गोव्यात 12 वीच्या बोर्ड परीक्षा रद्द; विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्त्वाची - मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोव्यात 12 वीच्या बोर्ड परीक्षा रद्द; विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्त्वाची - मुख्यमंत्री प्रमोद सावंत

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोव्यात 12 वीच्या बोर्ड परीक्षा रद्द करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांनी विद्यार्थ्यांची सुरक्षितता आमच्यासाठी महत्त्वाची असल्याचे सांगितले.

  • Share this:

पणजी, 2 जून : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोव्यात 12 वीच्या बोर्ड परीक्षा (Goa 12th standard Board Exams ) रद्द करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांनी विद्यार्थ्यांची सुरक्षितता आमच्यासाठी महत्त्वाची असल्याचे सांगत हा निर्णय घेतला आहे. कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील मोदी सरकारने कालच CBSE बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता.

गोव्यात बारावीच्या परीक्षांबाबत तीन पर्याय सरकारच्या विचाराधीन होते एक तर परीक्षा पूर्णता रद्द करणे, दुसरा पर्याय म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायची आहे त्यांना बसू देणे आणि ज्यांना परीक्षा द्यायची नाही त्यांना अंतर्गत गुणांच्या आधारावर पुढच्या वर्गात प्रवेश देणे व दोन्हींचे निकाल एकत्रच जाहीर करणे. मात्र, अखेर तज्ज्ञांचा विचार घेऊन आणि राज्यातील कोरोना परिस्थितीचा विचार करता अखेर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

CBSE बोर्डानं बारावीच्या परीक्षा रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आज सकाळी मुख्य सचिव, शिक्षण सचिव, गोवा शालांत व उच्च माध्यमिक मंडळाचे अध्यक्ष, शिक्षण खात्याचे संचालक, उच्च शिक्षण खात्याचे संचालक यांची उच्चस्तरीय बैठक घेऊन या विषयावर चर्चा केली. त्यानंतर सायंकाळी याबाबत निर्णय घेण्यात आला.

सीबीएसई तसेच केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्याही आम्ही संपर्कात आहोत. इतर राज्यांच्या शालांत व उच्च माध्यमिक मंडळांनी बारावीबाबत काय निर्णय घेतला आहे हे तपासून आज सायंकाळपर्यंत आम्ही काय तो अंतिम निर्णय घेऊ. या परीक्षांविषयी आम्हाला लवकरात लवकर निर्णय घ्यावा लागणार होता, असे मुख्यमंत्री म्हणाले.

हे वाचा - Explainer: कोविड बाधितांच्या कुटुंबासाठी ईपीएफओच्या या आहेत योजना; खातेधारकांना मोठा आधार

सकाळी मुख्यमंत्र्यांनी बोलताना सांगितले होते की, तीन पर्याय आम्ही दिले आहेत. परंतु, एखाद्या विद्यार्थ्याने जर परीक्षा देणे पसंत केले आणि परीक्षेत त्याला कमी गुण मिळाले तर संबंधित विद्यार्थीनंतर अंतर्गत गुणांवर दावा करू शकणार नाहीत. अंतर्गत गुणांच्या आधारावर आपल्याला उत्तीर्ण करा, अशी मागणी करू शकणार नाहीत. ती मान्य केली जाणार नाही. दरम्यान, केंद्राचे नवीन शैक्षणिक धोरण आगामी शैक्षणिक वर्षापासून पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक स्तरावर लागू केले जाईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

Published by: News18 Desk
First published: June 2, 2021, 10:30 PM IST

ताज्या बातम्या