Home /News /goa /

Goa CM Oath Taking Ceremony : गोव्यात पुन्हा सावंत सरकार, मुख्यमंत्रिपदाचा पार पडला शपथविधी सोहळा

Goa CM Oath Taking Ceremony : गोव्यात पुन्हा सावंत सरकार, मुख्यमंत्रिपदाचा पार पडला शपथविधी सोहळा

मतमोजणीनंतर तब्बल अठराव्या दिवशी गोवा मंत्रिमंडळाचा शपथविधी दोनापावला येथील श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम वर संपन्न झाला.

    गोवा, 28 मार्च : गोवा विधानसभा निवडणुकीत (Goa Assembly Election ) दमदार विजय मिळवल्यानंतर अखेरीस मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी सोहळा पार पडला. प्रमोद सावंत यांनी 14 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. विशेष म्हणजे, प्रमोद सावंत ( Pramod Sawant ) यांनी गोव्याच्या भाषेत शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा उपस्थितीत होते. (Pramod Sawant To Be Sworn In As Goa CM) गोव्यात डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला.  या शपथविधी सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह गृहमंत्री अमित शहा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह दहा राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित होते. दोनापावला येथील डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम वर या सरकारच्या शपथविधीसाठी विधानसभेची प्रतिकृती असलेले खास व्यासपीठ उभारण्यात आले  होते. (Gold Rate Today: सोने-चांदी दरात घसरण, तपासा 10 ग्रॅमचा आजचा भाव) मतमोजणीनंतर तब्बल अठराव्या दिवशी गोवा मंत्रिमंडळाचा शपथविधी दोनापावला येथील श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम वर संपन्न झाला. राहणार आहेत यासाठी विधानसभेची प्रतिकृती असलेले भव्य व्यासपीठ उभारण्यात आले. मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांना राज्यपाल श्री पीएस श्रीधरन  शपथ दिली. त्यानंतर  नऊ मंत्र्यांना शपथ दिली आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Goa

    पुढील बातम्या