Home /News /explainer /

ग्रीकमध्ये Omicron चा अर्थ काय आहे? दोन अक्षरं गाळण्यामागे WHO ने कोणतं कारण सांगितलं?

ग्रीकमध्ये Omicron चा अर्थ काय आहे? दोन अक्षरं गाळण्यामागे WHO ने कोणतं कारण सांगितलं?

शालेय शिक्षण विभागाचा अध्यादेश

पहिली ते चौथी ग्रामीण भागात तर पहिली ते सातवी शहरी भागात शाळा 1 डिसेंबरला होणार


एका वर्गात 15 ते 20 विद्यार्थी असावेत

 एका बाकावर एकच विद्यार्थी असावा

 दोन बाकांमध्ये सहा फुटांचे अंतर असावे 

शिक्षकांची सोय त्याच गावात त्याच शहरात राहण्याची करावी

गर्दी टाळण्यासाठी पालकांना शाळेच्या आवारात येऊ देऊ नये

वर्ग आळीपाळीने म्हणजे काही वर्ग सकाळी तर काही वर्ग दुपारी असे करावे

शालेय शिक्षण विभागाचा अध्यादेश पहिली ते चौथी ग्रामीण भागात तर पहिली ते सातवी शहरी भागात शाळा 1 डिसेंबरला होणार एका वर्गात 15 ते 20 विद्यार्थी असावेत एका बाकावर एकच विद्यार्थी असावा दोन बाकांमध्ये सहा फुटांचे अंतर असावे शिक्षकांची सोय त्याच गावात त्याच शहरात राहण्याची करावी गर्दी टाळण्यासाठी पालकांना शाळेच्या आवारात येऊ देऊ नये वर्ग आळीपाळीने म्हणजे काही वर्ग सकाळी तर काही वर्ग दुपारी असे करावे

जागतिक आरोग्य संघटना (WHO) कोरोना (Corona Virus) विषाणूच्या SARS Cove-2 च्या नवीन प्रकारांचे नामकरण करत असते. अलीकडे दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या या नवीन आणि धोकादायक प्रकाराचे नाव ओमिक्रोन या ग्रीक अक्षरावरून ठेवण्यात आले आहे. लोकांसाठी आश्चर्याची गोष्ट म्हणजे या श्रेणीतील ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या (Omicron Variant) आधी ग्रीक वर्णमालेतील दोन अक्षरं होती. परंतु, जागतिक आरोग्य संघटनेने न्यू आणि शी वगळता ओमिक्रॉनची निवड केली. याचे कारण खूप मनोरंजक आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 30 नोव्हेंबर: जगभरात कोविड संसर्ग (Covid-19) नियंत्रणात येत असतानाच आता ओमिक्रॉन (Omicron) नावाचं नवीन संकट उभं राहिलं आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने कोविड-19 चा ओमिक्रॉन व्हेरिएंट अतिशय धोकादायक असल्याचे घोषित केले आहे. आतापर्यंत, त्याच्या प्रभावाविषयी तपशीलवार माहिती येणे बाकी आहे. परंतु, याक्षणी शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की हा डेल्टा प्रकाराइतकेच प्राणघातक असून खूप वेगाने पसरत आहे, ही एक मोठी चिंतेची बाब आहे. जगातील सर्व देश याबाबत आपत्कालीन पावले उचलत आहेत. यामध्ये प्रवासावरील निर्बंध सर्वात प्रमुख आहेत. ओमिक्रोनचे नामकरण जागतिक आरोग्य संघटनेने असे का ठेवले? याची एक अनोखी माहिती समोर आली आहे. चिंतेचे नाव गेल्या आठवड्यात वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या नवीन कोविड प्रकाराचे नाव B.1.529 ओमिक्रॉन असे ठेवले असून त्याला चिंतेचे प्रकार म्हटले. याला धोकादायक आणि चिंताजनक म्हणण्याचे मुख्य कारण म्हणजे त्याची झपाट्याने पसरण्याची क्षमता आणि त्यात मोठ्या प्रमाणात म्यूटेशन होत असल्याचे समोर आलं आहे. हेच नाव का? SARS Cov-2 चे नवीन प्रकार किंवा स्ट्रेनला नाव देण्यासाठी ग्रीक अक्षरे वापरली जातात. याचं कारण असे की या प्रकारांची वैज्ञानिक नावे खूप लांब आणि गुंतागुंतीची आहेत. यामुळे गोंधळ टाळण्यासाठी ग्रीक अक्षराचे अक्षर SARS Cove-2 मध्येच जोडले गेले आहे, जेणेकरून स्पष्टपणे समजू शकेल की हा एकच विषाणू आहे. परंतु त्यात म्यूटेशन झालं आहे. ओमिक्रॉम कसं? आतापर्यंत जागतिक आरोग्य संघटनेने SARS कोवल-2 च्या प्रकारासाठी 12 ग्रीक अक्षरे आधीच वापरली आहेत. यानंतर, गेल्या आठवड्यातच दक्षिण आफ्रिकेत एक नवीन प्रकार आला. मनोरंजक गोष्ट अशी आहे की या अर्थाने ग्रीक वर्णमालेतील 13 वे अक्षर Nu (Nu) किंवा Xi (Xi) हे Mu नंतर आले आहे. परंतु डब्ल्यूएचओने त्याचे पुढील लेटर ओमिक्रॉन निवडलं आहे. Omicron Variant: डेल्टा व्हेरियंटपेक्षा ओमिक्रॉन व्हेरिएंट 6 पट अधिक संसर्गजन्य! या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका ओमिक्रोमचा अर्थ काय आहे? इंग्रजी वर्णमालेतील लहान O अक्षराचे हे ग्रीक रूप आहे, जे 15 वे अक्षर आहे. ग्रीकमध्ये ओमेगा इंग्रजी कॅपिटल किंवा मोठा ओ दाखवतो. पण, रोकच गोष्टी म्हणजे ओमिक्रॉन आणि ओमेगाच्या उच्चारांमध्ये फरक आहे. याशिवाय Omicron ग्रीक अंकांमध्ये 70 क्रमांक देखील प्रदर्शित करतो. खगोलशास्त्रात, नक्षत्रातील 15 वा तारा ओमिक्रॉनद्वारे दर्शविला जातो. जसे की Omicron Andromada, Omicron Ceti, Omicron Persei इ. मधली दोन अक्षरं का गाळली? जागतिक आरोग्य संघटनेने न्यू आणि शी ही अक्षरे का गाळली, असा प्रश्न लोकांच्या मनात निर्माण होत होता. याचे उत्तर खुद्द WHO ने दिले आहे. त्यांचं असं म्हणणं आहे, की न्यू अक्षर इंग्रजीत न्यू म्हणजे नवीन शब्दाशी साध्यर्म साधते, जेव्हा नवीन प्रकार येतो तेव्हा लोकांमध्ये संभ्रम निर्माण होईल. तर शी हा शब्द चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिन यांचं पहिलं नाव असताना, शी हे नाव दिल्याने वादाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. पूर्वी या प्रकारांना कोणती नावं दिली? जागतिक आरोग्य संघटनेने 2020 च्या अखेरीस ब्राझीलमध्ये आढळलेल्या B.1.1.7 प्रकाराला अल्फा असे नाव दिले होते. यानंतर, 2020 च्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या B.1.351 प्रकाराला बीटा असे नाव देण्यात आले. त्यानंतर 2020 च्या शेवटी, P.1 प्रकाराला ब्राझीलमध्येच गॅमा असे नाव देण्यात आले, त्याच वर्षाच्या शेवटी भारतातून पसरलेल्या B.1.617.2 प्रकाराला डेल्टा असे नाव देण्यात आले. Delta च्या संकटात Omicron चा उगम म्हणजे GOOD NEWS; तज्ज्ञांकडून मोठा दिलासा हे सर्व प्रकार धोकादायक असल्याचे सांगण्यात आले होते. सोबतच त्यांना चिंतेच कारण सांगितले होते. याशिवाय Lambda नाव C.37 आणि Mu नाव B.1.621 व्हेरिएंटला देण्यात आले होते, जे फार धोकादायक मानले जात नव्हते आणि त्यांना व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट श्रेणीमध्ये ठेवण्यात आले होते. यानंतरही काही प्रकार त्यांच्या मूळ कारणामुळे चर्चेत होते. डब्ल्यूएचओने स्पष्ट केले की ते देशाच्या नावावर कोणत्याही व्हायरस प्रकाराचे नाव देत नाही.
    Published by:Rahul Punde
    First published:

    पुढील बातम्या