ्यांच्या रक्ताची तपासणी केली. त्यानंतर 'गॉनोरिया' हा आजार हेट्रोसेक्शुअल्सच्या तुलनेत बायसेक्शुअल लोकांमध्ये जास्त प्रमाणात पसरत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला.

 

First published: May 16, 2019, 11:34 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading