नवी दिल्ली, 29 सप्टेंबर : जागतिक हृदय दिन (World Heart Day) दरवर्षी 29 सप्टेंबर रोजी वर्ल्ड हार्ट फेडरेशनद्वारे साजरा केला जातो, ज्याचा उद्देश लोकांना हृदयाशी (Heart ) संबंधित आजारांविषयी जागरूक करणे हा आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या संयुक्त विद्यमाने 1999 साली याची सुरुवात करण्यात आली. आजकाल 30 ते 35 वयोगटातील लोकांनाही हृदयाशी संबंधित आजार होत आहेत, बहुतेक प्रकरणांमध्ये लोकांना त्यांच्या शरीरात कोणता दोष आहे, हे देखील माहीत नसते. कधी-कधी प्रकरण इतके वाढते की डॉक्टरांपर्यंत पोहचण्यासही वेळ मिळत नाही.
दैनिक जागरणमध्ये प्रकाशित केलेल्या अहवालात, वरिष्ठ हृदयरोग तज्ञ आणि मेदांता मेडसिटी गुरुग्रामचे अध्यक्ष डॉ. नरेश त्रेहान म्हणतात की, 30 ते 35 या वयोगटात अगदी तंदुरुस्त दिसणारे तरुण देखील हृदयविकाराच्या झटक्याला बळी पडतात, ही मोठ्या चिंतेची बाब आहे. त्यांच्या मते कोरोनरी धमनी अडथळा (ब्लॉकेज) हा हृदयविकाराचा झटका आणि अचानक मृत्यूचे प्रमुख कारण आहे. कोरोनरी धमनीमध्ये अडथळा असल्यास, हृदयविकाराचा झटका आणि अचानक मृत्यूचा धोका 20 टक्क्यांनी वाढतो.
त्यांनी सांगितले की अनेक वेळा असे दिसून आले आहे की, जेव्हा तणाव असतो, व्यायाम करताना, धावताना अचानक हृदयविकाराचा झटका येतो. तुम्ही बऱ्याच वेळा ऐकले असेल की एखादी व्यक्ती रात्री हसत हसत झोपली, त्याला कोणताही ताण किंवा नैराश्य नव्हते, पण तो सकाळी उठला नाही. त्याच वेळी, हे देखील अनेक वेळा पाहिले गेले आहे की एक 30 वर्षीय माणूस जो पूर्णपणे फिट दिसत होता तो ट्रेडमिलवर धावत होता, अचानक त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे हे सर्व अचानक घडत नाही, कुठेतरी त्यांना आधी काही समस्या आलेली असते त्याकडे कदाचित दुर्लक्ष झालेले असू शकते.
भारतात हृदयरोगाचे प्रमाण
भारतामध्ये हृदयाशी संबंधित रोगांच्या जोखमीबद्दल बोलायचे झाल्यास पाश्चिमात्य देशांपेक्षा आपल्याकडील प्रमाण खूप जास्त आहे. अमेरिकेसारख्या देशात 4-5 टक्के लोक हृदयरोगाने ग्रस्त आहेत, तर भारतात ही संख्या 10 ते 12 टक्के आहे. एवढेच नव्हे तर अमेरिकेच्या तुलनेत 10 वर्षांच्या तरुण वयात भारतात हृदयरोग होतो. म्हणजेच, अमेरिकेत हृदयरोगाचे सरासरी वय 50 ते 60 वर्षांच्या दरम्यान आहे, तर भारतात तेच केवळ 40 ते 50 वर्षांच्या दरम्यान आहे. हृदयाशी संबंधित रोगावरनंतर स्टेंट किंवा बायपास शस्त्रक्रियेद्वारे उपचार केले जातात.
मधुमेह असल्यास सतर्क रहा
डॉ. त्रेहानच्या मते, जर पालकांना अनेक रोग असतील तर त्याचा मुलांनाही धोका जास्त राहतो. उदाहरणार्थ, मधुमेही रुग्णांमध्ये कोरोनरी आर्टरी ब्लॉकेजचा धोका जास्त असतो. जर पालकांपैकी कोणाला मधुमेह असेल तर मुलाला मधुमेह होण्याची 25 टक्के शक्यता असते. आणि जर दोन्ही पालकांना हा आजार असेल तर मुलांमध्ये तो होण्याची शक्यता 50 टक्के होते.
या चाचण्या आवश्यक आहेत
वयाच्या 30 व्या वर्षी काही महत्त्वाच्या आरोग्य तपासण्या करणं गरजेचं आहे. संपूर्ण आरोग्य तपासणीद्वारे, जोखीम घटक ओळखले जातात. कोलेस्टेरॉल जास्त नाही ना, रक्तातील चरबीेचे प्रमाण काय, बीपी लेव्हल, थायरॉईड लेव्हल इ. जर कुटुंबातील कोणाला बीपी-शुगरचा त्रास असेल तर मुलांनी 25 वर्षीच चाचण्या केल्या पाहिजेत.
हे वाचा - ‘प्रिय मोदीजी, आमचे दात येत नाहीयेत’, चिमुकल्यांनी थेट पंतप्रधानांनाच लिहिलं पत्र, मागितली मदत
सीटी अँजिओग्राफी
जर तुमच्या चाचणीतून काही दोष दिसत असतील किंवा कौटुंबिक इतिहास, छातीत दुखणे किंवा इतर कोणतीही समस्या असल्यास, त्यानंतर सीटी अँजिओग्राफीद्वारे शरीराची तपासणी केली जाते. रोगाचा शोध लागताच उपचार सुरू केले जातात, यामध्ये डॉक्टरांच्या सल्ल्यानं औषधं घेणं आणि व्यायाम करणे फायदेशीर ठरते.
ब्रॅडीकार्डिया टाळा
हे हृदयाच्या ठोक्यांसंबंधित आहे. याचा अर्थ असा की जर आपल्या हृदयाचे ठोके 70 ते 84 पर्यंत असतील तर ते सामान्य मानले जाते. पण जर ते 90 च्या दिशेने गेले तर ते जलद मानले जातात. जर हृदयाचा ठोका कमी असेल, ब्रॅडीकार्डियाची परिस्थिती असेल, यात असे काय होते की हृदय सहजपणे रक्ताचे पंपींग करू शकत नाही. परंतु कधीकधी ते रक्तदाब किंवा इतर कोणत्याही रोगाच्या औषधांमुळे देखील होते.
अशा परिस्थितीत नंतर इलेक्ट्रोफिजियोलॉजी आधार घ्यावा लागतो. या चाचणीमध्ये, हृदयाच्या ठोक्यांमधील अंतर अनेक प्रकारे तपासले जाते. जर अंतर 3 सेकंदांपेक्षा जास्त असेल तर ते धोकादायक मानले जाते. अशा परिस्थितीत, बऱ्याच वेळा संपूर्ण ब्लॉकेज झालेले असू शकते, ज्याचा उपचार फक्त पेसमेकरद्वारेच केला जातो.
हे वाचा - गरम की थंड, अंघोळीसाठी कोणतं पाणी आहे योग्य? संशोधकांनी सांगितलं याचं हे उत्तर
सावध रहा
जर तुम्ही तणावात ओरडत असाल आणि छातीत दाब, घशात वेदना आणि अडथळा आल्यासारखे वाटत असेल तर सावध राहा. परंतु, मधुमेहाच्या रुग्णांमध्ये ही लक्षणे आढळत नाहीत. कारण मधुमेहामध्ये रुग्णांच्या नसा खराब होतात. जर स्नायू आनुवंशिकदृष्ट्या जाड असतील तर समस्या असू शकते.
जीवनशैली बदलणे आवश्यक
नियमित व्यायाम हा जीवनशैलीचा भाग बनला पाहिजे. जॉगिंग, ट्रेडमिल किंवा व्यायामाचा भाग बनवा.
साखर, पांढरा तांदूळ, मैदा आणि बटाटे यांपासून दूर रहा. जर तुम्हाला मधुमेह असेल तर या गोष्टी खाणे ताबडतोब सोडा.
दिवसात खाण्यात फक्त 15 मिली तेल वापरा.
चरबीयुक्त लोणी वापरणे थांबवा
दर 6 महिन्यांनी स्वयंपाक तेल बदला
पौष्टिक आणि संतुलित आहार घ्या
वजन नियंत्रणात ठेवा
धूम्रपान, अल्कोहोल आणि तंबाखू सोडून द्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.