Home /News /goa /

Goa Election Results 2022: गोव्यात काँग्रेस की भाजप? कोण ठरणार 'किंगमेकर'

Goa Election Results 2022: गोव्यात काँग्रेस की भाजप? कोण ठरणार 'किंगमेकर'

Goa Election Results 2022: गोव्यात त्रिशंकू स्थिती निर्माण होण्याची शक्यता Exit Polls ने वर्तवल्याने निकालाची उत्सुकता वाढली आहे. छोटे पक्ष किंग मेकरची भूमिका निभावू शकतात. त्यामुळे सत्ताधारी कोण यापेक्षा दोऱ्या कुणाच्या हाती हेही थोड्याच वेळात स्पष्ट होईल.

पुढे वाचा ...
  मुंबई, 10 मार्च: गोव्यात (Goa Election Results 2022) यंदा गेल्या वेळसारखीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता Exit Polls मध्ये वर्तवण्यात आली आहे. या राज्यात त्रिशंकू स्थिती निर्माण होण्याची चर्चा असल्याने निकालानंतर आमदारांची पळवापळवी होऊ शकते. काँग्रेस आणि भाजप (गोवा विधानसभा निवडणुक निकाल ) या मुख्य पक्षांमध्ये असलेली लढत चुरशीची होणार हे निश्चित. म्हणूनच या छोट्या राज्याच्या निवडणुकीवर देशाचं लक्ष आहे. गोवा विधानसभा (Assembly Election 2022) ही देशातल्या सर्वांत छोट्या विधानसभांपैकी एक. मोजून 40 जागा असलेली ही विधानसभा तरीही साऱ्या देशाचं लक्ष वेधून घेत आहे. 40 पैकी 21 हा बहुमताचा आकडा कोण गाठतो हे महत्त्वाचं आहे, तसं त्या आकड्याच्या जवळपास पोहोचणारे कोण आहेत हेही औत्सुक्याचं आहे. महाराष्ट्राचा हा सख्खा शेजारी असल्याने आणि सांस्कृतिकदृष्ट्या जवळीक मोठी असल्याने महाराष्ट्राचं तर अधिक लक्ष या निवडणुकीकडे आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या नेत्याचं राजकीय भवितव्य या निवडणुकीवर अवलंबून असल्याचं बोललं जातं. विशेष म्हणजे आम आदमी पक्ष, तृणमूल काँग्रेस, महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी या सगळ्याच पक्षांमध्ये कोण किती जागा जिंकणार याची स्पर्धा आहे. हे छोटे पक्ष किंग मेकरची भूमिका निभावू शकतात. 2017 साली गोव्यात काँग्रेसने 40 पैकी 17 जागा जिंकल्या आणि तीन जागा जिंकलेल्या गोवा फॉरवर्ड पार्टीसह अनौपचारिक आघाडीही केली होती; मात्र केवळ 13 जागा जिंकलेल्या भाजपने राजकीय खटपटी करून सरकार स्थापन करण्यात यश प्राप्त केलं होतं. पर्रिकर केंद्रातून पुन्हा राज्यात आले आणि मुख्यमंत्री झाले.

  हे वाचा - Goa Election: निकालाआधीच धास्तावली काँग्रेस, घोडेबाजार टाळण्यासाठी उमेदवारांना करणार हॉटेलात बंद

   अनेक वर्षं गोव्याचं मुख्यमंत्रिपद सांभाळलेले लोकप्रिय नेते म्हणून मनोहर पर्रीकरांना सर्वांचाच पाठिंवा होता. त्यांच्या पश्चात होणारी ही पहिलीच निवडणूक आहे. त्यात त्यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांना हव्या असलेल्या मतदारसंघात भाजपने तिकीट न दिल्याने त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आहे. 40 सीट्स असलेल्या गोव्यात काँग्रेस आणि भाजप यांच्यात थेट लढत आहे; मात्र आप, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, एमजीपी आदी पक्षांनी या वेळी जोर लावल्यामुळे निकालाची चुरस वाढली आहे. गेल्या वेळी काँग्रेस (Congress) पक्षाने गोव्यात सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या; मात्र तरीही सरकार स्थापन करण्यात भाजपला यश मिळालं होतं. त्यामुळे बहुमताचा आकडा कुणी गाठला नाही तरी त्याच्या आसपास पोहोचणाऱ्या पक्षाला सत्ता मिळण्याची समान संधी आहे, असं मानलं जातं. किंग मेकर कोण ठरणार हे अधिक महत्त्वाचं ठरू शकतं.
  First published:

  Tags: Assembly Election, Goa

  पुढील बातम्या