कोरोना लस हवी पण इंजेक्शनची भीती वाटतेय; तुमच्यासाठी आता कोरोना टॅबलेट

कोरोना लस हवी पण इंजेक्शनची भीती वाटतेय; तुमच्यासाठी आता कोरोना टॅबलेट

लवकरच नाक आणि तोंडावाटे दिली जाणारी कोरोना लस (corona vaccine) उपलब्ध होणार आहे.

  • Share this:

ब्रिटन, 25 फेब्रुवारी : प्रत्येकाला कोरोनाव्हायरसपासून (coronavirus) बचाव करायचा आहे. त्यामुळे प्रत्येक जण कोरोना लशीच्या (corona vaccine) प्रतीक्षेत आहे. पण सध्या कोरोना लस (covid 19 vaccine) दिली जाते आहे, ती इंजेक्शनच्या (injection) माध्यमातून आणि इंजेक्शन म्हटलं की अनेकांना घामच फुटतो. लहान मुलंच नाही तर मोठी माणसंही इंजेक्शनला घाबरतात. तुम्हादेखील इंजेक्शनची भीती वाटते का? पण कोरोना लसदेखील हवी आहे? पण मग नेमकं आता करायचं काय? तर काळजी करून नका. कोरोना लशीच्या इंजेक्शनला घाबरण्याची गरज नाही कारण आता लवतरच कोरोना टॅबलेटही येणार आहे.

कोविड 19 टॅबलेटवर सध्या संशोधन सुरू आहे. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीचे शास्त्रज्ञ या औषधावर काम करत आहे. ऑक्सफोर्ड-अॅस्ट्राझेनेका लशीचे चीफ डेव्हलपर सारा गिल्बर्ट यांनी सांगितलं, आमची टीमनं इंजेक्शनची गरज पडणार नाही, अशा लशीवर काम करणं सुरू केलं आहे. डेली मेलनं याबाबत वृत्त दिलं आहे.

हे वाचा - राज्यात का होतोय कोरोनाचा उद्रेक? सरकारनं सांगितली 3 कारणं

या संशोधनाबाबत 'हाउस ऑफ कॉमन्स साइन्स अँड टेक्नोलॉजी कमेटीला गिल्बर्ट यांनी सांगितलं, नेजल स्प्रेमार्फत अनेक फ्लू लशी दिल्या जातात. आम्ही अशीच कोरोना लस तयार करण्यासाठीही प्रयत्न करत आहोत. तोंडामार्फत घेतल्या जाणाऱ्या लशीवरही आमचं काम सुरू आहे. ज्यांना इंजेक्शन नको आहे, ते टॅबलेटमार्फत लस घेऊ शकतात.

अशा पद्धतीची कोरोना लस तयार करायला थोडा वेळ लागेल. कारण या लशीची सुरक्षा आणि प्रभाव याचंही परीक्षण कारवं लागेल, असंही गिल्बर्ट यांनी स्पष्ट केलं आहे.  वृत्तानुसार अमेरिकेत टॅबलेटचं तर ब्रिटनमध्ये नेझल स्प्रेचं ट्रायल सुरू आहे.

Published by: Priya Lad
First published: February 25, 2021, 6:18 PM IST

ताज्या बातम्या