गावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती

भारतातील एकमेव चार मुख असलेल्या गणपतीची मूर्ती बीड जिल्ह्यातील नवगण राजुरीच्या गणेशधाम इथं आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 29, 2019 04:56 PM IST

गावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती

शशी केवडकर, बीड:  भारतातील एकमेव चार मुख असलेल्या गणपतीची मूर्ती बीड जिल्ह्यातील नवगण राजुरीच्या गणेशधाम इथं आहे. समोर महामंगलेश्वर, मागच्या बाजूला शेषाद्रीदिष्टीत, उजव्या बाजूला मयुरेश्वर आणि डाव्याबाजूला उत्तिष्ठ गणपती. बीड-पुणे या महामार्गावर असलेलं हे देवस्थान अत्यंत जागृत देनवस्थान असल्याची भाविकांची श्रद्धा आहे.

बीड शहारापासून दहा किलोमीटरवर असलेलं नवगण राजुरी खुद्द ब्रह्मदेवानं स्थापित केलं, अशी आख्यायिका आहे. या गावाला गणपतीचं गाव म्हटलं तर वावगं ठरणार नाही. चार मुख असलेली गणेशमूर्ती इथं आहे. आणि मूर्तीच्या चारही गणपतीची नावंसुद्धा वेगवेगळी आहेत. समोरच्या बाजूचा महामंगलेश्वर, मागच्या बाजूचा शेषाद्रीदिष्टीत, उजव्या बाजूचा मयुरेश्वर आणि डाव्याबाजूचा उत्तिष्ठ गणपती.

गावाच्या चारही दिशेलासुद्धा गणपतीच्या चार मूर्ती आहेत. चिंतामणी, वरद, संगमेश्वर आणि त्रिपुराधिष्टीत. तर उत्सव मूर्ती असलेल्या गणपतीचं नाव आहे निर्विघ्नेश्वर. म्हणजे एकूण नऊ गणपती या नवगण राजुरीत आहेत. प्रभू रामचंद्र वनवासात असताना या ठिकाणी यज्ञ करत होते, तेव्हा दानवांनी यात विघ्न आणण्याचा प्रयत्न केला. परंतु गणपतीनं चारही दिशेने स्वतःचा अवतार घेऊन दानवांचा नाश केला अशी दंतकथा आहे.

अंगावर काटा आणणारा VIDEO, तरुणाने एसटी खाली घेतली उडी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 20, 2018 06:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...