मोबाइलचा अतिवापर टाळा, नाहीतर व्हाल लठ्ठ, संशोधकांचा इशारा

मोबाइलमुळे आपलं जगणं सुकर झालं आहे पण मोबाइलच्या वापरामुळे त्याच प्रमाणात आपल्यासमोरच्या समस्याही वाढत आहेत. आपलं वजन वाढण्यालाही मोबाइलच कारणीभूत आहे हे आता संशोधनाने सिद्ध झालं आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 27, 2019 06:42 PM IST

मोबाइलचा अतिवापर टाळा, नाहीतर व्हाल लठ्ठ, संशोधकांचा इशारा

मुंबई, 27 जुलै : मोबाइलमुळे आपलं जगणं सुकर झालं आहे पण मोबाइलच्या वापरामुळे त्याच प्रमाणात आपल्यासमोरच्या समस्याही वाढत आहेत. मोबाइलचा अतिवापर हा आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकतो. आपलं वजन वाढण्यालाही मोबाइलच कारणीभूत आहे हे आता संशोधनाने सिद्ध झालं आहे.

अमेरिकेत कॅलिफोर्नियामधल्या सिमॉन बॉलिव्हर युनिव्हर्सिटीतल्या संशोधकांनी हा दावा केला आहे. त्यांच्या मते, मोबाइलचा 5 तासांपेक्षा जास्त वापर केला तर लठ्ठपणा वाढ शकतो. जेव्हा आपण मोबाइलमध्ये बिझी असतो तेव्हा शारीरिक हालचाल कमी होते. त्यामुळे अर्थातच आपलं वजन वाढतं.

1000 विद्यार्थ्यांची तपासणी

मोबाइलबदद्लच्या या संशोधनात एक हजार विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यात आलं. मागच्या वर्षी जून ते डिसेंबर या काळात हे संशोधन करण्यात आलं. मोबाइलचा वापर करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये गोड खाणं, फास्ट फूड खाणं याचं प्रमाण जास्त आढळलं. हे विद्यार्थी व्यायामही करत नव्हते.

(हेही वाचा : ऑनलाइन खाणं ऑर्डर करणं साक्षीला पडलं महाग, चक्क 80 हजारांचा गंडा!)

Loading...

कोणतीही शारीरिक हालचाल नाही, व्यायाम नाही आणि खाण्याचं प्रमाणही जास्त... यामुळे त्यांच्यामध्ये झोपेचे विकारही आढळले. वजन वाढल्यामुळे कमी वयात हृदयविकाराचा धोकाही वाढू शकतो.

अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजी मध्ये झालेल्या एका परिषदेत हे संशोधन मांडण्यात आलं. या संशोधनात सहभागी झालेल्या 25 टक्के विद्यार्थ्यांमध्ये लठ्ठपणाचं प्रमाण आढळलं.हे विद्यार्थी मोबाइलवर पाच तासांपेक्षा जास्त वेळ घालवत होते. अमेरिकेतल्या विद्यार्थ्यांप्रमाणेच हे संशोधन आपल्यालाही लागू पडतं. त्यामुळेच मोबाइलचा कमीतकमी वापर करा आणि व्यायाम करा हाच मंत्री यातून घ्यायला हवा.

=========================================================================================

कल्याणमध्ये पेट्रोल पंपच बुडाला पाण्याखाली, 9 जणांची अशी झाली सुटका LIVE VIDEO

<iframe class="video-iframe-bg-color iframe-onload" onload="resizeIframe(this)" id="story-394787" scrolling="no" frameborder="0" width="100%" src="https://lokmat.news18.com/embed/videos/Mzk0Nzg3/"></iframe>

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 27, 2019 06:42 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...