ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी धने आहेत गुणकारी; 'हे' आहेत फायदे

ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी धने आहेत गुणकारी; 'हे' आहेत फायदे

धन्यामुळे भाजीला तर चव येतेच शिवाय आरोग्यही उत्तम राहतं.

  • Share this:

मुंबई, 23 मे : जेवणाची चव वाढवण्यासाठी प्रत्येकाच्या स्वयंपाक घरात धने असतात. स्वयंपाक घरातील मसाल्यातील धने हे मधुमेहींसाठी अत्यंत गुणकारी आहेत. रक्तातली साखर नियंत्रित ठेवण्यासाठी धने रोज खावे. धन्याचं पाणी नियमित प्यायल्याने अनेक फायदे होतात. जाणून घ्या धन्याचे फायदे.

पूर्वीच्या काळी प्रत्येकाचं स्वयंपाक घर मसाल्यांनी भरलेलं रहायचं. त्यामुळे सद्याच्या तुलनेत पूर्वीच्या लोकांचं आरोग्य उत्तम रहायचं. धन्यामुळे भाजीला तर चव येतेच शिवाय आरोग्यही उत्तम राहतं. एक लहान चमचा धनेपूड जर तुम्ही दररोज पाण्यासोबत सेवन केली तर रक्तातली साखर नियंत्रित राहते. धने ज्याला लागतात ती हिरवी कोथिंबीरसुद्धा आरोग्यासाठी लाभदायक आहे.

'माउंट एव्हरेस्ट'वर लागलाय 'ट्रॅफिक जाम'; 200 हून अधिक गिर्यारोहक खोळंबले

धने आणि गोखरूचा काढा उकळून त्यात थोडं तूप घालून प्यायल्यास मूत्रघाताचे विकार दूर होतात. धने हे पाचक असतात. त्याचा सुगंध उत्तेजक असतो. अजीर्ण झालं असेल तर 10 ग्रॅम धन्याची पूड नियमित घ्यावी म्हणजे पचनसंस्था सुधारते. धन्याचं तेल हे वातहारक असल्याने त्याचा पोटशुळावर फायदा होतो.

पित्तज्वरामुळे दाह होत असेल तर दररोज रात्री धने पाण्यात भिजत घालावे. सकाळी ते पाणी गाळून घेऊन त्यात 10 ग्रॅम खडीसाखर घालावी आणि ते पाणी प्यावे. धने आणि खडीसाखर घेतल्याने दाह शांत होतो.

पालक म्हणून तुम्ही आपल्या मुलांसोबत असं तर वागता नाही ना? करू नका 'या' चूका

पोटात दुखत असेल तर 10 ग्रॅम धने घ्यावेत. त्याची बारीक पूड करावी आणि ते कोंबट पाण्याबरोबर घ्यावे. धन्याचा काढा रोज घेतला तर बलवृद्धी होते. श्‍वसनाच्या विकारावर धने अतिशय उपयुक्‍त आहे. धने अणि बेदाणे एकत्र करून त्याचा काढा नियमित घेतल्यास दमा बरा होतो. ताप कमी करण्यासाठीसुद्धा धने गुणकारी आहेत. धने आणि खडीसाखर पाण्यात तासभर भिजवून गाळलेलं मिश्रण आमविकाराने त्रस्त रुग्णाला द्यावं. लगेच घाम येतो आणि ताप उतरतो.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: health
First Published: May 24, 2019 12:06 AM IST

ताज्या बातम्या