पत्नीसाठी त्यानं घटवलं तब्बल 273 किलो वजन; पत्नीप्रेमाची अनोखी कहाणी

पत्नीसाठी त्यानं घटवलं तब्बल 273 किलो वजन; पत्नीप्रेमाची अनोखी कहाणी

ब्रिटनमधील इव्हेंरनेसमध्ये राहणारा पॉल टुटहिल (Paul Tuthill) 2010मध्ये देशातील सर्वात जाड लोकांमधील एक होता

  • Share this:

ब्रिटन, 5 मे: प्रेमाची (Love) ताकद अफाट असते म्हणतात. प्रेमात पडलेली व्यक्ती आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी काहीही करायला तयार असते. प्रेमात पडलेल्या व्यक्ती कधीकधी असं अचाट काम करून जातात की, सगळ्या जगाला त्यांच्यापासून प्रेरणा मिळते. अशीच एक व्यक्ती आहे ब्रिटनमधील पॉल टुटहिल (Paul Tuthill).

त्यानं जे अचाट काम करून दाखवलं आहे त्याला जगात तोड नाही. अशक्य ते शक्य करता सायास असं म्हणतात; पण वजन कमी करण्याचे प्रयत्न करणाऱ्या अनेक लोकांसाठी हे लागू होत नाही. पण या पठ्ठ्यानं मात्र ते करून दाखवलं. या पॉल टुटहिलनं आपल्या बायकोवरील प्रेमाखातर चक्क थोडथोडकं नाही तर तब्बल 273 किलो वजन कमी केलं आहे. 368 किलो वजन असणारा पॉल एकेकाळी देशातील सर्वांत जाड (One of the Most Obese Man in UK) व्यक्तींपैकी एक होता. आता त्याचं वजन 95 किलो असून तो अत्यंत फिट व्यक्ती आहे. प्रेमात माणूस काहीही करू शकतो हे खरं असलं तरीही त्यासाठी देखील जिद्द, चिकाटीची गरज असते. खरं प्रेम काय असतं याचं पॉल एक उत्तम उदाहरण आहे. त्याची ही कामगिरी अनेकांना प्रेरणा देणारी आहे.

ब्रिटनमधील आतापर्यंतचा सर्वांत जाड माणूस होता

ब्रिटनमधील इव्हेंरनेसमध्ये राहणारा पॉल टुटहिल (Paul Tuthill) 2010मध्ये देशातील सर्वात जाड लोकांमधील एक होता. त्याच्या अतीलठ्ठपणामुळे त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागत असे. बेडवरून उठायला, बाथरूममध्ये जाण्यासाठी देखील त्याला दुसऱ्याची मदत घ्यावी लागे. रोजच्या कामांसाठी त्याला दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागे.

झोप बिघडवतेय तुमची सेक्स लाइफ; लैंगिक क्षमतेवर होतोय परिणाम

नैराश्यातगेला होता पॉल

आपल्या वजनामुळे पॉल नैराश्यात (Depression) गेला होता. आपल्या पत्नीशी शारीरिक संबंध ठेवणं देखील तो टाळत असे. आपल्या वजनामुळे आपली बायको चिरडली जाईल, अशी भीती त्याला वाटत असे. यामुळे तो पत्नीपासून दूर रहायचा. नैराश्यामुळे पॉलने आत्महत्येचाही प्रयत्न केला. आपल्या भावाची अशी परिस्थिती पाहून त्याच्या बहिणीनं त्याला मदत करण्याचा निश्चय केला. तिनं त्याची गॅस्ट्रिक सर्जरी करवून घेतली. त्यामुळं त्याचं वजन 368 किलोंवरून292 किलोंपर्यंत कमी झाले.

आहार नियंत्रित करत पॉलनं घटवलं आणखी वजन

गॅस्ट्रिक सर्जरीनंतर, पॉलनं आपल्या आहारावर काटेकोर नियंत्रण ठेवलं. अतिशय शिस्तबद्ध जीवनशैली त्यानं अवलंबली आणि आपलं वजन चक्क 95 किलोपर्यंत कमी केलं. आता तो दररोज 1800 कॅलरी घेतो आणि वर्कआउट देखील करतो. वजन कमी झाल्यानंतर, पॉलने एक्सेस स्कीन काढून टाकण्यासाठीही शस्त्रक्रिया केली. आता पॉल सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे अत्यंत तंदुरुस्त आयुष्य जगत असून, आता तो तीन अपत्यांचा पिता बनला आहे. आपल्या कुटुंबा समवेत तो अतिशय आनंदी आयुष्य जगत आहे.

First published: May 5, 2021, 10:04 PM IST

ताज्या बातम्या