केंद्राचा मोठा निर्णय; कोरोना रुग्णही घेऊ शकतात आयुष्मान भारत योजनेचा लाभ

केंद्राचा मोठा निर्णय; कोरोना रुग्णही घेऊ शकतात आयुष्मान भारत योजनेचा लाभ

कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी केंद्र सरकारची आयुष्मान भारत (Aayushman Bharat)किंवा पंतप्रधान जनआरोग्य योजनेतून लाभ मिळू शकतो. काय आहे ही योजना,या योजनेचा कसा लाभ घ्यायचा ते जाणून घेऊ...

  • Share this:

मुंबई 8 मे: सध्या देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनामुळे (Corona)गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. दैनंदिन कोरोनाबाधित रुग्णसंख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे एकूणच आरोग्य आणि प्रशासकीय व्यवस्थेवर ताण आलेला आहे. घरातील कोणी व्यक्ती कोरोनाबाधित झाली तर त्याच्या उपचारांसाठी नातेवाईकांना ऐनवेळी पैश्यांची तजवीज करताना मोठी कसरत करावी लागत आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे रोजगार आणि उत्पन्नावर परिणाम झाला असल्याने सर्वसामान्य नागरिकांना अर्थिक जुळवणी करताना नाकीनऊ येत आहेत. या पार्श्वभूमीवर कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी केंद्र सरकारची आयुष्मान भारत (Aayushman Bharat)किंवा पंतप्रधान जनआरोग्य योजनेतून लाभ मिळू शकतो. काय आहे ही योजना,या योजनेचा कसा लाभ घ्यायचा ते जाणून घेऊ...

आजतकच्या वृत्तानुसार,देशात कोरोना महामारीला सुरुवात होताच सरकारने कोरोनासंबंधित तपासणी आणि उपचार याबाबी आयुष्मान भारत योजनेत समाविष्ट केल्या होत्या. ही आयुष्मान भारत योजना पंतप्रधान जन आरोग्य योजना म्हणूनही ओळखली जाते. काही राज्य सरकारांनी या योजनेची व्याप्ती आणखी वाढवली असून,त्यातऑक्सिजन पुरवठा (Oxygen Supply)आणि कोरोनासाठीच्या औषधोपचारांचा समावेश केला आहे.

आयुष्मान भारत योजने अंतर्गत देशातील गरीब,वंचित आणि गरजू 10 लाख कुटुंबांना लाभ मिळत आहे. या योजनेतून या कुटुंबांना म्हणजेच 50 कोटी लोकांना दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंतच्या आरोग्य विम्याचा लाभ देखील मिळतो. मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी आणि नियम आहेत.

योजनेचा लाभ घेण्यासाठी या आहेत अटी

- ग्रामीण भागातील (Rural Area)ज्या नागरिकांकडे स्वतःचे पक्के घर नाहीअशी व्यक्ती पात्र ठरते.

- कुटुंबात कोणीही वयस्कर (16 ते 59 वर्षे) व्यक्ती नाही.

- जे कुटुंब महिला चालवतात.

- कुटुंबात कोणी दिव्यांग असेल तर.

- कुटुंब अनुसुचित जाती- जमातीतील असेल तर.

- व्यक्ती भूमिहीन/मजूर,बेघर,आदिवासी किंवा कायदेशीर मान्यता असलेला पारंपरिक मजूर असेल तर.

- शहरी भागातील (Urban Area)निराधार,कचरा उचलणारा कामगार,घरकाम करणारी व्यक्ती,फेरीवाले,प्लंबर,गवंडी,कामगार,पेंटर,वेल्डर,सुरक्षा रक्षक,हमाल,सफाई कामगार या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

विविध आजारांवरील उपचार आणि तपासण्यांचा समावेश

या योजनेशी खासगी रुग्णालयांना देखील जोडण्यात आले आहे. या विम्यातंर्गत जवळपास सर्व आजार कव्हर केले जातात. कॅन्सर शस्त्रक्रिया,रेडिएशन थेरपी,केमोथेरपी,हृदयाशी संबंधित शस्त्रक्रिया,मणक्याची शस्त्रक्रिया,दातांची शस्त्रक्रिया,डोळ्यांच्या शस्त्रक्रिया यासह एमआरआय (MRI)आणि सीटी स्कॅन (CT Scan)सारख्या तपासण्यांचा योजनेत समावेश आहे. सर्दी,खोकला,तापासारख्या आजारांचा या योजनेत समावेश नाही. परंतु,कोरोनाची हीच लक्षणे असल्याने त्याचा समावेश योजनेत आहे.

कोरोनासाठी मिळणार उपचार

कोरोनाची लक्षणे सर्दी,खोकला,ताप यासारखीच आहेत. परंतु,यात आरटीपीसीआर ही एक वेगळ्या प्रकारची टेस्ट करावी लागते. कोणत्याही आजारावर इलाज करण्यासाठी रुग्णाला आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेण्याकरिता एक दिवस रुग्णालयात भरती व्हावे लागते. यातच तुम्ही जर कोरोना पॉझिटिव्ह असालआणि उपचारांसाठी रुग्णालयात भरती झाला असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकतो. आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही पात्र आहात का हे प्रथम तुम्हाला तपासावे लागेल. योजनेसाठी तुमची पात्रता तपासण्याकरिता तुम्हीwww.pmjay.gov.inया वेबसाईटवरऑनलाईन किंवा 14555,1800111565 या हेल्पलाईवर संपर्क साधू शकता. जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर आयुष्मान भारत योजनेतील खासगी रुग्णालयांमध्येही कोरोनावर उपचार घेऊ शकता. जर तुम्हाला कोरोनामुळे खासगी रुग्णालयात क्वारंटाईन व्हावे लागले तरी देखील त्याचा खर्च या विम्यात कव्हर होईल.

खासगी रुग्णालयातही मिळणार उपचार

देशातील शासकीय रुग्णालयांमध्ये गरीबांवर मोफत उपचार पूर्वीपासूनच होतात. या कामात खासगी रुग्णालयांचा समावेश करणं हे आयुष्मान योजनेचं उदिदष्ट आहे. त्यानुसार,आयुष्मान भारत योजनेच्या पॅनेलला देशभरातील खासगी रुग्णालये जोडण्यात आली आहेत. तुम्ही गरजेवेळी तुमच्या नजीकचे कोणते खासगी रुग्णालय या योजनेशी जोडले आहे याबाबतची माहिती आॅनलाईन किंवा हेल्पलाईन क्रमांकाच्या माध्यमातून घेऊ शकता. त्यानंतर या रुग्णालयातील एक आयुष्मान मित्र किंवा आरोग्य मित्र तुम्हाला दस्तावेज तपासणीसाठी मदत करेल.

योजनेच्या लाभासाठी ही कागदपत्रे आवश्यक

- आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घेण्यासाठी व्यक्तीला ई-कार्ड किंवा अन्य दस्तावेज सादर करुन आपली पात्रता सिध्द करावी लागते.

- तसेच आधार कार्ड (Aadhar Card),मतदार कार्ड किंवा रेशन कार्ड पैकी एक ओळखपत्र सादर करावे लागते.

- आरोग्य मित्र पात्र व्यक्तीला रुग्णालयात मोफत उपचारांसाठी सर्वतोपरी मदत करतात.

हे खर्च विम्यात होतात कव्हर

- आयुष्मान भारत योजने अंतर्गत रुग्णालयात भरती होण्यापूर्वीचे 3 दिवस आणि नंतरच्या 15 दिवसांपर्यंत उपचार आणि औषधे मोफत मिळतात.

- या योजनेत 1393 पॅकेजचा समावेश करण्यात आला आहे.

- या पॅकेज अंतर्गत रुग्णालयात आयसीयू,लॅबोरेटरी तपासण्या,रुग्णालयात राहण्याचा खर्च आदी बाबी कव्हर होतात.ayushman bharat yojana

First published: May 8, 2021, 7:34 PM IST

ताज्या बातम्या