जिवंत व्यक्ती पाण्यात बुडते, पण मृतदेह पाण्यावर का तरंगतो?

जिवंत व्यक्ती पाण्यात बुडते, पण मृतदेह पाण्यावर का तरंगतो?

अलीकडेच बिहार आणि उत्तर प्रदेशात बरेच मृतदेह (Dead Bodies) नदीत तरंगताना आढळल्याची खळबळजनक बातमी आपण वाचली. आता ते मृतदेह ज्यांचे आहेत त्या व्यक्ती कोरोनामुळे मृत झाल्या होत्या का? हे जाणून घ्यावं लागणार आहे. या बातमीच्या पार्श्वभूमीवर, जिवंत माणूस पाण्यात बुडतो, पण मृत शरीर मात्र पाण्यावर आरामात तरंगते, असे का? असा प्रश्न अनेकांच्या मनात उमटला असेल.

  • Share this:

मुंबई, 13 मे : अलीकडेच बिहार आणि उत्तर प्रदेशात बरेच मृतदेह (Dead Bodies) नदीत तरंगताना आढळल्याची खळबळजनक बातमी आपण वाचली. आता ते मृतदेह ज्यांचे आहेत त्या व्यक्ती कोरोनामुळे मृत झाल्या होत्या का? हे जाणून घ्यावं लागणार आहे. या बातमीच्या पार्श्वभूमीवर, जिवंत माणूस पाण्यात बुडतो, पण मृत शरीर मात्र पाण्यावर आरामात तरंगते, असे का? असा प्रश्न अनेकांच्या मनात उमटला असेल. पोहायला न येणारी एखादी व्यक्ती पाण्यात पडली तर ती स्वत:ला बुडण्यापासून वाचवू शकत नाही. तेच मात्र मृत शरीर कोणत्याही प्रयत्नाशिवाय अगदी सहजपणे पाण्यावर तरंगत राहते.

घनतेशी याचा काय संबंध आहे?

वास्तविक, एखादी वस्तू पाण्यावर तरंगते हे त्याच्या घनतेवर आणि त्या वस्तूने दूर सारलेल्या पाण्यावर अवलंबून असते. ज्या वस्तूची घनता जास्त आहे ती पाण्यात बुडते. जेव्हा एखादी जिवंत व्यक्ती पाण्यात पडते तेव्हा मानवी शरीराची घनता पाण्याच्या घनतेपेक्षा जास्त असल्यानं ती पाण्यात बुडते. बुडल्यानं तिच्या फुफ्फुसात पाणी शिरतं त्यामुळं तिचा मृत्यू होतो.एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होताच त्याचं शरीर पाण्यात वरच्या दिशेनं येऊ शकत नाही, मात्र पाण्यात जितकं खोल जाता येईल तितकं खोल जातं.

म्हणून ती वस्तू पाण्यावर तरंगते:

वैज्ञानिक आर्किमिडीजच्या सिद्धांतानुसार एखादी वस्तू जेव्हा आपल्या वजना इतके पाणी दूर करू शकत नाही, तेव्हा ती पाण्यात बुडते. त्या वस्तूने ढकललेल्या पाण्याचं वजन कमी असेल तर ती वस्तू पाण्यात तरंगते.

मृत्यूनंतर शरीरात काय प्रक्रिया होते?

जेव्हा एखादी व्यक्ती मरण पावते तेव्हा तिच्या शरीरात गॅस तयार झाल्यामुळे तिचं शरीर फुगू लागते. फुगल्यामुळे शरीराचं आकारमान वाढतं आणि शरीराची घनता कमी होते. त्यामुळे मृत शरीर पाण्यावर तरंगतं.

मृत शरीर कुजू लागते :

माणूस मेल्यानंतर त्याच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कार्य करणे थांबवते. शरीर विघटित होऊ लागते. मृत शरीरातील जीवाणू पेशी आणि ऊती नष्ट करण्यास सुरवात करतात. जीवाणूंमुळे शरीरात मिथेन, अमोनिया, कार्बन डाय ऑक्साईड, हायड्रोजन इत्यादी वेगवेगळे वायू तयार होऊ लागतात आणि शरीराच्या बाहेर पडू लागतात. त्यामुळं शरीर तरंगू लागतं.

अनेक गोष्टी पाण्यावर तरंगतात:

पाण्यात तरंगणाऱ्या अनेक गोष्टी आपण पाहत असतो. लाकूड, कागद, पानं, बर्फ अशा गोष्टी पाण्यात बुडत नाहीत. यासाठी एक अगदी सामान्य नियम आहे, तो म्हणजे जड वस्तू पाण्यात बुडते आणि हलकी वस्तू पाण्यात तरंगते.

First published: May 13, 2021, 7:59 AM IST
Tags:

ताज्या बातम्या