मुंबई, 19 मे : आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाच्या मनात नको असलेल्या गोष्टी साचून राहतात. मनातल्या 90 टक्के गोष्टी या अनावश्यक असतात. त्या काढून टाकल्या तरच जीवनाचा खरा आनंद तुम्हाला अनुभवता येतो. नको असलेला हा 'कचरा' काढून टाकण्यासाठी मनाची एकाग्रता आवश्यक असते.
एकाच वेळी अनेक कामं करण्याची म्हणजेच मल्टिटास्किंगची कला प्रत्येकालाच अवगत असते. अनेकांना याचा अभिमान वाटत असला तरी एकाच वेळेस अनेक जबाबदाऱ्या पार पाडताना भावन आणि साधक-बाधक विचारण्याची क्षमता असलेल्या मेंदूतील केंद्रावर आनावश्याक ताण पडतो. यामुळे मनात उदासिनता, नैराश्य आणि चिंता निर्माण होते. अशावेळेस अपेक्षांचं ओझं आपम कमी केलं तरच जीवनात आनंदाची अनुभूती होते. मल्टिटास्किंग करत असताना आनंदी जीवन जगायचं असेल मनाची एकाग्रता ही पहिली पायरी प्रत्येकाला चढावी लागते.
पालक म्हणून तुम्ही आपल्या मुलांसोबत असं तर वागता नाही ना? करू नका 'या' चूका
काय केलं तर वाढेल एकाग्रता?
मनाची एकाग्रता साधण्यासाठी तसंच मेंदूला तजेला देण्यासाठी अनेक पर्याय आहेत. सगळ्या गोष्टी आपण स्वतःच करायला हव्यात हा अट्टहास पहिले सोडायला हवा. डोक्यावरचं ओझं कमी करणं म्हणजे एखाद्या प्रश्नापासून दूर पळणं असा अनेकांचा गैरसमज असतो. त्यामुळे प्रत्येकजण हजारो गोष्टींचं ओझं घेऊन जगतात, असं तज्ज्ञ सांगतात. नकारात्मकता वरचढ होण्याआधी स्वतःच्या अंतरातला आवाज ऐका. यामुळे नको असलेल्या गोष्टींएवजी, स्वतःला अपेक्षित असलेल्या गोष्टींकडे वळवलं तर आत्मिक समाधान मिळतं.
डोक्यावरचं टेंशन तुम्हाला दूर करायचं असेल तर 'या' 5 गोष्टी कराच
चहा, कॉफी, थंड पेयांमुळेसुद्धा काही काळापुरता दिलासा मिळतो. मात्र, त्याचे परिणाम विपरित होतात. मेंदूचं योग्य पोषण करण्यासाठी व्यक्तीचा आहार महत्त्वाचा ठरतो. आपल्या आहारातून मेंदूचं पोषण होत असलं तरी अॅक्सिडेंटिव्ह स्ट्रेसमुळे आपला मेंदू प्रभावित होतो. यामुळे शरीरातील विषाक्त पदार्थ आणि त्यांना विरोध करणारे घटक यांत असमतोल निर्माण होतो.
वयोमानाप्रमाणे मेंदूची आकलन क्षमता कमी-कमी व्हायला लागते. अशा अवस्थेत आहारात गडद रंगाच्या फळांचा, भाज्याचा समावेश करावा. कोणत्याही परिस्थितीत आनंद रहायचं असेल तर आत्मसंयमावर लक्ष केंद्रीत करून एकाग्रता साधायला हवी असं तज्ज्ञ सांगतात.