Home /News /explainer /

यूपीतील IAS, IPS अधिकाऱ्यांना नोकरीनंतर राजकारणातील दुसरी इनिंग का जास्त भावतेय?

यूपीतील IAS, IPS अधिकाऱ्यांना नोकरीनंतर राजकारणातील दुसरी इनिंग का जास्त भावतेय?

उत्तर प्रदेशातील निवडणुकीची घोषणा होताच, दोन उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याची घोषणा केली, एक म्हणजे आयपीएस आणि कानपूरचे पोलिस आयुक्त असीम अरुण आणि दुसरे म्हणजे आयएएस राम बहादूर. यूपीच्या राजकारणात उच्चपदस्थ नोकरशहांचा राजकारणात प्रवेश ही काही नवीन गोष्ट नाही. यापूर्वीही असे प्रकार घडले आहेत. अखेर नोकरीनंतर राजकारण हा उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा दुसरा पर्याय का ठरत आहे?

पुढे वाचा ...
    लखनौ, 17 जानेवारी : सरकारी अधिकाऱ्याचा नोकरीनंतर राजकारणात प्रवेश काही नवीन नाही. अगदी साध्या शिपायापासून आयएएस (IAS), आयपीएस (IPS) अधिकारी ते सरन्यायाधीशांपर्यंत अनेकांनी आतापर्यंत राजकीय क्षेत्रात आपली दुसरी टर्म सुरू केली आहे. मात्र, उत्तर प्रदेशमध्ये अलिकडे वेगळाच पॅटर्न दिसू लागला आहे. पोलिस आयुक्त असीम अरुण आणि माजी आयएएस अधिकारी राम बहादूर यांनी ज्या प्रकारे यूपीमध्ये औपचारिकपणे भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे राज्यात एक नवीन ट्रेंड उदयास येत असल्याचे दिसत आहे. राज्यातील सर्वोच्च आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांसाठी, निवृत्तीनंतर किंवा स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर दुसरे करिअर म्हणून राजकारण हा मोठा पर्याय ठरत आहे. राम बहादूर आणि असीम अरुण यांनी नुकतेच त्यांच्या उच्चपदस्त नोकऱ्या सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. नोकरीपेक्षा राजकारणात येण्याला त्यांनी प्राधान्य दिले आहे. तसं IAS आणि IPS अधिकारी राजकारणात येणे ही देशात नवीन गोष्ट नाही. हे अनेक दशकांपासून दिसून येत आहे, परंतु, अलिकडच्या वर्षांत ते वाढले आहे, त्यातही हा ट्रेंड यूपीमध्ये थोडा जास्त दिसत आहे. यापूर्वी माजी आयएएस अधिकारी अरविंद कुमार शर्मा आणि उत्तर प्रदेश पोलिसांचे माजी डीजीपी ब्रिजलाल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. असीम अरुण निवडणूक लढवणार का? जातीने जाटव असणारे असीम अरुण यांनी 8 जानेवारी रोजी नोकरीतून VRS घेतली, ज्या दिवशी भारताच्या निवडणूक आयोगाने यूपीमध्ये निवडणुका जाहीर केल्या. तेव्हापासून त्यांना कनौज या त्यांच्या मूळ गावी भाजपचे तिकीट मिळू शकते, अशी चर्चा होत होती. त्यांच्या कार्यकाळात असीम अरुण हे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आवडते अधिकारी मानले जात होते. ज्यांची योगींनी कानपूरचे पहिले पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती केली होती. अरुण हे तडफदार पोलीस अधिकारी म्हणून प्रसिद्ध अरुण हे 1994 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत, ते दहशतवादविरोधी पथकाचे माजी प्रमुखही राहिले आहेत. त्यांनी नवी दिल्लीच्या स्टीफन्स कॉलेजमधून शिक्षण घेतले आहे. ते त्याच दलित पोटजातीशी संबंधित आहेत, जिथून बसपा सुप्रीमो मायावती येतात. निवडणुकीच्या घोषणेनंतर त्यांनी व्हीआरएस घेण्याचा निर्णय घेताच, भाजप आता त्यांना कन्नौजमधून उमेदवारी देईल अशी चर्चा सुरू झाली आहे. सत्ता येताच मोफत वीज-पाणी-शिक्षण, बेरोजगारांना 3000 रुपये, केजरीवालांची घोषणा वडीलही राज्यातील सर्वोच्च पोलीस अधिकारी असीम अरुण यांचे वडील श्रीराम अरुण 1997 मध्ये उत्तर प्रदेशचे डीजीपी होते, जेव्हा कल्याण सिंह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. श्रीराम अरुण यांचे ऑगस्ट 2018 मध्ये निधन झाले. त्यांच्या सल्ल्यानुसार उत्तर प्रदेशमध्ये यूपी स्पेशल टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली होती. राम बहादूर हे एकेकाळी मायावतींचे खास होते राम बहादूर हे माजी आयएएस आहेत. ते बसपा सुप्रीमो मायावती यांच्या जवळचे मानले जात होते. लखनौ प्राधिकरणाचे उपाध्यक्ष असताना त्यांनी बेकायदेशीर अतिक्रमणे हटवण्यासह काही कठोर निर्णय घेतले होते. कांशीराम यांनी स्थापन केलेल्या अखिल भारतीय मागास आणि अल्पसंख्याक समुदाय कर्मचारी महासंघाचे ते सदस्यही आहेत. राम बहादूर यांनी मोहनलाल गंज येथून 2017 मध्ये बसपचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना विजय मिळवता आला नाही. माजी डीजीपी ब्रिजलाल यांच्या प्रेरणेने राजकारणात 2017 मध्ये भाजप सत्तेत आल्यानंतर अरुण यांच्याप्रमाणेच माजी आयपीएस ब्रिजलाल यांनीही या पक्षात प्रवेश केला होता. ब्रिजलाल यांचा राजकारणात प्रवेश झाल्यानंतरच अरुण यांनी राजकारणात जाण्याचा निर्णय घेतला असावा, असे मानले जाते. ब्रिजलाल सध्या राज्यसभा सदस्य आहेत. पासी दलित समाजाचे असलेले ब्रिजलाल 2010-12 मध्ये यूपी पोलिसांचे डीजीपी होते. तेव्हा राज्याच्या मुख्यमंत्री मायावती होत्या. त्यांची प्रतिमा कठोर पोलीस अधिकाऱ्यासह एन्काउंटर स्पेशालिस्ट अशी आहे. बक्षीस म्हणून राज्यसभेचे तिकीट असे सांगितले जाते, की यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यूपीमध्ये गुन्हेगार आणि माफियांविरोधात मोठी मोहीम सुरू केली तेव्हा ते ब्रिजलाल यांच्या सतत संपर्कात होते. मात्र, विरोधी पक्षांनीही योगींच्या या धडाकेबाज धोरणाला विरोध केला. यानंतर ब्रिजलाल यांना राज्य एसटी एससी आयोगाचे अध्यक्ष बनवण्यात आले, त्यानंतर त्यांना 2020 मध्ये राज्यसभेचे तिकीट मिळाले. पंतप्रधानांच्या सुरक्षेत चूक: चौकशी करू नका; इंदू मल्होत्रांना थेट धमकी IAS अरविंद शर्मा यांचा VRS घेऊन राजकारणात प्रवेश गुजरात केडरचे आयएएस अधिकारी अरविंद शर्मा यांचेही असेच प्रकरण आहे. ते 1988 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. जे गेल्या वर्षी व्हीआरएस घेऊन भाजपमध्ये दाखल झाले होते. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय मानले जातात. गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी मोदींसोबत काम केले. त्यानंतर त्यांनी पीएमओमध्ये काम केले. शर्मा हे मऊ येथील रहिवासी आहेत. त्यानंतर शर्मा यांना उत्तर प्रदेश विधान परिषदेचे सदस्य करण्यात आले. नंतर त्यांना यूपी भाजपचे उपाध्यक्ष बनवण्यात आले. ते पंतप्रधानांच्या बनारस संसदीय जागेवर सक्रिय आहेत. सत्यपाल बागपतमधून विजयी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह यांना बागपतमधून तिकीट दिले होते. त्यांनी तत्कालीन लोकदल प्रमुख अजित सिंह यांचा किमान दोन लाख मतांनी पराभव केला. त्यानंतर त्यांना कनिष्ठ मंत्रीही करण्यात आले. त्यानंतर 2019 मध्येही त्यांनी याच जागेवरून लोकसभा निवडणूक जिंकली होती. यावेळी त्यांनी अजित सिंह यांचा मुलगा जयंत सिंह यांचा पराभव केला. ओबीसी आरक्षणाची प्रतीक्षा वाढली; सुप्रीम कोर्टातील सुनावणी लांबणीवर काय असेल कारण? उच्चपदस्थ अधिकारी नोकरी सोडून व्हीआरएस घेऊन राजकारणात उतरण्यामागचं कारण काय असेल? असा प्रश्न नेहमीच उपस्थित होतो. कदाचित नोकरीच्या काळात या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी जवळीक वाढली की, राजकारण अधिक ताकदीचे क्षेत्र असल्याचे त्यांना दिसत असावे. त्यांनाही नोकरीपेक्षा राजकारणातील सेकंड इनिंग महत्त्वाची वाटते. राज्याच्या राजकारणात पॅराट्रूप म्हणून जे आयएएस किंवा आयपीएस अधिकारी दाखल झाले, त्यांनाही राजकारणात स्थान आणि महत्त्व प्राप्त झाले, हेही कदाचित याचे कारण असावे.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: BJP, Election, Uttar pardesh

    पुढील बातम्या