मराठी बातम्या /बातम्या /explainer /कधी विचार केलाय? रात्री फोटोमध्ये का दिसतो डोळ्यांचा रंग लाल? इथे मिळेल या प्रश्नाचं उत्तर

कधी विचार केलाय? रात्री फोटोमध्ये का दिसतो डोळ्यांचा रंग लाल? इथे मिळेल या प्रश्नाचं उत्तर

अनेक कॅमेऱ्यांमध्ये काढलेल्या फोटोमध्येदेखील आपल्या डोळ्यातील काही भाग लाल रंगाचा (Red Eye In Photographs) दिसतो

अनेक कॅमेऱ्यांमध्ये काढलेल्या फोटोमध्येदेखील आपल्या डोळ्यातील काही भाग लाल रंगाचा (Red Eye In Photographs) दिसतो

अनेक कॅमेऱ्यांमध्ये काढलेल्या फोटोमध्येदेखील आपल्या डोळ्यातील काही भाग लाल रंगाचा (Red Eye In Photographs) दिसतो

  मुंबई, 03 मे:  स्मार्टफोन हल्लीच्या काळात जितका गरजेचा तितकंच त्याचं व्यसनही लागत चाललंय. स्मार्टफोनमधील अनेक अ‍ॅप्लिकेशनच्या (Smartphone Applications) माध्यमातून आपण लोकांची जोडलेले राहतो. तसंच गाणी ऐकणं, सिनेमा पाहणं, अभ्यास आणि मुख्यत्वे फोटो काढणं अशा अनेक गोष्टी आपण या स्मार्टफोनद्वारे करत असतो. हल्ली फोटो, सेल्फी काढण्यासाठी स्मार्टफोन हे सर्वांत सोपं साधन झालं आहे. परंतु, अनेकदा या स्मार्टफोनमध्ये काही कमतरतांमुळे फोटोज चांगले येत नाहीत किंवा फोटोंमध्ये आपल्या बुबुळांचा रंग लाल दिसतो. ही समस्या केवळ स्मार्टफोनच्या फोटोंमध्येच आढळते असे नाही. तर अनेक कॅमेऱ्यांमध्ये काढलेल्या फोटोमध्येदेखील आपल्या डोळ्यातील काही भाग लाल रंगाचा (Red Eye In Photographs) दिसतो. थोडक्यात फोटोंमध्ये आपले डोळे लाल दिसतात. आज आम्ही तुम्हाला फोटोमध्ये डोळे लाल का दिसतात याचं कारण सांगणार आहोत. याबद्दलच सविस्तर वृत्त TV 9 हिंदीने प्रकाशित केलं आहे.

  फोटोंमध्ये डोळे लाल दिसण्याचं मुख्य कारण म्हणजे रात्री फ्लॅशलाईटमध्ये (Flash Light) फोटो काढणं. डोळ्यांच्या बुबुळावर पडणाऱ्या प्रकाशामुळे असं होतं. डोळ्यांच्या रेटिनावर जितका प्रखर प्रकाश पडतो डोळे तितके जास्त लाल दिसण्याची शक्यता असते. सायन्स एबीसीच्या रिपोर्टनुसार, रात्रीच्या वेळी पडणाऱ्या प्रखर फ्लॅश लाईटचा डोळ्यांवर परिणाम दिसत असतो. रेटिना जेव्हा डोळ्यांवर येणाऱ्या प्रखर फ्लॅशलाईटला रिफ्लेक्ट म्हणजेच परावर्तित करतो. तेव्हा त्या भागात असलेल्या रक्तवाहिन्यांमुळे डोळ्यांमधील तेवढा भाग लाल रंगाचा दिसतो आणि हेच रिफ्लेक्शन कॅमेऱ्यामध्येदेखील टिपलं जातं.

  भविष्यात पेट्रोल-डिझेल ऐवजी वापरलं जाणारं ग्रीन हायड्रोजन म्हणजे काय?

  मात्र कॅमेऱ्यामध्ये दिसणारा डोळ्यांमधील लाल रंग प्रत्येकवेळी सारखाच असतो असेही नाही. काही फोटोंमध्ये ह्या रंग गडद दिसतो. तर काही फोटोंमध्ये तो फिकट लाल दिसतो. याचंदेखील कारण वैज्ञानिकांनी आपल्या रिपोर्टमध्ये सांगितले आहे. रिपोर्टनुसार, डोळ्यांमध्ये दिसणाऱ्या या लाल रंगाची तीव्रता रेटिनाच्या लेअरमध्ये (Eye Retina) असणाऱ्या मेलॅनिनच्या (Melanine) प्रमाणावर अवलंबून असते. गोऱ्या रंगाच्या लोकांमध्ये हा डोळ्यातील लाल रंग गडद दिसतो. तर सावळ्या रंगाच्या लोकांमध्ये हाच डोळ्यांमधील लाला रंग फिकट लाल असा दिसतो.

  एका सर्वेक्षणाने कसं बदललं प्रशांत किशोर यांचं आयुष्य? नवी इंनिंगचं काय होणार?

  कॅमेऱ्यामध्ये डोळे लाल रंगाचे दिसल्यामुळे आपले अनेक फोटो खराब होता. अनेकदा आपल्या आयुष्यातील खूप महत्वाच्या क्षणाचे फोटोजही यामुळे आपल्याला पाहावेसे वाटत नाहीत. मात्र ऑल अबाउट व्हिजन (All About Vision) या वेबसाईटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, फोटो काढताना कॅमेऱ्यापासून थोडे दूर उभे राहिल्याने किंवा थेट कॅमेऱ्याकडे न पाहिल्यास ही समस्या कमी होऊ शकते. फोटोंमध्ये डोळे लाल दिसू नयेत यासाठी एक्सटर्नल फ्लॅशचा वापर करणं तसंच ज्या जागी फोटो काढायचे आहेत त्या ठिकाणी जास्त लाईटचा उपयोग करणं यामुळे फोटोमध्ये डोळे लाल दिसण्याचं प्रमाण कमी होऊ शकते.

  First published:

  Tags: Smartphone