कोरोनामुळे महिलांचा हृदय धोक्यात; कधीही येऊ शकतो Heart attack

कोरोनामुळे महिलांचा हृदय धोक्यात; कधीही येऊ शकतो Heart attack

कोरोनामुळे पुरुषांच्या तुलनेत महिलांना हार्ट अटॅक (heart attack) येण्याचा आणि त्यामुळे मृत्यू होण्याचा धोका जास्त आहे.

  • Share this:

गोथेनबर्ग, 06 फेब्रुवारी: कोरोनासंदर्भात संशोधन (Corona) सातत्याने सुरूच असून, त्यातून नवनवे निष्कर्ष हाती येत आहेत. नुकत्याच झालेल्या एका संशोधनानुसार कोरोनामुळे महिलांच्या हृदयावर (Women heart) परिणाम होतो. कोरोनावर उपचार सुरू असलेल्या किंवा कोरोनातून बऱ्या झालेल्या महिलांनाही हार्ट अटॅक येऊ शकतो आणि अशा पद्धतीनं येणाऱ्या हार्ट अटॅकमुळे (heart attack) मृत्यू होण्याचा धोका पुरुषांमध्ये महिलांमध्येच जास्त आहे.

स्वीडनमधल्या (Sweden) शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनाचा निष्कर्ष नुकताच हाती आला असून, त्यानुसार कोरोना होऊन गेल्यानंतर हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू होण्याचा धोका पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना नऊपट अधिक आहे. 'आजतक'ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

स्वीडनमधल्या  शास्त्रज्ञांनी कोरोना आणि त्यानंतर येणाऱ्या हार्ट अटॅक याबाबत अभ्यास केला. युरोपियन हार्ट जर्नलमध्ये हे संशोधन प्रकाशित करण्यात आलं. संशोधनानुसार कोरोना होऊन गेल्यानंतर हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू होण्याचा धोका पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना (Women) नऊपट अधिक आहे. 'आजतक'ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

संशोधनात कोरोनाबाधित बरे होऊन हॉस्पिटलबाहेर आल्यानंतर काही दिवसांनी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेल्या 1946 आणि  हॉस्पिटलमध्ये उपचारांदरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेल्या 1080 कोरोनाग्रस्तांचा अभ्यास करण्यात आला. एक जानेवारी 2020 ते जुलै 2020 या कालावधीत हा अभ्यास करण्यात आला होता. युनिव्हर्सिटी ऑफ गोथेनबर्गमधल्या शास्त्रज्ञांनी कोरोनाचा संसर्ग उच्च पातळीवर असताना हे संशोधन केलं होतं.

हे वाचा - कोरोना संसर्गाचा आकडा घसरला, पण धोका कायम; भारतासाठी चिंताजनक बातमी

ज्या व्यक्ती कोरोनाचा संसर्ग होऊन बऱ्या होऊन हॉस्पिटलमधून घरी गेल्या होत्या, त्यांचा 30 दिवसांच्या आत हृदयविकाराने मृत्यू होण्याच्या प्रमाणात 3.4 टक्क्यांनी वाढ झाली. त्याच वेळी हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या कोरोनाबाधितांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याच्या प्रमाणात 2.3 टक्क्यांनी वाढ झाली.

कोरोना महासाथीच्या (Pandemic) आधीच्या हृदयविकारग्रस्तांची महासाथीनंतरच्या हृदयविकारग्रस्तांशी तुलना केली, तेव्हा हाती आलेले निष्कर्ष धक्कादायक होते. कोरोना संसर्ग झालेल्या हृदयविकारग्रस्तांच्या मृत्यूच्या प्रमाणात तीन पट वाढ झाली आहे. तसंच कोरोना संसर्ग झालेल्या पुरुषांचा हृदयविकाराने मृत्यू होण्याच्या प्रमाणात साडेचार टक्क्यांनी वाढ झाली असून, महिलांच्या प्रमाणात नऊ टक्क्यांनी वाढ झाली असल्याचं लक्षात आलं आहे.

युनिव्हर्सिटी ऑफ गोथेनबर्गचे पीएचडी स्कॉलर (Scholar) आणि या संशोधनाच्या टीमचे सदस्य पेद्राम सुल्तानियन यांनी सांगितलं, आमच्या अभ्यासातून हे स्पष्ट होतं, की कोरोनाचा संसर्ग आणि हृदयविकाराचा झटका यांचा संयोग घातक आहे. कोरोना संसर्ग झालेल्या हृदयविकारग्रस्तांची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. त्यासाठी कोरोना संसर्ग झालेल्या हृदयविकारग्रस्तांची आरोग्य चाचणी सातत्यपूर्ण पद्धतीने होण्याची गरज आहे, जेणेकरून झटका येण्याची शक्यता योग्य वेळी लक्षात येऊ शकेल.

हे वाचा - वुहानच्या त्या लॅबमध्ये गेली WHO ची टीम; कोरोनाबाबत केला धक्कादायक खुलासा

गेल्या वर्षी मार्च महिन्यात युरोपियन रिससिटेशन काऊन्सिल आणि स्वीडिश रिससिटेशन काऊन्सिलने यासंदर्भात एक मार्गदर्शक सूचनाही जारी केली होती. त्यात असं म्हटलं होतं की, कोणाला हृदयविकाराचा झटका आला असेल, तर त्याला तोंडाने श्वासोच्छ्वास देण्याचा प्रयत्न करू नये. मात्र छातीवर दबाव वाढवावा, जेणेकरून कोरोना संक्रमणाचा धोका कमी राहील.

या संशोधन प्रकल्पातील वरिष्ठ शास्त्रज्ञ अराज रॉशानी यांनी सांगितलं की, हृदयविकाराचा झटका आल्यानंतर कोणी त्या व्यक्तीला सीपीआर देत असेल, तर प्रायमरी व्हेंटिलेशनचं (Primary Ventilation) काम होतं. मात्र कोरोना झालेल्यांना हे लागू होत नाही. कारण हृदयविकार असलेल्या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाला असेल, तर त्याच्यासाठी सीपीआरदेखील (CPR) प्राणघातक ठरू शकतो. कारण कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे त्या व्यक्तीची फुप्फुसं कमजोर झालेली असू शकतात.

Published by: Aditya Thube
First published: February 6, 2021, 8:26 AM IST

ताज्या बातम्या