मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी लाभदायक आहेत 'ही' 5 आसने

मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी लाभदायक आहेत 'ही' 5 आसने

'ही' पाच आसने केल्याने मधुमेह नियंत्रणात राहतो

  • Share this:

मुंबई, 18 जून : जगभरात मधुमेहींची संख्या झपाट्याने वाढत आहे. यात आता तरुणांची आणि बालकांचीसुद्धा भर पडू लागली आहे. मधुमेह या आजाराला नियंत्रणात ठेवलं नाही तर रुग्णाच्या हृदयावर, रक्तवाहिन्यांवर, डोळ्यांवर, किडनीवर परिणाम होतो. दृष्टी जाणं, किडन्या निकामी होणं, हृदयाचा झटका या समस्या उद्भवतात. आज आम्ही तुम्हाला काही उत्तम आसने सांगणार आहोत, जे नियमित केल्याने तुम्ही मधुमेह नियंत्रणात ठेऊ शकाल.

1 - वज्रासन - शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत राहण्यासाठी वज्रासन नियमित करावं. हे आसन केल्याने अन्नपचन व्यवस्थीत होतं. शिवाय पाठीचं दुखणंही कमी होतं.

(वाचा : टेन्शन आलंय? या 10 सोप्या गोष्टी करून पाहा)

2 - भस्त्रिका - यामुळे शरीरातील रक्तप्रवाह तर सुरळीत होतोच शिवाय कफचा त्राससुद्धा कमी होतो. तसंच एकाग्रता वाढवण्यसाठी हे आसन फायदेशीर आहे.

3 - पश्चिमोत्तानासन - हे आसन केल्याने पाठ, मांडीचे स्नायू आणि नितंब ताणले जातात. तसंच ओटीपोट, खांदे या अवयवांसाठीसुद्धा हे आसन फायदेशीर आहे.

4 - अर्धमत्स्येंद्रासन - हे आसन पाठीच्या मणस्यांसाठी लाभदायक आहे. शिवाय पाठीचा कणा लवचिक ठेवण्यासाठीसुद्धा हे आसन नियमित करायला हवं.

(वाचा : तुमच्या मुलांना फिट ठेवायचं असेल, तर त्यांना शाळेत 'असं' पाठवा)

5 - भ्रामरी - हे आसन नियमित केल्याने मनावरचा ताण कमी होतो. चिडचिड होत असेल तर ती कमी होते. मधुमेहींसाठी हे पाचही आसन फायदेशीर आहेत. मधुमेहींनी दररोज सकाळी उठल्यानंतर ही आसने केली तर मधुमेह नियंत्रणात राहतो.

लाजा धरा लाजा, पाकच्या आजीनी सर्फराजला झापलं, VIDEO व्हायरल

First published: June 19, 2019, 6:55 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading