• Home
 • »
 • News
 • »
 • heath
 • »
 • चिंताजनक! लहान मुलं प्रौढांपेक्षा जास्त कोरोना वाहक ठरु शकतात

चिंताजनक! लहान मुलं प्रौढांपेक्षा जास्त कोरोना वाहक ठरु शकतात

लहान मुलं सायलेंट स्प्रेडर ठरु शकतात.

लहान मुलं सायलेंट स्प्रेडर ठरु शकतात.

शास्त्रज्ञांच्या मते, लहान मुलांमुळे कोरोना संक्रमण (Corona infection) वेगाने होतं. त्यामुळे लहान मुलं सायलेंट स्प्रेडर (Silent spreader) ठरु शकतात.

 • Share this:
  दिल्ली, 9 मे : कोरोना संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेत (second waveलहान मुलांनाही वेगाने संक्रमण (Rapid infection in young children) झालेलं आहे.देशात लहान मुलांमधील कोरोनाची झालेली लागण पाहता देशभरात चिंतेचं वातावरण आहे. अगदी नुकतंच जन्माला आलेल्या बाळांना देखील कोरोनाची लागण होत आहे. पणं, प्रौढांपेक्षा लहान मुलांना कोरोनामुळे मृत्यू होण्याचा धोका कमी आहे. मात्र भारतात कोरोना काळात लहान मुलांसाठी आवश्यक असणाऱ्या फॅसिलीटीही (Facility) कमी पडत आहे. अशात एका अभ्यासानुसार, लहान मुलं प्रौढांपेक्षा जास्त मोठे कोरोना वाहक (Children carry corona) ठरु शकतात हे स्पष्ट झालेलं आहे. American Medical Association  (JAMA) ने यासंदर्भात अभ्यास केला आहे. (लॉकडाऊनचा नियम मोडून मशिदीत केली गर्दी, पाहा पोलिसांच्या छापेमारीचा Live Video) लहान मुलामुळे कोरोना वेगाने पसरेल असा इशारा या अभ्यासातून दिला आहे. लहान मुलांमध्ये जास्त प्रमाणात व्हायरल लोड (Viral loadअसतो. व्हायरल लोड संक्रमित व्यक्तीच्या शरीरातील व्हायरसचं (Virus प्रमाण दर्शवतो. अभ्यासकांनी कोरोनाची सौम्य आणि मध्यम लक्षणं असणाऱ्या मुलांचा अभ्यास केला गेला. लहान मुलं प्रौढांपेक्षा 10 ते 100 टक्क्यांनी जास्त प्रमाणात कोरोनाचा प्रसार करु शकतात, हे या अभ्यासाने (Study) स्पष्ट झालं आहे. मुलांना संक्रमण सहज होऊ शकतं (Children can be easily infected). (मोठी बातमी, पंतप्रधान मोदींनी केलं महाराष्ट्राच्या कोरोना लढ्याचं कौतुक) पण, इतर वयोगटापेक्षा लहान मुलं कोरोना जास्त पसरवू शकतात. त्यामुळेच लहान मुलांसाठी कोरोना लसीचं महत्वही लक्षात आलेलं आहे. भारतासारख्या देशात जिथे प्रौढांच्या लसीकरणातच अडथळे येत आहेत. तिथे लहान मुलांना लसीकरण कसं करणार? हा प्रश्न आहे. नुकतंच इकॉनॉमिक टाइम्सने या संदर्भात वृत्त दिलं आहे. व्हायरलॉजिस्ट आणि कर्नाटकच्या कोविड तांत्रिक सल्लागार समितीचे सदस्य डॉ. व्ही रवी यांनी सांगितलंय की, आपल्याकडे कोरोना महामारीच्या काळात लहान मुलांसाठी साथीच्या आजाराशी संबंधित बालरोगविषयक काळजी घेण्यासाठी वैद्यकीय पायाभूत सुविधाच उपलब्ध नाहीत. विशेषत: कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत सर्वात जास्त नुकसान झालेल्या राज्यांपैकी एक असलेल्या महाराष्ट्राने तिसर्‍या लाटेशी लढण्याची तयारी सुरू केली आहे. पण, तयारींमध्ये पुरेशा संख्येत चाईल्ड कोविड सेंटर (Child Covid Center) उभारणं काळाची गरज आहे. (प्रोटोकॉलचं उल्लंघन करीत कोरोना रुग्णाचा मृतदेह दफन; गावात 21 दिवसात 21 मृत्यू) फायझरने (Pfizer) 2 ते 11 वयोगटातील मुलांसाठी लसीची मंजूरी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. लहान मुलांना कोरोनापासून वाचवायचं असेल तर, लसीकरण लवकरात लवकर सुरू होणं अपेक्षित आहे. कारण, कोरोनाची तिसरी लाट सप्टेंबरमध्ये येण्याची शक्यता आहे. अशात लहान मुलांना कोरोनापासून बचावण्याचा उपाय हे लसीकरणंच ठरणार आहे. अन्यथा लहान मुलांच्या शैक्षणिक वर्षांवरही याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
  Published by:News18 Desk
  First published: