Home /News /ganesh-chaturthi /

Ganesh Chaturthi 2020 : गणेश चतुर्थीच्या पूजेचा मुहूर्त आणि महत्त्व

Ganesh Chaturthi 2020 : गणेश चतुर्थीच्या पूजेचा मुहूर्त आणि महत्त्व

बुद्धीची देवता आणि विघ्नहर्ता आणि दु:खकर्ता म्हणून या गणरायाची पूजा केली जाते.

    मुंबई, 21 ऑगस्ट : भाद्रपद महिन्याच्या सुरुवातीलाच पहिला सण गणेश चतुर्थी. श्री गणेशाचा उत्सव भाद्रपद शु. 04 ते भाद्रपद शु. 10 अनंत चर्तुदशी 10 दिवसांचा असतो. गणेश चतुर्थीला गणरायाचं आगमन होतं. 22 ऑगस्ट रोजी म्हणजे शनिवारी गणेश चतुर्थीचा सण आहे. गणेश चतुर्थी भारतात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. गणेश चतुर्थीला विनायक चतुर्थी देखील म्हटलं जातं. गणेश चतुर्थीला गणपतीची पूजा केली जाते. महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेशात गणेश चतुर्थी साजरी केली जाते. गणेश चतुर्थीला बरेच लोक घरात गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करतात. भजन, अखंड दीप आणि पूजा गणेश चतुर्थीपर्यंत पाठ करतात. गणेश चतुर्थीचा सण दोन दिवस आणि काही दिवस दहा दिवस साजरा करतात. त्याला गणेश महोत्सव देखील म्हणतात. हे वाचा-कोरोना लॉकडाऊनमध्ये सेलिब्रिटी झाले मूर्तीकार; स्वत: साकारला आपल्या घरचा बाप्पा 21 ऑगस्ट रात्री 11 वाजून 02 मिनिटांपासून 22 ऑगस्ट संध्याकाळी 7.56 मिनिटांपर्यंत शुभ मुहूर्त आहे. सकाळी 10.46 मिनिटांपासून ते दुपारी 1.57 मिनिटांपर्यंत गणेश पूजन मुहूर्त असणार आहे. गणेश चतुर्थीला रात्री चंद्राचं दर्शन करू नये ते शुभ मानलं जात नाही असा एक समज आहे. बुद्धीची देवता आणि विघ्नहर्ता आणि दु:खकर्ता म्हणून या गणरायाची पूजा केली जाते. कार्यातील येणारं विघ्न दूर करण्यासाठी आणि कोणतंही विघ्न येऊ नये म्हणून सर्वप्रथम गणरायाची पूजा केली जाते. गणपती ही बुद्धीची देवता आहे त्यामुळे बुद्धी, तेज आणि नव चेतना आणि ऊर्जा मिळण्यासाठी गजाननाची मनोभावे पूजा केली जाते. अंनत चतुर्थीच्या दिवशी जड अंतरकरणानं आणि भरलेल्या डोळ्यांनी याच गणरायाला निरोप दिला जातो. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या! या जयघोषातून त्याला आनंदानं पाठवण्याचा आणि पुन्हा पुढच्या वर्षी तो येणार अशी आतूरतेनं भाविक वाट पाहातात.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या