सावधान! काकडी खाल्ल्यानंतर पाणी पिण्याचे 'हे' आहेत दुष्परिणाम

सावधान! काकडी खाल्ल्यानंतर पाणी पिण्याचे 'हे' आहेत दुष्परिणाम

काकडीमध्ये पाण्य़ाचं प्रमाण जास्त आणि भरपूर प्रमाणात पोषक तत्त्व असल्यामुळे उन्हाळ्यात काकडी खाणं फादेशीर ठरतं.

  • Share this:

मुंबई, 30 मे  : एकीकडे उन्हामुळे सगळ्या नद्या आणि नाले कोरडे पडत आहेत, तर दुसरीकडे भरपूर पाण्याची मात्रा असलेल्या काकडी, टरबूज आणि खरबूज सारख्या फळांचं भरघोस उत्पादन होतं. आश्चर्यात टाकणारी ही बाब असली तरी, या फळांचं सेवन केल्यानंतर पाणी पिणं धोकादायक ठरू शकतं. उन्हाळ्यात काकडी खाण्याचे अनेक फायदे आहेत. काकडीमध्ये पाण्य़ाचं प्रमाण जास्त आणि भरपूर प्रमाणात पोषक तत्त्व असल्यामुळे उन्हाळ्यात काकडी खाणं फादेशीर ठरतं. बहुतांश लोकं वजन कमी करण्यासाठीसुद्धा काकडी खातात. काकडीमध्ये मोठ्या प्रमाणात खनिज तत्त्व, व्हिटॅमिन आणि इलेक्ट्रोलाइट्स असतात. म्हणूनच उन्हाळ्यात काकडी खाणं लाभदायक ठरतं.

शाहीद कपूरने शेअर केलेले व्हेकेशन फोटो पाहिलेत? 'ही' आहेत जगातली टाॅप 5 बिच डेस्टिन्शन्स

काकडी खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणं तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकतं, असं आहारतज्ज्ञ सांगतात. काकडी खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिल्याने शरीरातलं मेटाबॉलिजम खराब होतं, तसंच अपचनाचीही समसया निर्माण होते. आणखी जाणून घ्या याबाबची तथ्थ.

पोषक तत्त्वांनी भरपूर असलेल्य़ा काकडीमध्ये जवळपास 95 ट्क्क पाणि असतं. ज्यामुळे उन्हाळ्यात मानवी शरीरात पाण्याची कमतरता अजिबात निर्माण होत नाही. तसंच यात व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, कॉपर, मॅग्नेशियम, आणि सिलिका सारखे तत्त्वही असतात. जर काकडी खाल्ल्यानंतर जर तुम्ही लगेच पाणी प्यायलात, तर तुमच्या शरीराला काकडीतल्या पोषक तत्त्वांचा उपयोग नाही. वास्तविक पाहता, कच्चं सलाद खाल्ल्यानंतर तुम्ही पाणी प्यायलात तर तुमचं शरीरातीले पोषक तत्वं पूर्णतः सोकले जात नाहीत. त्यामुळे काकडी खाल्ल्यानंतर अजिबात पाणी पिऊ नेये असा सल्ला आहार तज्ञ देतात.

मृत्यूनंतर आपोआप डिलिट होणार तुमचं गुगल अकाउंट, जाणून घ्या कसं

काकडी खाल्ल्यानंतर तु्म्ही लगेच पाणी प्यायलात, तर शरारीतलं ग् लायसेमिक इंडक्स (GI) झपाट्यानं कमी होतं. यामुळे पचनक्षमता आणि अब्सॉर्ब करण्याची प्रिक्रिया मंदावते. असं झाल्यास तुमचं शरीर तुमच्या आतड्यांकडून जास्त काम करून घेतं आणि इतरवेळेस सारखं तुमचं शरीर काम करणं बंद करतं.

First published: May 30, 2019, 3:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading