Home /News /goa /

Goa Election 2022 : गोव्यात भाजपमध्ये मोठा ट्विस्ट, प्रमोद सावंत यांचे मुख्यमंत्रिपद धोक्यात?

Goa Election 2022 : गोव्यात भाजपमध्ये मोठा ट्विस्ट, प्रमोद सावंत यांचे मुख्यमंत्रिपद धोक्यात?

Goa Assembly Election Result Live Updates: गोव्यात सरकार स्थापन करण्यासाठी भाजपची तयारी सुरू झाली आहे. आजच भाजप राज्यपालांना भेटून सत्तास्थापनेचा दावा करणार आहे.

गोवा, 10 मार्च : गोवा विधानसभा निवडणुकीमध्ये (Goa Assembly Election Result 2022) भाजपने (BJP) मोठी आघाडी घेतली आहे. भाजप सत्ता स्थापन करणार अशी दाट शक्यता असून तशी तयारी सुद्धा सुरू झाली आहे. पण, मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. भाजपच्या काही नेत्यांनी प्रमोद सावंत यांच्या नावाला नकार दर्शवला आहे. त्यांच्या जागी दुसऱ्या चेहऱ्याला संधी द्यावी अशी चर्चा रंगली आहे. गोव्यात भाजप 20 जागांवर आघाडीवर आहे. बहुमतासाठी एकच जागेची भाजपला गरज आहे. त्यामुळे समविचारी पक्षाला सोबत घेऊन भाजपने सत्ता स्थापनेची तयारी सुरू केली आहे.  पण भाजपचा गोव्यातील मुख्यमंत्री कोण होणार यावरून नवीन चर्चा रंगली आहे. प्रमोद सावंत (Pramod Sawant) विजयी जरी झाले असले तरी ते पुनः मुख्यमंत्री होण्याची शक्यता कमी सांगितलं जात आहे. त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यास भाजप नेत्यांची टाळाटाळ सुरू आहे.  भाजपचे महासचिव  सी टी रवी यांनी अनेक भाजपच्या नेत्यांची नाव घेत त्यांचेही काम चांगलं असल्याची भावना व्यक्त केली आहे. त्यामुळे कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होतं हे पाहण्याचे ठरणार आहे. दरम्यान, गोव्यात सरकार स्थापन करण्यासाठी भाजपची तयारी सुरू झाली आहे. आजच भाजप राज्यपालांना भेटून सत्तास्थापनेचा दावा करणार आहे. तर 14 मार्चला भाजपचा शपथविधी होणार असल्याचं समोर आलं आहे (Oath Taking Ceremony in Goa). तिन्ही अपक्षांनी भाजपला पाठिंबा दिला असल्याची माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली आहे. उत्पल पर्रिकरांना पराभूत गोवा विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. अनेक वर्षं गोव्याचं मुख्यमंत्रिपद सांभाळलेले लोकप्रिय नेते मनोहर पर्रीकर यांच्या पश्चात होणारी ही पहिलीच निवडणूक आहे. त्यात त्यांचे पुत्र उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) यांना हव्या असलेल्या मतदारसंघात भाजपने तिकीट न दिल्याने अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आहे. मात्र, आता उत्पल पर्रीकर यांचा पराभव झालेला आहे. परंतु, उत्पल पर्रीकर यांचा पराभव करणारे बाबूश मोन्सेरातभाजपवरच नाराज आहेत. पणजीमधून भाजपानं बाबूश मॉन्सेरात यांना उमेदवारी दिली होती. अपक्ष म्हणून निवडणूक लढवणाऱ्या उत्पल पर्रीकरांचा 800 हून जास्त मतांनी पराभव झाला आहे. मात्र पर्रीकरांविरोधात झालेल्या या विजयानंतरही बाबूश मॉन्सेरात यांनी भाजपावर आणि पक्षाच्या स्थानिक नेतृत्वावर तोंडसुख घेतलं आहे.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Assembly Election, BJP, Goa

पुढील बातम्या