Home /News /explainer /

Explainer: जगभरात कोरोना संसर्गाचं प्रमाण पुन्हा का वाढतंय? कशी आहे परिस्थिती, कुठे धोका अधिक?

Explainer: जगभरात कोरोना संसर्गाचं प्रमाण पुन्हा का वाढतंय? कशी आहे परिस्थिती, कुठे धोका अधिक?

कोरोनाचा (Corona variant AY.4.2) नवा व्हेरिअंट वेगाने संसर्ग पसरवत असल्याचं समोर आलं आहे. महाराष्ट्रासह देशभर कोरोना रुग्ण वाढत आहेत. कुठे आहे सर्वाधिक धोका, पाहा एका क्लिकवर सद्यस्थिती

नवी दिल्ली, 29 ऑक्टोबर: सध्या देशातली कोरोनाची लाट (Corona Wave) ओसरत असल्याचं चित्र आहे; मात्र सणासुदीच्या दिवसांच्या (Festivities during corona) पार्श्वभूमीवर कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा किंचित वाढ होऊ लागल्याचं चित्र आहे. ही वाढ होऊ लागल्याची दखल घेऊन केंद्र सरकारने कोरोनाविषयक देशव्यापी निर्बंधांची मुदत 30 नोव्हेंबरपर्यंत वाढवत असल्याचा निर्णय गुरुवारी (28 ऑक्टोबर) जाहीर केला. केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला (Ajay Bhalla) यांनी सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना याबाबतचं पत्र पाठवलं आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सध्या लागू असलेले प्रोटोकॉल्स (Covid Protocols) 30 नोव्हेंबरपर्यंत पाळले जावेत, असे आदेश त्यांनी दिले आहेत. सणासुदीच्या काळात कोविड-अॅप्रोप्रिएट बिहेवियर (Covid Appropriate Behaviour) कडकपणे पाळलं न जाण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर, सण-समारंभ कोविडच्या अनुषंगाने योग्य ती काळजी घेऊन पार पाडले जाण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी करणं आवश्यक आहे, असं ते गेल्या महिन्यात म्हणाले होते. 'फ्लू' आणि 'सुपर कोल्ड' कोरोनापेक्षा जास्त धोकादायक असू शकतो; वाचा सविस्तर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या (Centarl Health Ministry) माहितीनुसार, शुक्रवारी (29 ऑक्टोबर) देशात 14,348 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. गुरुवारी 16,156 नव्या रुग्णांची नोंद झाली होती. ही संख्या बुधवारी नोंदवल्या गेलेल्या रुग्णांच्या संख्येपेक्षा 20 टक्के जास्त होती. बुधवारी 13,450 नव्या रुग्णांची आणि 585 मृत्यूंची नोंद झाली होती. देशातल्या आतापर्यंतच्या कोरोनाबाधितांची (Corona Cases) संख्या आता तीन कोटी 42 लाख 46 हजार 157 एवढी झाली आहे. गेल्या सात दिवसांत नोंदवल्या गेलेल्या नव्या बाधितांची संख्या त्याआधीच्या सात दिवसांतल्या नव्या रुग्णांपेक्षा दोन टक्क्यांनी कमी आहे. याच दोन आठवड्यांत जागतिक पातळीवर चार टक्के रुग्णवाढ नोंदवली गेली आहे. लसीकरण झालेलेही पसरवतात Corona Infection, नव्या संशोधनात धक्कादायक निष्कर्ष दरम्यान, कोरोना विषाणूच्या AY4.2 या नव्या व्हॅरिएंटमुळे (New Variant) ब्रिटनमध्ये रुग्णसंख्या वाढीला लागली आहे. तो व्हॅरिएंट भारतात फार मोठ्या प्रमाणात आढळला नसल्याचं सार्स सीओव्ही टू जीनोम कन्सॉर्शियमच्या साप्ताहिक अहवालात म्हटलं आहे. हे कन्सॉर्शियम नव्या व्हॅरिएंटच्या प्रसारावर लक्ष ठेवून असतं. कोरोना रुग्णवाढ नोंदवली जात असलेले जिल्हे/राज्यं यांच्याबद्दलची माहिती घेऊ या. फरिदाबाद : गेल्या काही दिवसांत हरियाणा राज्यातल्या अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत फरिदाबाद जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत काहीशी वाढ दिसून येत आहे. उलट, हरियाणातल्या 22पैकी बहुतांश जिल्ह्यांत गेल्या अनेक दिवसांत नव्या कोरोनाबाधिताची नोंदच झालेली नाही. दिल्लीच्या जवळ असलेल्या फरिदाबादमध्ये 24 ऑक्टोबर रोजी 10 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. गेल्या काही दिवसांत या आकड्यात काहीशी वाढ होताना दिसत आहे. नागरिकांनी बाजारपेठेत सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं आणि तोंडावर मास्क लावावा, असं आवाहन केलं जात असून, उपायुक्त जितेंद्र यादव यांनी अधिकाऱ्यांना आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. Alert! इथं पुन्हा कोरोना विस्फोट; आठवडाभरात 3 शहरांत लॉकडाऊन, लाखो लोक बंदिस्त गुरुग्राम : गुरुग्राम शहरातही कोरोनाच्या रुग्णसंख्येत किंचितशी वाढ होत असल्याचं आढळल्याने जोखीम असलेल्या नागरिकांनी घरीच राहावं अशा मार्गदर्शक सूचना आरोग्य विभागाने प्रसिद्ध केल्या आहेत. बाजारपेठेत, तसंच गर्दीच्या ठिकाणी नागरिक मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत आहेत की नाहीत, यावर लक्ष ठेवण्याच्या सूचना जिल्ह्याच्या प्रशासकीय यंत्रणेला देण्यात आल्या आहेत. बडोदा : चार सप्टेंबरनंतर प्रथमच बडोदा शहर आणि जिल्ह्यात 24 तासांत पाच नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. गेल्या वीकेंडनंतर कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. शहरातल्या जेतलपूर, गोरवा, मांजलपूर, दांडिया बाजार आदी भागांमध्ये नव्या बाधितांची संख्या जास्त आहे. बडोदा महानगरपालिका क्षेत्राच्या बाहेर जिल्ह्यात नव्या रुग्णांची नोंद नाही. Corona Returns: ठाकरे सरकारमधील मोठ्या मंत्र्याला कोरोनाचा संसर्ग कर्नाटक : या राज्यात कोरोनाच्या AY4.2 या नव्या व्हॅरिएंटचे रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर कर्नाटक सरकार नव्या मार्गदर्शक सूचना जारी करणार आहे. सणासुदीचे दिवस असल्याने कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होऊ लागल्यावर संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका गृहीत धरून केंद्र सरकारने पुढील पावलं उचलली आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, नव्या व्हॅरिएंटचा तपास आयसीएमआर आणि एनसीडीसी या संस्थांतल्या टीम्स करत आहेत. तसंच, वेगवेगळ्या व्हॅरिएंट्सचं विश्लेषणही करत आहेत. AY.4.2 Corona Variant किती धोकादायक? ICMR ने दिली मोठी माहिती महाराष्ट्र : महाराष्ट्रात सलग दुसऱ्या दिवशी 1485 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आणि 38 जणांचा मृत्यू झाला. कोरोनाबाधितांच्या संख्येत होत असलेली वाढ पाहून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्य सरकारं आणि केंद्रशासित प्रदेशांना असं आवाहन केलं आहे, की कोरोनाप्रतिबंधक लशीच्या दुसऱ्या डोससाठी पात्र असलेल्या व्यक्तींच्या लसीकरणाला प्राधान्य द्यावं. AY.4.2 हा नवा व्हॅरिएंट आधीच्या व्हॅरिएंटच्या तुलनेत वेगाने पसरत असल्याने नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग (Social Distancing) पाळण्याचं आणि मास्कचा (Mask) वापर करण्याचं आवाहन केलं जात आहे. लस न घेतलेल्या व्यक्तींना संसर्ग होण्याची शक्यता सर्वाधिक आहे, असं सांगितलं जात आहे. राजस्थान : राजस्थान सरकारने नव्या व्हॅरिएंटबद्दल चिंता व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी या व्हॅरिएंटचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारकडे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर तयार करण्याची मागणी केली आहे. या नव्या व्हॅरिएंटची मोठी लागण रशिया, ब्रिटनमध्ये झाली असून, भारतातही तो आढळून आल्याचं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. पश्चिम बंगाल : दुर्गापूजा या मोठ्या सणामुळे कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे 24 परगणा जिल्ह्यातल्या सोनारपूर महानगरपालिका क्षेत्रात तीन दिवसांचा लॉकडाउन लावण्यात आला होता. हे शहर कोलकात्यापासून 20 किलोमीटरवर आहे. लॉकडाउनच्या काळात केवळ इमर्जन्सी सेवांनाच परवानगी दिली गेली होती. सोनारपूरमध्ये 19 कंटेन्मेंट झोन्स आहेत. कोलकात्यात दुर्गापूजेनंतर कोरोनाबाधितांच्या संख्येत सुमारे 25 टक्के वाढ झाल्याचं निरीक्षण आयसीएमआरने नोंदवलं आहे. कोरोना रुग्णसंख्या जगभरातच वाढतेय? जागतिक पातळीवरच्या कोविड-19च्या कालखंडातला दुसरा हिवाळा सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर अनेक देशांनी नवे निर्बंध आणि लॉकडाउन लागू केले आहेत. युक्रेनची राजधानी क्यिव्हमध्ये निर्बंध कडक केले जाणार असल्याचं महापौर व्हिताली क्लिटश्को यांनी सांगितलं. रशियामध्येही दैनंदिन रुग्णसंख्येत आणि मृतांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याने जीवनावश्यक नसलेल्या सेवा 11 दिवसांसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चीनमध्ये लँझौ शहर या आठवड्यात पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, चीनमधलं बंद होणारं ते तिसरं शहर आहे. इनर मंगोलिया प्रदेशातलं एजिन हे शहरही बंद करण्यात आलं आहे. गेल्या आठवड्यात युरोपात कोरोनाबाधितांची संख्या आणि मृतांची संख्या या दोन्हींच्या टक्केवारीत दुहेरी आकड्याने वाढ नोंदवली गेली. अशा तऱ्हेची वाढ झालेला तो जगातला एकमेव प्रदेश आहे, असं जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे. सिंगापूरमध्ये बुधवारी 5324 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. त्यावर तितलं आरोग्य मंत्रालय लक्ष ठेवून आहे. महामारीच्या सुरुवातीच्या काळानंतरचा हा सर्वांत मोठा आकडा आहे.
First published:

Tags: Corona spread, Coronavirus

पुढील बातम्या