वातावरण बदलामुळे सर्दी, खोकला झालाय का? करा 'हे' 8 घरगुती उपाय

वातावरण बदलामुळे सर्दी, खोकला झालाय का? करा 'हे' 8 घरगुती उपाय

डॉक्टरकडे जाण्याआधी एकदा करून पहा 'हे' उपाय

  • Share this:

मुंबई, 17 जून : पावसाळ्याला सुरुवात झाली असून, अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. यामुळे प्रचंड उष्णतामानामुळे हैराण झालेल्यांना जरा दिलासा मिळाला असला तरी, बदललेल्या या वातावरणामुळे अनेकांना सर्दी-खोकल्याचा त्रास सुरू झाला आहे. कोणत्याही डॉक्टरकडे न जाता हा त्रास जर तुम्हाला घरच्या घरी बरा करायचा असेल तर त्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही सोपे आणि घरगुती उपचार सांगणार आहोत.

अनेकजण सर्दी-खोकला झाला की लगेच डॉक्टरकडे धाव घेतात आणि अॅलोपॅथीची औषधं घेतात. मात्र, त्याच्या दुष्परिणामांचा अजिबात विचार केला जात नाही. सर्दी-खोकला हा त्या मानाने अगदी सामान्य आजार असून, त्यावर आयुर्वेदिक पद्धतीने घरगुती उपाय करणे अधिक चांगलं असतं.

'हे' फळ खाल्ल्याने 20 टक्क्यांनी वाढते शरीरातली उर्जा; जाणून घ्या आणखी फायदे

1 - खोकला दूर करण्यासाठी एक कप पाण्यात एक आल्याचा तुकडा, चिमूटभर दालचिनी आणि 4-5 काळे मिरे टाकून ते उकळून घ्यावं. ते कोमट झाल्यानंतर गाळून त्यात एक चमचा मध टाकून ते पिल्यास लगेच आराम पडतो.

2 - लसणाच्या 3-4 पाकळ्या आणि अर्धा चमचा हळद एक ग्लास दुधामध्ये टाकून ते उकळा. रात्री झोपण्याआधी ते प्यावं.

3 - एक चमचा कांद्याच्या रसात मध मिसळून ते रोज सकाळी उपाशीपोटी घेतलाने लगेच आराम मिळतो.

4 - कपभर पाण्यात 4-5 लवंग टाकून ते उकळून घा. कोमट झाल्यानंतर त्यात अर्ध लिंबू पिळा. मग त्यात एक चमचा मध मिसळून ते प्या.

5 - मोहरीच्या तेलामध्ये 4-5 पाकळ्या लसून टाकून ते गरम करून घ्या. ते कोमट झाल्यानंतर पायाच्या तळव्यांवर आणि छातीवर लावून मालिश करावी.

कच्ची पपई खाल्ल्याने वाढते रोगप्रतिकारक शक्ती; आणखीही आहेत फायदे

6 - एक कप पाण्यात अर्धा चमचा ज्येष्ठमधाची पावडर आणि 8-10 तुळशीची पानं टाकून ते उकळून घ्या. कोमट झाल्यानंतर ते चहासारखं प्यावं.

7 - थोडीशी तुरटी तव्यावर भाजून घ्यावी. त्याची पावडर बनवून ती गुळासोबत नियमित सेवन केल्यास सर्दी, खोकला कमी होतो.

8 - जवस आणि तीळ सम प्रमाणात भाजून घ्यावे. त्याची पूड तयार करून सकाळी आणि संध्याकाळी कोमट पाण्यात एक चमचाभर टाकून ते पिल्याने लगेच आराम मिळतो.

First published: June 17, 2019, 10:52 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading