Home /News /explainer /

लोखंडाचे असूनही रेल्वे रूळ का गंजत नाहीत? जाणून घ्या कारण

लोखंडाचे असूनही रेल्वे रूळ का गंजत नाहीत? जाणून घ्या कारण

हजारो किलोमीटरवर पसरलेल्या रेल्वेच्या रुळांना (railway tracks) कधी गंज (rusts) का लागत नाही ? तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर माहिती नसेल तर काळजी करू नका. कारण आम्ही तुम्हाला याबाबत माहिती देणार आहोत.

मुंबई, 8 जानेवारी : भारतीय रेल्वे (Indian Railways) संपूर्ण जगातील रेल्वेचे सर्वांत मोठे जाळे (largest network) असणारी यंत्रणा आहे. कुठेही जाण्याचे सर्वात स्वस्त आणि वेगवान साधन म्हणूनही रेल्वेची ओळख आहे. गावांपासून शहरांपर्यंत पसरलेल्या रुळावरून धावणारी रेल्वे आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. पण याच रेल्वे संदर्भात असे काही प्रश्न असतात, ज्याची उत्तरे सहसा तुम्हाला माहिती नसतील. असाच एक प्रश्न म्हणजे हजारो किलोमीटरवर पसरलेल्या रेल्वेच्या रुळांना (railway tracks) कधी गंज (rusts) का लागत नाही ? तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर माहिती नसेल तर काळजी करू नका. कारण आम्ही तुम्हाला याबाबत माहिती देणार आहोत. आपल्या घरातील अनेक वस्तू लोखंडाच्या (iron) बनलेल्या असतात. रेल्वे रुळ देखील लोखंडाचा बनलेला आहे. घरातील लोखंडाला गंज लागतो, पण रेल्वेच्या रुळाला कधीच गंज लागत नाही. या दोघांमध्ये नेमका काय फरक आहे, ज्यामुळे हे घडते, ते जाणून घेऊयात. रेल्वे रुळांना गंज का लागत नाही, हे जाणून घेण्यासाठी सर्वप्रथम लोखंडाला गंज का आणि कसा लागतो, हे जाणून घेणे आवश्यक आहे. लोखंड हा मजबूत धातू आहे, पण त्याला गंज लागल्यावर त्याचा काही उपयोग होत नाही. लोह किंवा लोखंडापासून बनवलेल्या वस्तू ऑक्सिजन आणि आर्द्रतेच्या संपर्कात येतात, तेव्हा त्यावर आयर्न ऑक्साईडचा तपकिरी थर जमा होतो. त्यामुळे हळूहळू लोह खराब होऊ लागते, व त्याचा रंग देखील बदलतो. याला लोह गंजणे म्हणतात. तर, अपघाताचा धोका निर्माण झाला असता जर रेल्वे रुळ साध्या लोखंडाने बनले असते, तर हवेतील आर्द्रतेमुळे ते गंजून कमकुवत झाले असते. त्यामुळे वारंवार रुळ बदलावे लागले असते. तसेच रेल्वे अपघाताचा धोका निर्माण झाला असता. त्यामुळेच रेल्वेच्या रुळासाठी विशेष प्रकारचे स्टिल वापरले जाते. म्हणून गंजत नाही रेल्वेचे रुळ रेल्वे रुळांना गंज का लागत नाही, असा प्रश्न जर विचारला तर अनेकांचे उत्तर असते की, रेल्वे रुळावरून जाताना होत असलेल्या चाकांच्या घर्षणामुळे गंज लागत नाही. पण प्रत्यक्षात तसे नाही. रेल्वे रुळ तयार करण्यासाठी खास प्रकारच्या स्टीलचा ( Steel) वापर केला जातो. स्टीलमध्ये मँगलॉय (Mangalloy) मिसळून हे रुळ तयार केले जातात. स्टील आणि मॅंगलॉयच्या मिश्रणाला मॅंगनीज स्टील (Manganese Steel) म्हणतात. या धातुचं ऑक्सिडायझेशन प्रमाण खूपच कमी असतं. यामुळे वर्षानुवर्षे रेल्वेचे रुळ गंजत नाहीत. इंग्रजांनी भारतात रेल्वे सुरू केली. रेल्वे धावण्यासाठी तयार करण्यात आलेले रुळ अनेक वर्षं टिकतात. ते तयार करताना जर साधे लोखंड वापरलं असतं, तर ते खराब झाले असतेच, शिवाय ते पुन्हा दुरुस्त करण्यासाठी मोठा खर्चही लागला असता.
First published:

Tags: Indian railway

पुढील बातम्या