Ganesh Chaturthi 2019: भारतातली 10 सर्वात मोठी गणपती मंदिरं, जिथे बॉलिवूड स्टारही होतात नतमस्तक

पुण्यातील या मंदिराच्या देवदर्शनाला महाराष्ट्रातून अनेक सेलिब्रिटी येतात. सर्वात श्रीमंत मंदिरांच्या ट्रस्टच्या यादीत श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिराच्या ट्रस्टचं नाव आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 2, 2019 01:44 PM IST

Ganesh Chaturthi 2019: भारतातली 10 सर्वात मोठी गणपती मंदिरं, जिथे बॉलिवूड स्टारही होतात नतमस्तक

श्री सिद्धिविनायक मंदिर- गणपतीच्या प्रसिद्ध मंदिरांपैकी हे मंदिर सर्वात पहिल्या स्थानी आहे. मुंबईत हे मंदिर असून असं म्हटलं जातं की एका महिलेनं हे मंदिर बांधलं होतं. सिद्धिविनायकाच्या दर्शनाला बॉलिवूडमधील अनेक कलाकार येतात.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर- पुण्यातील या मंदिराच्या देवदर्शनाला महाराष्ट्रातून अनेक सेलिब्रिटी येतात. सर्वात श्रीमंत मंदिरांच्या ट्रस्टच्या यादीत श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिराच्या ट्रस्टचं नाव आहे. असं म्हटलं जातं की, श्रीमंत दगडूशेठ आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांनी त्यांचा एकुलता एक मुलगा प्लेगच्या आजारात गमावला. ज्यानंतर दोघांनी या गणेश मूर्तीची स्थापना केली. यानंतर दरवर्षी मोठ्या उत्साहाना गणेशोत्सव साजरा केला जातो.

कनिपकम विनायक मंदिर चित्तूर- विघ्नहर्त्या गणपतीचं हे मंदिर आंध्र प्रदेशमधील चित्तूर येथे आहे. असं मानलं जातं की, इथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताचे पाप हरले जातात. या मंदिराचं विशेष म्हणजे हे मंदिर नदिच्या मधोमध आहे. या मंदिराची स्थापना 11 व्या दशकात चोल राजा कुलोतुंग चोल प्रथमने केली होती. याचा विस्तार नंतर 1336 मध्ये विजयनगर साम्राज्याने केला.

मनकुला विनायक मंदिर, पॉण्डिचेरी- मंदिराचा इतिहास हा पॉण्डिचेरीमध्ये फ्रेंच लोक येण्याआधापासूनचा आहे. शास्त्रात गणेशाच्या 16 रुपांबद्दल सांगण्यात आलं आहे. यात पॉण्डिचेरी येथील गणपतीचं तोंड समुद्राच्या दिशेने आहे. याला भुवनेश्वर गणपती असं म्हणतात. तमिळमध्ये मनलचा अर्थ वाळू आणि कुलनचा अर्थ सरोवर असा आहे. अनेक वर्षांपूर्वी गणेश मूर्तीच्या बाजूला वाळूच वाळू होती. यामुळे या गणपतीला मनकुला विनयागर असं म्हटलं जातं.

मधुर महागणपती, केरळ- असं म्हटलं जातं की, सुरुवातीला हे शंकराचं मंदिर होतं. मात्र पुजाऱ्यांच्या लहान मुलाने मंदिराच्या भिंतीवर गणपतीचा फोटो लावला. असं म्हणतात की, मंदिरात ठेवण्यात आलेल्या प्रतिमेचा आकार दिवसागणित बदलता चालला होता. तो फोटो दरदिवशी मोठा आणि जाड होत गेला. त्या दिवसापासून हे मंदिर फार महत्त्वाचं झालं.

Loading...

रणथंभौर गणेश मंदिर, राजस्थान- राजस्थानमधील सवाई माधवपुरपासून जवळपास १० किमी अंतरावर रणथंभौर किल्यात हे मंदिर आहे. हे मंदिर गणेशाला पत्र पाठवण्यासाठी प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे इथे राहणाऱ्या लोकांच्या घरात कोणतं मंगलकार्य असेल तर सर्वातआधी गणेशाच्या नावाने कार्ड पाठवायला विसरत नाहीत. हे मंदिर 10 व्या दशकात रणथंभौरचे राजा हमीन यांनी बांधलं होतं.

मोती डूंगरी गणेद शमंदिर, जयपुर- राजस्थानमधील जयपुर येथील हे सर्वात प्रसिद्ध मंदिर आहे.जयपुरमधील सेठ जय राम पालीवाल यांनी 18 व्या दशकात हे मंदिर बांधलं होतं.गणेशोत्सवाला इथे प्रचंड गर्दी असते.

गणेश टोक मंदिर, गंगटोक- या मंदिरात जाण्यासाठी तीन मजल्यांच्या घराएवढे जिने चढावे लागतात. मंदिराच्या आत नेपाळी पुजारी पूजा करताना दिसतात.ते भक्तांना प्रसाद देतात आणि हातात कलावा बांधतात. मंदिराच्या आत गणपतीची फार मोठी आणि सुंदर मुर्ती आहे. मंदिराच्या चारही बाजूंना परिक्रमेसाठी रस्ता आहे. या रस्त्यावरून गंगटोक शहराचं सौंदर्य दिसतं.

गणपतीपुळे, रत्नागिरी, महाराष्ट्र- या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे गणपतीची मुर्तीही उत्तर दिशेला नसून पश्चिम दिशेला आहे. इथे येणाऱ्या भक्तांच्या मते, या मंदिराची स्थापना कोणा एका व्यक्तिने केली नसून अनेक मुर्त्या या स्वतः प्रकट झाल्या.

उच्ची पिल्लयार मंदिर, तमिळनाडू- तिरुचिरापल्लीमध्ये त्रिची नावाच्या ठिकाणी रॉक फोर्ट नावाची एक टेकडी आहे. इथे गणपतीचं मंदिर आहे. हे मंदिर जवळपास 273 फुट उंचावर आहे आणि मंदिरापर्यंत जाण्यासाठी जवळपास 400 पायऱ्या चढाव्या लागतात.

तुळस फक्त गणेश चतुर्थीच्या दिवशीच का वाहतात? वाचा काय आहे यामागची कथा

या देशात गाढ झोपेसाठी लोक मोजतात चक्क 5.8 लाख रुपये!

अॅडव्हेंचर अनुभवायचं असेल तर या 6 ठिकाणी फक्त मित्रांसोबतच जा

सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे रंगले बाप्पाच्या स्वागतात, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 2, 2019 12:27 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...