पुण्यात गणेशोत्सवातही लागू असणार कलम 144, मिरवणुकांवरही बंदी

पुण्यात गणेशोत्सवातही लागू असणार कलम 144, मिरवणुकांवरही बंदी

पुण्यात आगमन विसर्जनाच्या मिरवणुकांवर बंदी असणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

  • Share this:

पुणे, 19 ऑगस्ट : यंदाच्या गणेशोत्सवावर कोरोनाचं सावट आहे. अशात गणेश विसर्जनासाठी महापालिका शहरातील घाटांवर कोणतीही सुविधा उपलब्ध करून देणार नाही. घरच्या घरीच मूर्ती विसर्जित करा उत्सव सध्या पद्धतीने साजरा करा असं आवाहन आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडून करण्यात आलं आहे. अशात गणेश उत्सव काळातही कलम 144 लागू असणार आहे अशी माहिती देण्यात आली आहे.

अशात पुण्यात आगमन विसर्जनाच्या मिरवणुकांवर बंदी असणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. कोरोनाची परिस्थिती बघता आम्ही केलेल्या अहवानाला प्रतिसाद देत पिंपरी चिंचवड शहरतील 50 टक्के गणेश मंडळांनी यावर्षी मूर्ती प्रतिष्ठपना करणार नाहीत असं पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी सांगितलं आहे.

कोरोनाच्या संकटात यंदा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन पोलीस, सरकार आणि नेते मंडळींनी दिला आहे. यासाठी पुणे पोलिसांनी गणेशोत्सव कसा साजरा करावा यासंबंधी एक आचारसंहिता जारी केली आहे. यामध्ये पोलिसांनी आगमन व विसर्जन मिरवणूक काढू नये, असे आवाहन जनतेला केले आहे.

पुणे शहरात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात नियमांचे पालन करणे गरजेचे असल्याचे पोलिस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच, यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीनं साजरा करण्यावर भर द्यावा, असे आवाहनी त्यांनी नागरिकांना केले आहे.

मुलांच्या मनातील त्या प्रश्नांची उत्तरं; कोणत्या वयात, कसं द्यावं लैंगिक शिक्षण?

अशी आहे पोलिसांची आचारसंहिता

गणेश मूर्ती खरेदी

गणेश मूर्तीची खरेदी ऑनलाईन पद्धतीने करावी

यंदा स्टॉलला पदपथ, रस्त्यांवर परवानगी नाही

शाळांची पटांगणे, मोकळ्या जागांवर स्टॉलला परवानगी

श्री गणेश आगमनासाठी असणार असे नियम

आगमन व विसर्जन मिरवणूक काढू नये

आगमन व विसर्जनासाठी कमीत कमी नागरीकांची उपस्थिती असावी

श्री गणेश प्रतिष्ठापना करताना घ्या काळजी

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना मंदिरातच करावी

अनन्यसाधारण परिस्थितीत मनपाच्या नियम व अटींचे पालन करुनच छोट्या मंडपांना परवानगी

सार्वजनिक मंडळांसाठी श्रींच्या मूर्तीची मूर्तीची उंची चार फुट व घरगुती गणपतीसाठी दोन फुट असावी

श्री गणेश पूजा करताना असतील असे नियम

नवी मुंबईकरांच्या जीवाला धोका, डॉक्टरांनी वापरलेले हातमोजे धुवून पुन्हा वापरात

आरती व पुजेसाठी 5 व्यक्तींचे बंधन, बाहेरील व्यक्तींचा सहभाग असू नये

सॅनिटायझर, मास्क व सोशल डिस्टंसींग अनिवार्य

गणेश दर्शन ऑनलाइनच!

दर्शनासाठी ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक आदी माध्यमांचा वापर करावा

ऑनलाईन व्यवस्था नसल्यास छोटे व्हिडीओ बनवून पाठवावेत

दर्शनासाठी ऑनलाईन टोकन, डिजीटल पास द्यावा व सामाजिक अंतराचे पालन करावे

कोणत्याही निमंत्रीत किंवा व्हिआयपी व्यक्तींना दर्शनासाठी आमंत्रीत करू नये

Published by: Renuka Dhaybar
First published: August 19, 2020, 11:20 PM IST

ताज्या बातम्या