मराठी बातम्या /बातम्या /explainer /

भारतातील कोरोनाव्हायरसची वाढती प्रकरणं इतक्या झपाट्यानं कमी कशी झाली?

भारतातील कोरोनाव्हायरसची वाढती प्रकरणं इतक्या झपाट्यानं कमी कशी झाली?

पुण्यात 899 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात 504 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.

पुण्यात 899 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात 504 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.

भारतात भरभर वाढणारा कोरोना रुग्णांचा आलेख सध्या लक्षणीयरित्या घसरला आहे.

नवी दिल्ली, 0७ फेब्रुवारी : कोरोना महासाथीमुळे (coronavirus) 1.3 अब्ज लोकसंख्या असलेल्या भारताला (coronavirus in india) मोठा फटका बसला आहे. कोरोनाचा (covid 19) सर्वात जास्त प्रसार झालेल्या देशामध्ये भारत जगात दुसरा क्रमांकाचा देश आहे. भारतात 10.8 दशलक्षांहून अधिक नागरिकांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र आठवडाभरामध्ये भारतात कोरोनाची नवीन प्रकरणं आणि मृत्यूच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात घट झाल्याचंही समोर आलं आहे. या आठवड्यामध्ये दिवसाला कोरोनाची नवीन प्रकरणं सापडण्याचं प्रमाण गेल्या आठ महिन्यांपेक्षा कमी होतं. तसंच मृत्यूचं प्रमाणही खाली आल्याचं समोर आलं आहे. मे महिन्यांनंतर हा सर्वात कमी प्रकरणं सापडल्याचा दिवस आहे. एएफपी या वृत्तसंस्थेने दक्षिण आशियातल्या भारत या सर्वात मोठ्या देशाने कोरोना महासाथीला कसा लढा दिला यावर एक अभ्यास केला आहे. अधिकृत आकडेवारी काय आहे? भारतामध्ये 30 जानेवारी 2020 ला कोरोनाची लागण झालेला पहिला रुग्ण सापडला. तर मार्चमध्ये उपचारादरम्यान पहिल्या रुग्णाचा मृत्यू झाला. भारतामध्ये कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत होता. सप्टेंबरमध्ये दिवसाला 97 हजारांपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण सापडले होते तर त्या महिन्यात दिवसाला 1 हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे. त्यानंतर भारतात हळूहळू कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाण कमी झालं. मंगळवारी नव्यानं कोरोनाची लागण झालेल्या 8,635 रुग्णांपैकी 94 जणांचा मृत्यू झाला आहे. जगामध्ये कोरोनाचा सर्वात जास्त प्रसार झालेल्या 20 देशांपैकी भारतामध्ये मृत्यूचे प्रमाण सर्वात कमी आहे. किती लोकांना खरोखर संसर्ग झाला आहे? तज्ज्ञांच्या मते, भारतात कोरोनाची लागण झालेल्या लोकांची संख्या ही अधिकृत आकडेवारीपेक्षा खूपच जास्त आहे. शहरी आणि ग्रामीण भागांसोबत आरोग्य कर्मचाऱ्यांनी डिसेंबर-जानेवारीमध्ये केलेल्या अधिकृत राष्ट्रीय सर्वेक्षणातून असं समोर आले की, काही 21.5 टक्के म्हणजे जवळपास 280 दशलक्ष लोकांत अँटीबॉडी (antibodies) तयार झाल्या आहेत. राजधानी दिल्ली हे भारतातील कोरोनाचा सर्वात जास्त प्रसार झालेल्या शहरांपैकी एक आहे. या आठवड्यात जाहीर करण्यात आलेल्या सेरो सर्वेक्षणानुसार कोरोनाच्या तपासणीसाठी नमुने घेतलेल्या 28 हजारपैकी निम्म्यापेक्षा अधिक लोकांमध्ये अँटीबॉडी विकसित झाली आहे. कोरोनाला कसं हाताळलं? भारतातील दाट लोकवस्ती असलेल्या शहरामध्ये ज्या ठिकाणी सर्वात जास्त अस्वच्छता आहे तिथे कोरोनाचा प्रसार जास्त होईल, असा इशारा तज्ज्ञांनी दिला होता.  'कोरोनाचा सामना करण्यासाठी आरोग्यसेवा सक्षम नाही.', अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली होती.  कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी सरकारने आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद केल्या आणि मार्चमध्ये लॉकडाऊनची घोषणा केली. तसंच देशातील जनतेला मास्कचा वापर करणं बंधनकारक केलं. महासाथीमुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला होता. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी जूननंतर सरकारने लॉकडाऊनचे नियम हळूहळू शिथिल केले. हे वाचा  - कोरोनानंतर आता आणखी दोन महाभयंकर संकटं; बिल गेट्स यांचा जगाला सावध करणारा VIDEO कोरोनाच्या काळात देखील जनता एकदम रिलॅक्स आहे. जानेवारीत झालेल्या कुंभमेळ्यात शेकडो हजारोच्या संख्येने सहभागी झाली यामध्ये सहभागी झालेल्या अनेकांनी मास्क लावला नव्हता. नवी कृषी कायद्याविरोधात नोव्हेंबरपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले आहेत. गुजरात, उत्तर प्रदेश आणि आंधप्रदेशसह देशातील 330 दशलक्षाहून अधिक लोकसंख्या असलेली प्रमुख शहरं मुंबई आणि दिल्लीतील डॉक्टरांनी एएफपीला सांगितले की, त्यांच्या रुग्णालयात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे.  दिल्ली सरकारनं सांगितलं की, कोविड-19 रुग्णांसाठी राखीव ठेवलेले 90 टक्के बेड रिकामे होते. 'सुरुवातीला कोरोना रुग्णांची मोठी प्रतीक्षा यादी असायची पण आता याठिकाणी फक्त 40 ते 50 टक्के रुग्ण आहेत.', अशी माहिती मॅक्स रुग्णालयाचे डॉक्टर देवेन जुनेजा यांनी एएफपीला जूनमध्ये दिली होती. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधील किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटीचे प्रवक्ते सुधीर सिंग यांनी सांगितलं की, 'आता आम्ही हळूहळू आपल्या सेवेत रुजू झालो आहोत. कोरोनामुळे सगळ्या व्यवस्था कोलमडून पडल्या होत्या. आता सगळं सुरळीत होत आहे. हर्ड इन्युनिटी (Herd immunity) भारतातील कोरोना बाधितांची संख्या एकदम इतकी कमी कशी झाली याबद्दल अधिकृत माहिती घेतल्याशिवाय बोलणं योग्य नाही, असं तज्ज्ञांचं मत आहे. भारतात मोठ्या संख्येने लोकांना कोरोना विषाणूची बाधा झाली असावी आणि त्यामुळेच हर्ड इम्युनिटी तयार होऊन ही संख्या कमी झाली असू शकते असा माझा अंदाज आहे. पण प्रत्यक्ष आकडेवारीशिवाय ही हर्ड इम्युनिटी आहे असे मी म्हणून शकणार नाही, असं मत विषाणू तज्ज्ञ शाहिद जमील यांनी एएफपीकडे मांडलं. हे वाचा  -  पुणेकरांना मोठा दिलासा! 11 महिन्यांनी मिळाली कोरोनाबाबत पॉझिटिव्ह न्यूज जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रादेशिक संचालिका पूनम खेत्रपाल सिंग यांनी देशामध्ये भारतातील कोरोना प्रतिबंधक उपाय लागू करण्याच्या पद्धतीचं कौतुक केलं आहे. त्यांनी सांगितलं की, भारत खूप विशाल देश आहे. त्यामुळे रुग्णांची संख्या कमी होण्यासाठी हर्ड इम्युनिटी जबाबदार आहे असं म्हणता येणार नाही. दरम्यान, भारताने जुलै 2021 पर्यंत 30 कोटी नागरिकांचं कोरोना लसीकरण करण्याचं ध्येय समोर ठेवलं आहे. ही साथ पुन्हा येण्याचा धोका किती? द लँसेट मासिकामध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार ब्राझीलमधील मॅनॉस शहरामध्ये नागरिकांच्या शरीरात मोठ्या प्रमाणात अँटीबॉडीज तयार झालेल्या असताना ही कोविड-19 विषाणूचा संसर्ग पुन्हा उफाळून आला होता. त्यामुळे सिंग म्हणाल्या, 'भारताने प्रतिबंधात्मक उपाय अजून चालू ठेवले पाहिजे. कोविड-19 ची साथ पुन्हा येण्याची शक्यता अद्याप नाकारता येणार नाही.'
First published:

Tags: Corona virus in india, Coronavirus

पुढील बातम्या