Home /News /explainer /

Tax on condom | इम्रान खान यांनी कंडोमवर कर का लावला? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Tax on condom | इम्रान खान यांनी कंडोमवर कर का लावला? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

बिलावल भुट्टो झरदारी (Bilawal Bhutto Zardari) म्हणाले, 'गर्भनिरोधकांवरही (Condom) कर लावण्यात आला आहे. इम्रान खानसारख्या (Imran Khan) खेळाडूकडून गर्भनिरोधकांवर कर लावणे अपेक्षित नव्हते. ते म्हणाले की, पाकिस्तान (Pakistan), बांगलादेश, भारतात लोकसंख्येचा स्फोट होत आहे, त्यांच्या खाण्यापिण्याची, शिक्षणाची, रोजगाराची व्यवस्था आपण करू शकत नाही. गर्भनिरोधकाचा (higher taxes on condoms) जगभर प्रचार केला जात आहे आणि पाकिस्तान त्यावर कर लावत आहे.

पुढे वाचा ...
    इस्लामाबाद, 13 जानेवारी : पाकिस्तानातील (Pakistan) प्रमुख विरोधी पक्ष पीपीपीचे Pakistan Peoples Party) नेते बिलावल भुट्टो झरदारी (Bilawal Bhutto Zardari) यांनी बुधवारी मिनी बजेटच्या वेळी संसदेत इम्रान खान सरकारवर जोरदार हल्ला चढवला. बिलावल म्हणाले की, इम्रान खान सरकार 'टॅक्सची सुनामी' आणणार आहे. त्यांनी 'प्लेबॉय' प्रतिमा असलेले पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर वैयक्तिक हल्ला करत म्हटले की पीटीआय सरकारने कंडोमवरही कर (higher taxes on condoms) लावला, ज्याची 'खेळाडू'कडून अपेक्षा नव्हती. बुधवारी नॅशनल असेंब्लीमध्ये फायनान्स बिल 2021 अंतर्गत, इम्रान खान सरकारने 144 वस्तूंवर 17 टक्के दराने जीएसटी लागू केला. यामध्ये गर्भनिरोधक गोळ्या आणि कंडोमचाही समावेश आहे. यानंतर विरोधकांनी गदारोळ केला. या गोंधळात पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी यांनी इम्रान खान यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले इम्रान खान ही पाकिस्तानसाठी शतकातील सर्वात मोठी शोकांतिका आहे. मसाज पार्लरमध्ये जाऊन भलतंच काम करायचा महिलेचा पती; या गोष्टीमुळे झाला खुलासा बिलावल भुट्टो म्हणाले, 'गर्भनिरोधकांवर (कंडोम) कर लावण्यात आला आहे. आता इम्रान यांच्यासारख्या खेळाडूकडून अशी अपेक्षा नव्हती की ते गर्भनिरोधकांवर कर लावतील. जगभरात गर्भनिरोधकांचा प्रचार केला जात आहे आणि पाकिस्तान त्यावर कर लावत आहे. ते म्हणाले की, पाकिस्तान, बांगलादेश, भारतात जो लोकसंख्येचा स्फोट होत आहे, त्यांच्या अन्नाची, शिक्षणाची, रोजगाराची व्यवस्था आपण करू शकत नाही. जगभरात गर्भनिरोधकांचा प्रचार केला जात आहे आणि पाकिस्तान त्यावर कर लावत आहे. देशात एचआयव्ही आणि एड्सचे संकट उभे राहिले आहे, ज्याची माहिती आपल्या प्रसारमाध्यमांमध्ये आणि देशात दिसत नाही. पाकिस्तानातील एका शहरात याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. अनोळखी व्यक्तीसोबत डेटवर गेली अन् लागलं लॉकडाऊन; तरुणीसोबत पुढे घडलं अनपेक्षित वैयक्तिक आयुष्यात इम्रान खान पंतप्रधान होण्यापूर्वी त्यांच्या 'प्लेबॉय' इमेजसाठी प्रसिद्ध होते. इम्रान यांनी अधिकृतपणे 3 लग्ने केली आहेत. मात्र, त्यांचे अनेक महिलांसोबत संबंध असल्याचेही समोर आले आहे. यापूर्वी इम्रान खान यांनी दिलेल्या बलात्काराच्या वक्तव्यावर पाकिस्तानी वंशाचे लेखक तारिक फताह म्हणाले होते, 'पाकिस्तानच्या पंतप्रधानांना भेटा. जगभरातील महिलांसोबत अगणित लैंगिक कृत्ये करणारा इम्रान खान सध्या तिसऱ्या पत्नीसोबत आहे. आपल्या देशातील महिलांना बलात्कारापासून वाचवण्यासाठी तो बुरख्याचा प्रचार करत आहे'.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Imran khan, Pakistan

    पुढील बातम्या