सुंदर, चमकदार केस हवेत ? मग जेवणात करा ‘या’ पदार्थांचा समावेश

सुंदर, चमकदार केस हवेत ? मग जेवणात करा ‘या’ पदार्थांचा समावेश

ही पोषक पदार्थांचा आपण जेवणात समावेश करू शकतो ज्याने केसांच्या वाढीत तसंच दिसण्यात नक्कीच बदल होईल. केस सुंदर, लांब व चमकदार होण्यास मदत होईल. (diet for hair care)

  • Share this:

मुंबई, 15 एप्रिल : वय वाढण्यासोबतच केसांमध्येही बदल (hair growth and care) होणं स्वाभाविक आहे. पण त्यापेक्षाही अधिक हे आपल्या जीवनशैलीवर (lifestyle and diet) तसंच खाण्या-पिण्यावर अवलंबून असतं. वय वाढण्यात कोणताच बदल करू शकत नाही, पण जीवनशैलीत आणि खाण्यापिण्यात मात्र नक्की बदल करू शकतो. अशा काही पोषक पदार्थांचा आपण जेवणात समावेश करू शकतो ज्याने केसांच्या वाढीत तसंच दिसण्यात नक्कीच बदल होईल. केस सुंदर, लांब व चमकदार होण्यास मदत होईल. (diet for hair care)

प्रेग्नन्सीच्या आठव्या महिन्यात महिलेनं केली कमाल; VIDEO पाहून तोंडात बोटं घालाल

बेरीज -

विविध प्रकारच्या बेरीजमध्ये अनेक अँन्टीऑक्सिडन्ट्स आणि जीवनसत्त्वे असतात, जी केस लांब होण्यासाठी मदत करतात. उदा. स्ट्रॉबेरीमध्ये भरपूर प्रमाणात क (K) जीवनसत्त्व असतं. जे केसांसाठी फारच पोषक असतं.

पालक -

पालकमध्ये फॉलेट, लोह, अ (A) जीवनसत्त्व आणि क (K) जीवनसत्त्व भरपूर प्रमाणार असते. केसांसाठी अ जीवनसत्त्व महत्त्वाचं असतं ते कमी असल्यास केस गळू लागतात.

रताळे -

रताळे बीटा कॅरेटीनचा उत्तम स्त्रोत आहे. जे शरीरात अ जीवनसत्त्व वाढवतं. ज्याने केस घनदाट होतात.

अव्होकॅडो -

अव्होकॅडो फळात मोठ्या प्रमाणात जीवनसत्त्व ई (E) असतं. शिवाय फॅटी ऍसिड सुद्धा असतात. जे केसंच्या वाढीसाठी उपयोगी ठरतात.

(हे वाचा - अरे बापरे! बिस्कीट खाताच मॉडेलला मारला लकवा; आता झाली भयंकर अवस्था)

केळ -

केळ्यामध्ये  शुगर, फायबर, थायमिन आणि फॉलिक ऍसिडच्या रूपात जीवनसत्त्व अ  (A) आणि ब (B) असतं. नियमीत सेवनाने केस मजबूत होतात.

हिरव्या भाज्या आणि बिन्स -

हिरव्या भाज्यांमध्ये पडवळ, कोबी, मेथी आणि भेंडी, बिन्समध्ये पोषक तत्त्वं तसंच जीवनसत्त्व असतात, जे केसांच्या वाढीसाठी उपयुक्त असतात.

दही -

दह्यामध्ये प्रोटीन आणि जीवनसत्त्व ब मोठ्या प्रमाणात असतं. जे केसांना नॅचरली कंडिशनिंग करतं. तसंच कोंडा होऊ देत नाही.

दाणे -

विविध प्रकारच्या नट्स म्हणजेच दाण्यामध्ये फॅटी ऍसिड्स, जीवनसत्त्व ब आणि ई असतात. जे केसांच्या प्रत्येक समस्येसाठी उपयुक्त ठरतात.

Published by: News Digital
First published: April 15, 2021, 8:45 AM IST

ताज्या बातम्या