Home /News /explainer /

Landslide : भूस्खलनाच्या घटना का वाढतायेत? शास्त्रज्ञ म्हणतात..

Landslide : भूस्खलनाच्या घटना का वाढतायेत? शास्त्रज्ञ म्हणतात..

हरियाणातील भिवानीमध्ये नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी मोठी दुर्घटना घडली. येथे हरियाणाच्या भिवानी येथे दरड कोसळल्याने (landslide in Haryana's Bhiwani) अर्धा डझन वाहनांसह सुमारे पाच ते दहा लोक जमिनीत गाडले जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, हरियाणा पोलिसांनी सांगितले की, या अपघातात दोन जण जखमी झाले असून अनेकजण बेपत्ता आहेत. या घटनेमुळे भूस्खलनाचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 1 जानेवारी : हरियाणातील भिवानीमध्ये नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी मोठी वाईट घटना घडली. हरियाणातील भिवानी येथे दरड कोसळल्याने अर्धा डझन वाहनांसह सुमारे पाच ते दहा जण जमिनीत गाडले गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे भूस्खलनाचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. मागील वर्षात हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, महाराष्ट्रासह काही राज्यात भूस्खलनामुळे अनेक लोकांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. अलीकडेच, संयुक्त राष्ट्रांच्या एका पॅनेलचा अहवालही आला, ज्यामध्ये पृथ्वीवर अनपेक्षित हवामान घटनांमध्ये वाढ होण्याचा इशारा देण्यात आला आहे. वातावरणातील बदलामुळे काही ठिकाणी उष्णता वाढेल तर ढगफुटीसारख्या घटना घडतील. पण, दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये अचानक वाढ होण्याचे कारण काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. भूस्खलन म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचे तर, भूस्खलन ही उतारावर जमीन वेगाने सरकण्याची स्थिती आहे, ज्यामध्ये खडक, ढिगारा आणि माती पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाखाली एकत्र घसरतात. भौतिकशास्त्रातील त्याचे स्पष्टीकरण थोडे क्लिष्ट आहे. यानुसार, पर्वत आणि डोंगर उतारांवर खडक आणि पृष्ठभाग (माती इ.) एकमेकांसोबत घट्ट चिकटलेले असतात. जेव्हा काही बाह्य दाबामुळे यांच्यातील हा घट्टपणा कमी होतो, तेव्हा दरडी कोसळण्याच्या घटना घडतात. इंडिया टुडेने आयआयटी रुरकी येथील भूविज्ञान विभागाच्या प्राध्यापिका शारदा प्रसाद प्रधान यांच्या हवाल्याने सांगितले की, 'पृष्ठभागावरील सामग्री टक्कर आणि संयोगामुळे उतारावर एकत्र असते, त्याच्यातील हा दबाव कमी झाला स्खलन किंवा भूकंपा सारख्या घटना घडतात. उतारवरील पृष्ठभागावर ब्रेकिंग फोर्समुळे घसरण्याची स्थिती तयार होते. त्यामुळे अशा ठिकाणी कोणतेही कार्य करण्याअगोदर या पृष्ठभागाची स्थिती विचारात घेणे महत्वाचे आहे. भूस्खलन का होतात? यूएस जिओलॉजिकल सर्व्हेनुसार, जेव्हा गुरुत्वाकर्षण शक्ती पृथ्वीवरील पदार्थांवर प्रभाव टाकते तेव्हा भूस्खलन होते. अशी परिस्थिती पाऊस, बर्फ, पाण्याच्या पातळीत बदल, प्रवाहाची धूप, भूजलातील बदल, भूकंप, ज्वालामुखी आणि मानवी हस्तक्षेपामुळे होणारा त्रास अशा अनेक कारणांमुळे उद्भवू शकतो. उत्तर प्रदेशातील कन्नौज परफ्यूमसाठी का आहे प्रसिद्ध? काय आहे अत्तराचा इतिहास? भूस्खलनासाठी हवामानातील बदल किती जबाबदार? भूस्खलनात हवामान बदलाची मोठी भूमिका आहे, कारण ती हवामानाच्या बदलांशी जोडलेली असते. त्यामुळे जगभरात अप्रत्याशित हवामानाच्या घटना पाहायला मिळत आहेत. कुठे अतिवृष्टी, पुराचे संकट तर कुठे अतिउष्णतेमुळे जंगलांना आग लागण्याच्या घटना वाढत आहेत. भारतातही मान्सूनमध्ये बदल दिसून येत असून त्याचा कालावधीही वाढलेला दिसतो. डोंगराळ भागात ढगफुटीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे खडक आणि माती यांच्यातील पकडही सैल होत आहे. प्रोफेसर शारदा म्हणतात की 'भारतीय भूभागाचा 17 टक्के भाग भूस्खलनाने प्रभावित होतो आणि बहुतेक वेळा तो मानवी हस्तक्षेपांमुळे तसेच पावसामुळे होतो. उतारामध्ये साचलेलं पाणी बाहेर न आल्यास अधिक दाब निर्माण होऊन दरड कोसळण्याची शक्यता जास्त असते. त्यांच्या म्हणण्यानुसार उतारावर पाणी साचणार नाही म्हणून ड्रेनेजचे उपाय शोधले पाहिजेत. एकेकाळी पृथ्वीसारख्या असणाऱ्या शुक्रावर आज जीवसृष्टी का नाही? हिमालयीन प्रदेशात भूस्खलनाचा धोका का वाढला आहे? हिमालयीन प्रदेश त्याच्या वेगळ्या खडकाळ वैशिष्ट्यांमुळे मोठ्या भूस्खलनाला बळी पडतात. हे खडक भेगांनी भरलेले आहेत. कोणतीही बाह्य क्रिया त्याच्या पृष्ठभागाची एकसंधता आणि टक्कर परिस्थिती लक्षणीयरीत्या कमी करते, ज्यामुळे भूस्खलनासाठी अधिक अनुकूल परिस्थिती निर्माण होते. प्राध्यापिका शारदा यांच्या म्हणण्यानुसार, विवरांमध्ये पाणी शिरल्याने, उतारावरील दाब वाढतो आणि वरच्या पृष्ठभागावरून पाणी वाहत असल्याने हिमालयीन प्रदेशात दरड कोसळण्याच्या घटना घडतात. याशिवाय डोंगराळ भागातून होणारी जंगलतोड, काँक्रीटचे जंगल उभारण्यासाठी झाडेझुडपे नष्ट करणे हेही या समस्येचे प्रमुख कारण आहे. वनस्पतींची मुळे खडक आणि माती एकत्र धरून ठेवतात. परंतु, त्यांच्या कत्तलीमुळे पाणी जमीनीत मुरते आणि त्यांचे मजबूत पडक सैल होते.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Haryana, Science

    पुढील बातम्या