उष्णतेमुळे तुमचे डोळे जळजळ करतात का? उन्हाळ्यात अशी घ्या डोळ्यांची काळजी

उष्णतेमुळे तुमचे डोळे जळजळ करतात का? उन्हाळ्यात अशी घ्या डोळ्यांची काळजी

डोळे हे अत्यंत नाजूक असतात, आपला थोडासाही निष्काळजीपणा डोळ्यांसाठी महागात पडू शकतो.

  • Share this:

मुंबई, 19 मे : उन्हाळ्यात अनेक आजार झपाट्याने पसरतात. रखरखत्या उन्हामुळे या दिवसांत हवेत धुळीचे कण मोठ्या प्रमाणात असतात, जे तुमच्या त्वचेसाठी आणि डोळ्यांसाठी हानिकारक ठरतात. याच कारणामुळे उन्हाळ्यात डोळ्यांचे आजार वाढतात. डोळे जळजळतात, लाल होतात, खाजवतात आणि सूजही येते. डोळे हे अत्यंत नाजूक असतात, आपला थोडासाही निष्काळजीपणा डोळ्यांसाठी महागात पडू शकतो. त्यामुळे उन्हाळ्यात डोळ्यांची निगा कशी राखावी आणि ते कसे सुरक्षित ठेवावे याचे काही सोपे उपाय आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

पालक म्हणून तुम्ही आपल्या मुलांसोबत असं तर वागता नाही ना? करू नका 'या' चूका

 - घराबाहेर पडताना धुळीचे कण डोळ्यात जाऊ नये म्हणून उन्हाळ्यात सन ग्लासेसचा वापर करावा. यामुळे तुमचे डोळे सुरक्षित राहतील.

- दिवसभरात 5-6 वेळा तरी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवावा. असं केल्याने तुम्हाला ताजंतवानं तर वाटतंच शिवाय डोळ्यात गेलेले धुळीचे कणसुद्धा पाण्याबरोबर बाहेर पडतात.

- उन्हाळ्यात उष्णतेमुळे डोळे कोरडे पडतात, त्यासाठी आयड्रॉपचा वापर करावा. पण कोणतंही आयड्रॉप वापरण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्य आहे. अन्था डोळ्यांना आणखी नुकसान पोहोचू शकतं.

डोक्यावरचं टेंशन तुम्हाला दूर करायचं असेल तर 'या' 5 गोष्टी कराच

- दुसऱ्या व्यक्तीने वापरलेला टॉवेल किंवा रुमाल अजिबात वापरू नका. कारण यामुळे डोळ्यात इन्फेक्शन होऊ शकतं.

- 'ड्राय आय सिंड्रोम' म्हणजेच तुमचे डोळे सतत कोरडे पडत असतील तर AC चं जास्त कुलिंग, कॉम्प्युटरचा जास्त वापर तसंच लाइट बंद करून मोबाइलचा वापर टाळावा.

 

First published: May 19, 2019, 11:42 AM IST
Tags: health

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading