मराठी बातम्या /बातम्या /explainer /

Year Ender 2021: यंदाच्या वर्षी कोरोनाच नाही तर 'या' विषाणूंनीही हाहाकार उडाला होता! पुन्हा येण्याची भिती कायम

Year Ender 2021: यंदाच्या वर्षी कोरोनाच नाही तर 'या' विषाणूंनीही हाहाकार उडाला होता! पुन्हा येण्याची भिती कायम

Corona and other viruses attack in 2021: कोरोना संसर्गाने जगभरात हाहाकार उडाला आहे. मात्र, यावर्षी एकट्या कोरोनाने आपल्याला उध्वस्त केलं नाही तर इतर अनेक विषाणूंनीही आपल्या आयुष्यात नव्याने प्रवेश केला आहे. त्यांची भीषणता कोरोनापेक्षा कमी नाही. यापैकी काही असे आहेत, ज्यांच्याबद्दल असे बोलले जात आहे की, येत्या काळात हे व्हायरस जगासाठी संकटाचे कारण बनू शकतात.

Corona and other viruses attack in 2021: कोरोना संसर्गाने जगभरात हाहाकार उडाला आहे. मात्र, यावर्षी एकट्या कोरोनाने आपल्याला उध्वस्त केलं नाही तर इतर अनेक विषाणूंनीही आपल्या आयुष्यात नव्याने प्रवेश केला आहे. त्यांची भीषणता कोरोनापेक्षा कमी नाही. यापैकी काही असे आहेत, ज्यांच्याबद्दल असे बोलले जात आहे की, येत्या काळात हे व्हायरस जगासाठी संकटाचे कारण बनू शकतात.

Corona and other viruses attack in 2021: कोरोना संसर्गाने जगभरात हाहाकार उडाला आहे. मात्र, यावर्षी एकट्या कोरोनाने आपल्याला उध्वस्त केलं नाही तर इतर अनेक विषाणूंनीही आपल्या आयुष्यात नव्याने प्रवेश केला आहे. त्यांची भीषणता कोरोनापेक्षा कमी नाही. यापैकी काही असे आहेत, ज्यांच्याबद्दल असे बोलले जात आहे की, येत्या काळात हे व्हायरस जगासाठी संकटाचे कारण बनू शकतात.

पुढे वाचा ...
  • Published by:  Rahul Punde

मुंबई, 14 डिसेंबर : Corona and other viruses attack in 2021: एखाद्या विषाणूमुळे जगभरात उलथापालथ झाल्याची ही इतिहासातील कदाचित पहिलीच वेळ आहे. कोरोनाने आपल्या मनावर इतका भयानक आघात केलाय की हजारो वर्षांनंतरही त्याची वेदना जाणवू शकते. असं कोणतेही क्षेत्र नाही ज्यावर कोरोनाचा परिणाम झाला नसेल. लाखो लोकांचे जीवन उद्ध्वस्त झाले, अनेकांचा रोजगार संपला. जगभरातील सरकारी तिजोऱ्या रिकाम्या होत आहेत. कोट्यवधी लोक भयंकर संकटात सापडले. अशा परिस्थिती ही वाईठ वेळ आपली पाठ कधी सोडणार याची काहीच खात्री नाही.

गंमत अशी आहे की या वर्षी एकट्या कोरोनाने आपल्याला उध्वस्त केलं नाही तर इतर अनेक विषाणूंनीही आपल्या आयुष्यात नव्याने प्रवेश केला आहे. त्यांची भीषणता कोरोनापेक्षा कमी नव्हती. यापैकी काही असे आहेत, ज्यांच्याबद्दल असे बोलले जात आहे की, येत्या काळात हे व्हायरस जगासाठी संकटाचे कारण बनू शकतात. आज आपण अशा काही विषाणूंबद्दल चर्चा करणार आहोत ज्यांनी 2021 मध्ये प्रचंड खळबळ माजवली.

2021 मध्ये त्रासदायक इतर व्हायरस

इबोला

इबोला हा एका व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तीकडे प्रसारित होणारा अतिशय धोकादायक आजार आहे. हा इबोला विषाणूमुळे पसरतो. या आजाराने ग्रस्त रुग्णांपैकी निम्म्या रुग्णांचा मृत्यू होतो. या आजाराची लागण झाल्यानंतर रुग्णामध्ये ताप, थकवा, स्नायू दुखणे, घसा खवखवणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात, त्यानंतर जुलाब व उलट्या सुरू होतात. या वर्षी या रोगाने काँगोमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली. 2014 पासून हा आजार साथीच्या रूपाने समोर आला आहे. गिनी, सिएरा लिओन आणि लायबेरिया ही या रोगाची प्रमुख केंद्रे आहेत.

WHO ने हा आजार येत्या काही वर्षात जागतिक आरोग्यासाठी 10 सर्वात धोकादायक आजारांच्या यादीत टाकला आहे. 2016 पर्यंत 11 हजारांहून अधिक लोकांचा जीव घेतल्यानंतर इबोलाची लागण थांबली असली तरी यावर्षी पुन्हा डोके वर काढले आहे. डब्ल्यूएचओच्या म्हणण्यानुसार, गिनीमध्ये यावर्षी इबोलाची एकूण 23 प्रकरणे नोंदवली गेली, ज्यामध्ये 12 लोकांचा मृत्यू झाला.

निपाह (Nipah)

1999 मध्ये मलेशियापासून या विषाणूचा लागण सुरू झाली. आज अनेक देशांमध्ये निपाह व्हायरसचा उद्रेक आहे. हा विषाणू डुकरांकडून माणसात आला. डब्ल्यूएचओच्या म्हणण्यानुसार, भारताव्यतिरिक्त, बांगलादेश, कंबोडिया, इंडोनेशिया, मादागास्कर, फिलीपिन्स आणि थायलंडमध्ये या विषाणूचा उद्रेक झाला होता. या वर्षी केरळमध्ये निपाह व्हायरसमुळे 12 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. 4 सप्टेंबर रोजी केरळमध्ये निपाह विषाणूचा पाचवा रुग्ण आढळून आला. या आजारात ताप, कफ, डोकेदुखी, धाप लागणे, भ्रम होणे अशी लक्षणे दिसतात. दोन ते तीन दिवसांत रुग्ण कोमात जातो. हा आजार झाल्यानंतर 50 ते 75 टक्के लोकांचा मृत्यू होतो.

Explainer : ओमिक्रॉन विषाणूमुळे भारतात तिसरी लाट येऊ शकते का?

झिका विषाणू

या वर्षी भारतात झिका विषाणूच्या संसर्गाची शंभरहून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. झिका विषाणूचा प्रादुर्भावही केरळमध्ये सर्वाधिक होता. युगांडातून या विषाणूचा संसर्ग झाल्याचे पहिले प्रकरण समोर आले आहे. या आजारात हलकासा ताप, त्वचेवर पुरळ, डोळ्यांना खाज, अंगदुखी अशी लक्षणे दिसून येतात, पण सहसा झिका विषाणूची लक्षणे अनेक दिवस दिसून येत नाहीत.

मेरबर्ग वायरस (marburg virus)

इबोला विषाणूप्रमाणेच मेरबर्ग विषाणू देखील अतिशय धोकादायक आहे. त्याला इबोलाचा चुलत भाऊ म्हणतात. डब्ल्यूएचओच्या म्हणण्यानुसार, याची लागण झालेल्या रुग्णांपैकी 88 टक्के रुग्णांचा मृत्यू होतो. हा विषाणू देखील इबोला कुटुंबातील एक विषाणू आहे. 1967 मध्ये या रोगाचा पहिला प्रादुर्भाव जर्मनी आणि सर्बियामध्ये झाला. पण आज अनेक आफ्रिकन देशांसाठी ती डोकेदुखी बनली आहे. या वर्षी गिनी आणि युगांडामध्ये मेरबर्ग विषाणूची प्रकरणे नोंदवली गेली. या आजारात जुलाब, उलट्या ही लक्षणेही दिसून येतात. रक्तस्त्राव सुरू झाल्यानंतर बहुतेक रुग्णांचा मृत्यू होतो.

यलो फिव्हर

यलो फिव्हरचा विषाणू दुसऱ्या व्यक्तीमध्ये वेगाने पसरतो. यावर्षी नायजेरियात यलो फिव्हरचे 1312 रुग्ण आढळले आहेत. पिवळा ताप हा विषाणू वाहून नेणाऱ्या एडिस इजिप्ती डासाच्या चाव्याव्दारे होतो. या आजारात यकृत आणि किडनीचे नुकसान होऊ लागते. ताप, उलट्या, पोटदुखी, कावीळ अशी लक्षणे दिसतात. योग्य वेळी उपचार न केल्यास 7 ते 10 दिवसांत रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो. WHO च्या मते, आफ्रिकेतील 47 देश, मध्य अमेरिकेतील 34 देश आणि दक्षिण अमेरिकेतील 13 देश या आजाराच्या विळख्यात सापडले आहेत. मात्र, हा आजार लसीने टाळता येऊ शकतो.

Alert! तुम्हालाही रात्री होतोय का असा त्रास? हे ओमिक्रॉनचं लक्षण, दुर्लक्ष नको

नोरोव्हायरस Norovirus

या वर्षी नोव्हेंबरमध्ये, केरळमधील एका पशुवैद्यकीय महाविद्यालयातील 13 विद्यार्थ्यांमध्ये नोरोव्हायरस संसर्गाची प्रकरणे नोंदवली गेली. या विषाणूच्या संसर्गामुळे पोटाशी संबंधित गंभीर समस्या उद्भवतात. डायरियासारखी स्थिती होते. 1968 मध्ये हा आजार अमेरिकेतील नॉर्वॉक शहरातून पसरला होता. यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शननुसार, जगभरातील पाच रुग्णांपैकी एक रुग्ण जो अतिसार आणि उलट्याशी संबंधित गुंतागुंतांमुळे आजारी पडतो तो नोरोव्हायरसशी संबंधित आहे.

रिफ्ट व्हॅली ताप

आफ्रिकेतील अनेक देशांमध्ये रिफ्ट व्हॅली फिव्हरचा प्रादुर्भाव आहे. हा आजार रिफ्ट व्हॅली फिव्हर नावाच्या विषाणूमुळे होतो. या रोगात रक्तस्त्राव झाल्याने माणूस गोंधळतो. लवकरच संसर्ग यकृतापर्यंत पोहोचतो. हा आजार अत्यंत जीवघेणा आहे. रिफ्ट व्हॅली फिव्हरची लागण झालेल्या व्यक्तीला रक्तस्त्राव सुरू झाला तर त्यातील 50 टक्के मृत्यू निश्चित आहेत. या वर्षी, केनियामध्ये रिफ्ट व्हॅली तापाचे 32 प्रकरणे नोंदवली गेली ज्यात 11 लोकांचा मृत्यू झाला.

First published:

Tags: Coronavirus, Disease symptoms, Virus